Web Series च्या दिवाण्यांसाठी स्पेशल 😍
विविध OTT प्लॅटफॉर्म्स वर सध्या नवीन आलेल्या वेब सीरीज पैकी, पुढे दिलेल्या वेब सीरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या दिसत आहेत. काही काळा पासून लोकप्रिय असलेल्या ह्या मालिका विविध शैली मधील आहेत, यापैकी आपल्या आवडीच्या शैली तील वेब सीरीज ची माहिती पाहून आपण त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता.
JioHotstar
- प्रीतम आणि पेड्रो (U/A 16+): राजकुमार हिरानी यांची ही पहिलीच ओटीटी वेब सिरीज असून ती नुकतीच जुलै २०२६ मध्ये रिलीज झाली आहे. यात अर्शद वारसी आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत
- ताझा खबर (U/A 16+): भुवन बामची ही कॉमेडी आणि थ्रिलर सिरीज प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.
- शोटाईम (U/A 16+): बॉलीवूड आणि चित्रपटसृष्टीच्या पडद्यामागील राजकारण आणि सत्तानाट्य दाखवणारी ही एक रंजक वेब सिरीज आहे.
Amazon Prime Video
- हॅपी फॅमिली, कंडिशन्स अप्लाय (U/A 16+): ही एक अत्यंत हलकीफुलकी कौटुंबिक कॉमेडी सिरीज आहे जी एका छताखाली राहणाऱ्या एका कुटुंबाच्या ४ पिढ्यांवर आधारित आहे.
- राख (U/A 16+) ही एक क्राइम थ्रिलर शैलीतील कथानक असलेली वेब सिरीज सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
- आदर्श बाल विद्यालय (U/A 13+): प्रमुख भूमिकेत के. के. मेनन आहेत व ही एक नवीन कॉमेडी-ड्रामा सिरीज आहे. शाळा, समाज आणि शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारी ही सिरीज प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
NETFLIX
- आय विल फाईंड यू (U/A 16+): सॅम वर्थिंग्टन प्रमुख भूमिकेतील ही एक क्राईम-थ्रिलर सिरीज आहे, नेटफ्लिक्सची २०२६ मधील ही सर्वात मोठी सिरीज ठरली आहे. चुकीच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत असलेला बाप जेव्हा आपला मुलगा जिवंत असल्याची माहिती मिळवतो आणि सत्याच्या शोधात निघतो, अशी याची उत्कंठावर्धक कथा आहे.
- द लिंकन लॉयर – (U/A 16+): मिकी हॉलर या प्रसिद्ध वकिलाची ही कायदेशीर ड्रामा सिरीज अतिशय लोकप्रिय आहे. या नव्या सिझनमध्ये तो एका हत्येच्या खटल्यातून स्वतःचीच निर्दोषता सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहे.
- मुसाफिर कॅफे (U/A 16+): विक्रांत मेस्सी आणि वेदिका पिंटो स्टारर ही एक सुंदर रोमँटिक वेब सिरीज आहे, जी तरुण वर्गात आणि रोमँटिक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांमध्ये खूप ट्रेंड करत आहे.
ॲमेझॉन एमएक्स प्लेयर (Amazon MX Player)
- संकल्प (U/A 16+): प्रकाश झा दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, मोहम्मद झीशान अय्यूब, संजय कपूर यांची प्रमुख भूमिका असलेली ही एक दमदार राजकीय आणि सामाजिक ड्रामा सिरीज आहे.
- मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी (U/A 13+): नसिरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या अभिनयाने सजलेली ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक बिझनेस ड्रामा सिरीज आहे.
- अब होगा हिसाब (U/A 16+): शहीर शेख आणि मौनी रॉय स्टारर ही एक सूड आणि थरार दाखवणारी वेब सिरीज आहे जी सध्या गाजत आहे.
