About Us

सर्व प्रिय वाचकांस
स.न.वि.वि.,

आजच्या या युगात इंटरनेट आणि मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो, तर याच तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून यशाची शिखरे गाठणारेही कमी नाहीत. अशा वेळी तंत्रज्ञानाची भीती बाळगण्यापेक्षा, त्याचा वापर सकारात्मकतेसाठी कसा करावा, हे ठरवण्याची वेळ आज आपल्यासमोर आली आहे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजात वाढतो आणि त्याचे एक घटक बनतो. आजच्या या वेगवान दुनियेत रोज नवनवीन आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात; पण दुर्दैवाने सगळंच चांगलं असतं असं नाही. संतांच्या, थोर समाज सुधारकांच्या या महाराष्ट्रात एका बाजूला अभिमानाने मान उंचावेल अशी कर्तबगिरी गाजवणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला समाजाला घातक ठरणारे घटकही आहेत. अशा नकारात्मक प्रवृत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि समाजात सुजाण नागरिक निर्माण करण्यासाठी केलेला हा एक छोटासा वैचारिक प्रयत्न आहे.

आमच्याबद्दल / About Us (kridavishwa.in)

प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकदा आपण अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण जसे आजारपणावर उपचार व पुन्हा आजारपण येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय केल्याशिवाय निरोगी आयुष्याचा आनंद घेऊन जगता येत नाही, तसेच सामाजिक प्रतिकूलतेवर उपाय म्हणजे सुजाण समाजाची निर्मिती करणे हाच आहे.

Often, due to unfavorable circumstances, we tend to ignore the things happening around us. However, just as we cannot enjoy a healthy life without treating an illness and taking preventive measures, the only solution to social adversity is the creation of an informed and aware society.

१. ओपिनियन जर्नलिझम: तटस्थ बातम्यांच्या पलीकडे / 1. Opinion Journalism: Beyond Neutral News

आपण रोज अनेक बातम्या वाचतो, व्हिडिओ पाहतो आणि कळत-नकळत आसपासच्या घडामोडींवर लक्ष ठेवत असतो. वृत्तपत्रे किंवा न्यूज चॅनेल्स बातम्या सांगताना तटस्थ भूमिकेतून तथ्ये (Facts) मांडत असतात, जे त्यांच्या कामासाठी आवश्यक आहे. परंतु, आज या तटस्थ बातम्यांमध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेचा भरणा जास्त असतो. अशा वेळी नवीन पिढीला जगापासून अलिप्त ठेवण्यापेक्षा, अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर एका सुसंस्कृत वातावरणात चर्चा होणे आवश्यक आहे.

Every day, we read news, watch videos, and consciously or unconsciously keep an eye on surrounding developments. While newspapers or news channels present facts from a neutral standpoint—which is essential for their work—today’s neutral news often contains more negativity than positivity. In times like these, rather than keeping the new generation isolated from the world, it is crucial to discuss surrounding events in a refined and constructive environment.

याच विचारातून या आगळ्यावेगळ्या ब्लॉगची सुरुवात होत आहे, ज्याला ‘Opinion Journalism’ (मतप्रदर्शन पत्रकारिता) असे म्हटले जाते. इथे आपण रोज विविध घटना, कला आणि चालू घडामोडींच्या ‘समीक्षणा’च्या माध्यमातून निश्चितच खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ या एका विचाराने जोडले जाऊ, अशी मला खात्री आहे.

With this thought, this unique blog is being launched, a concept known as ‘Opinion Journalism’. I am confident that through daily reviews of various events, art, and current affairs, we will truly connect under the universal philosophy of ‘Vasudhaiva Kutumbakam’ (The World is One Family).

२. क्रीडाविश्व: विचारांचा अनोखा मंच / 2. Kridavishwa: A Unique Platform for Perspectives

‘क्रीडाविश्व’ हा एक अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे, जो आजच्या प्रमुख आणि डिजिटल ट्रेंडिंग विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगमध्ये आपल्याला विविध घटना, सोशल मीडिया ट्रेंड्स आणि लोकप्रिय व्हिडिओंबद्दल संपूर्ण पुनरावलोकन व वैयक्तिक विश्लेषण मिळेल. हे सर्व घटक सुसंगतपणे एकत्र केले जातात, जेणेकरून ते वाचकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतील.

‘Kridavishwa’ is a unique platform thoughtfully designed as a forum to discuss today’s major and digitally trending topics. On this blog, you will find comprehensive reviews and personal analyses of various events, social media trends, and viral videos. All these elements are seamlessly integrated to deeply connect with the readers’ minds.

३. चालू ट्रेंड्स आणि नव-संशोधन / 3. Current Trends and Innovations

आमच्या ब्लॉगवर ताज्या घडामोडींचे परीक्षण केले जाते, ज्यामध्ये नवे तंत्रज्ञान (Technology), सामाजिक बदल आणि जगभरातील वैशिष्ट्यांचे पैलू पाहायला मिळतात. आपल्याला सध्याच्या ट्रेंड्सचे विश्लेषण अनुभवण्याची संधी मिळेल; जसे की नवीन फॅशन, डान्स व्हिडिओज, कुकिंग टिप्स आणि आधुनिक जीवनशैली. यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंचा समतोल विचार मांडला जातो, ज्यामुळे वाचकांना एक परिपूर्ण चित्र पाहायला मिळते.

Our blog evaluates current developments, reflecting aspects of new technology, social changes, and diverse global features. You will get the opportunity to follow and understand contemporary trends such as fashion, viral dance videos, culinary tips, and modern lifestyles. We balance both positive and negative perspectives to present a complete and unbiased picture to our audience.

४. वैयक्तिक विचारांचे महत्त्व / 4. The Importance of Personal Insights

आजच्या माहितीच्या महापुरात वैयक्तिक आणि स्वतंत्र विचारांचे महत्त्व लुप्त होत चालले आहे. ‘क्रीडाविश्व’मध्ये आम्ही अशा स्वतंत्र वैयक्तिक विचारांना व्यासपीठ देतो. लोकल सर्कलमध्ये किंवा समाजात विचारांची देवाणघेवाण होणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणूनच येथे कोणत्याही विषयाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंवर सखोल चर्चा केली जाते, जी वाचकांना अधिक विचारशील बनवते.

In today’s flood of information, the value of personal and independent thoughts is gradually fading. At Kridavishwa, we prioritize and give immense importance to these personal insights. Sharing thoughts within local circles and society is crucial; hence, we discuss both the pros and cons of various topics to provide a richer, more thoughtful experience.

जागतिक घटना आणि ट्रेंडवर आधारित विषयांवर संवाद साधल्याने आपण केवळ आपल्या विचारांचे आदानप्रदान करत नाही, तर विविध समाजांचे दृष्टिकोनही समजून घेतो. यामुळे एक विस्तृत दृष्टिकोन मिळतो, जो समाजात चांगली विचारसरणी निर्माण करण्यास मदत करतो.

By discussing global events and burning trends, we not only exchange our views but also understand the perspectives of different communities. This fosters a broader mindset, ultimately helping to build a more progressive and constructive thought process in society.

५. मुख्य प्रभाग संरचना

इथे आपण रोज विविध घटना, कला आणि चालू घडामोडींच्या ‘समीक्षणा’च्या माध्यमातून आपण जोडले जाऊ. पण म्हणजेच काय तर थोडक्यात, kridavishwa.in ह्या व्यासपीठावर आपल्याला: सर्वत्र चर्चित अश्या सर्व चांगल्या व आवश्यक घटनांच्या क्षेत्र व भाषेच्या कुठल्याही सीमा न ठेवता पूर्ण माहिती घेऊन तुमच्या पर्यंत आणण्याचा kridavishwa.in चा प्रयत्न असेल.