🤩 फन फॅक्ट्स 🤩
मनोरंजनात क्षेत्रात आजघडीला OTT संकल्पनेचा विस्तार लक्षणीय रित्या वाढला आहे. आज घडीला OTT (Over-The-Top) प्लॅटफॉर्म्स आता अगदी सवयीचे झालेले आहेत.
पण OTT मध्ये नेमके काय काय येते हे माहीत आहे का ?
आज रोजी OTT प्लॅटफॉर्म्स नवीन मूव्ही किंवा शो आला आहे असे जे आपण म्हणतो ते OTT प्लेटफॉर्म नेमके किती व्यापक आहे हे आपण जाणून घेतले का? किंवा OTT म्हणले की, नेटफ्लिक्स, प्राइम वीडियो, किंवा डिस्ने हॉटस्टार एवढेच काहींना वाटत असेल तर हे असे अजिबात नाहीये. थोडक्यात ”OTT प्लॅटफॉर्म्स म्हणजे केबल किंवा डिश टीव्ही शिवाय इंटरनेट च्या माध्यमातून प्रेक्षक हवे तेव्हा व हवे तेवढे मनोरंजनाचे व्हिडीओ किंवा ऑडियो पाहू व ऐकू शकण्यासाठी उपलब्ध असतात असे ठिकाण (प्लॅटफॉर्म्स) यांना OTT प्लॅटफॉर्म्स म्हणतात”. यात प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
- SVOD (Subscription video on demand) – नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, यांच्या सारखे प्लॅटफॉर्म्स जे महिनेवारी किंवा वार्षिक सब्सक्रिप्शन सुविधा द्वारे त्यांच्या कडील उपलब्ध कंटेंट हवे तेव्हा पाहण्यासाठी उपलब्ध करून देतात.
- AVOD / FAST (Ad-Supported / Free) – जाहिरातींच्या आधारे मोफत किंवा कमी किमतीत सुविधा देणारे प्लॅटफॉर्म्स
- Live TV / MVPDs – केबल टीव्ही वरील चॅनेल्स किंवा तसे चॅनेल्स विना केबल चे इंटरनेट च्या मदतीने दाखवणारे प्लॅटफॉर्म्स
वरील तीन मुख्य प्रकारांच्या अंतर्गत खालील उपप्रकारे पडतात ते पुढील प्रमाणे :
- व्हिडीओ स्ट्रिमिंग (Video OTT) : नेटफ्लिक्स सारखे प्लॅटफॉर्म्स सोबत लाँग-फॉर्म कंटेंट, शॉर्ट-फॉर्म आणि मायक्रो-ड्रामा, लाईव्ह स्पोर्ट्स आणि टीव्ही, एआय आणि व्हर्च्युअल इन्फ्लुएन्सर्स (AI Content), युझर जनरेटेड कंटेंट (UGC) सारखे कंटेंट देणारे प्लॅटफॉर्म्स
- ऑडियो आणि म्यूजिक (Audio OTT) : spotify, ऐपल म्यूजिक सारखे प्लॅटफॉर्म्स
- ऑडियो बुक्स आणि ऑडियो सीरीज (Audiobooks and Stories) : ऑडिबल, पॉकेट एफएम सारखे प्लॅटफॉर्म्स
- क्लाउड गेमिंग (Gaming OTT) : प्लेस्टेशन नाउ, सारखे प्लॅटफॉर्म्स
- मेसेजिंग आणि व्हॉईस कम्युनिकेशन (Communication OTT) : व्हॉट्सऍप सारखे प्लॅटफॉर्म्स
- व्हर्च्युअल आणि इमर्सिव्ह मीडिया (Metaverse / VR OTT) : VR व AR सारखे कंटेंट प्लॅटफॉर्म्स
अश्याच मनोरंजनाचे अपडेट व रंजक माहिती करिता आमच्या Kridavishwa.in ह्या ब्लॉग ला नेहमी भेट देत रहा.