  • विचारवेध‘ : ‘विचारवेध’ ह्या संपादकीय प्रभागात आपल्याला विचारधन म्हणजेच चालू घडामोडींवर वयक्तिक दृष्टिकोनातून सविस्तर अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो तो वाचायला मिळेल. 
  • अपडेट‘ : बातम्यांसारखेच ह्या प्रभागात सर्व चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल व आपला एक मित्र म्हणून यातील मला व माझ्या टीम ला आवडलेल्या आपल्या करीता शक्य तेवढ्या चांगल्या बातम्यांवर विचारातून थोडक्यात व्यक्त होण्याचा व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला पाहण्यास मिळेल.
  • तंत्रज्ञान‘ : आधुनिक जगात तंत्रज्ञानाची माहिती ठेवणे हे जणू पाणी पिण्या इतके आवश्यक आहे असे म्हणले तर वावगे ठरू नये. अश्या वेळी जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील चालू घडामोडींच्या बाबतीत एक वयक्तिक दृष्टिकोनातून माहिती व फायदे-तोटे सांगण्याचा केलेला प्रयत्न पाहायला मिळेल.
  • जीवनशैली‘ : ‘साधी राहणी उच्च विचार’ चा खरा अर्थ समजून घेत आधुनिकतेचा चांगल्या ठिकाणी वापर करत केलेल्या बदलला स्वीकारणे व जीवनमान व आरोग्य सुधारणे करीता तसेच एकंदर lifestyle विषयक माहिती वयक्तिक दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळेल. 
  • मनोरंजन‘ : सततच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा नसेल तर शरीर जरी आराम केल्यावर पुन्हा कामासाठी तयार होईल पण मनाला पुन्हा ताजेतावाने करण्या साठी हेल्दी मनोरंजना कुठे बघायचे असेल ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळेल. 

आपला स्नेह आणि पाठिंबा असाच कायम राहावा हीच विनंती!

जीवनशैली आणि उपयुक्त साधने / Lifestyle and Utilities आधुनिक जीवनशैली अधिक सुकर आणि तणावमुक्त करण्यासाठी आम्ही केवळ वैचारिक लेखच देत नाही, तर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी काही मोफत ‘डिजिटल टूल्स’ (उदा. आरोग्य आणि आर्थिक कॅल्क्युलेटर्स) देखील उपलब्ध करून देतो. साधी राहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

Our Core Sections

Here, we will connect with each other every day through the ‘review and analysis’ of various events, art, and current affairs. To put it simply, on the kridavishwa.in platform, our endeavor is to bring you comprehensive information about well-discussed, positive, and essential events from all around, breaking all barriers of region and language.

  • ‘Vicharvedh’ (Perspectives): In this editorial section, you will get to read a wealth of thoughts. Here, we attempt to decode and understand the deeper meaning of current affairs from an analytical and personal point of view.
  • ‘Updates’: Similar to a news feed, this section will keep a close eye on all current affairs. Acting as a friend, my team and I will briefly share our thoughts and provide information on the best and most interesting news that resonated with us, specially curated for you.
  • ‘Technology’: It wouldn’t be an exaggeration to say that staying informed about technology in today’s modern world is as essential as drinking water. In this section, you will find information about current developments in the global tech sector, along with an attempt to explain their pros and cons from a personal perspective.
  • ‘Lifestyle’: Understanding the true essence of ‘simple living, high thinking,’ this section focuses on embracing positive modern changes. Here, we attempt to provide valuable information and personal insights on improving our standard of living, health, and overall lifestyle.
  • ‘Entertainment’: In our fast-paced lives, without recreation, the body might recover with rest, but the mind needs rejuvenation too. This section will guide you on where to find ‘healthy entertainment’ to keep your mind refreshed and completely recharged for the daily grind.

We hope for your continued love and support!

To make modern lifestyle easier and stress-free, we not only provide thought-provoking articles but also offer free daily-use digital tools (like health and financial calculators). This is our attempt to blend simple living with modern technology seamlessly.

धन्यवाद, संपूर्ण kridavishwa.in ची टीम.
Thanks