Home / जीवनशैली / साधे काम करत असतानाही येतोय थकवा? जाणून घ्या रहस्य

साधे काम करत असतानाही येतोय थकवा? जाणून घ्या रहस्य

सकाळच्या कोवळ्या उन्हात उत्साहाने व्यायाम करणारी निरोगी व्यक्ती. Overcoming physical deconditioning and fatigue through regular exercise."

रोजची साधी कामे करत असताना देखील थकवा येतोय?

रोजची कामे करत असताना थकवा येतोय? किंवा असे कधी वाटले की हे काम आधी इतक्या सहजतेने होत होते ते आता करताना त्रास होतोय, किंवा शरीर साथ देत नाही असे वाटत आहे. याकडे वेळीच लक्ष द्या. कदाचित तुमचे दुर्लक्ष करणे मोठ्या अडचणींना निमंत्रण देऊ शकते. आजच्या तंत्रज्ञानाने समृद्ध अश्या युगात बैठे काम आणि व्यायामा पासून दूर गेलेली जीवनशैली मुळे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम पडत असतात. काहींना हे बदल लवकर जाणवतात तर काहींना हे उशिरा पण आपल्या शरीराची कार्यक्षमता टिकून राहावी याकरिता आपल्याला हालचाल करत राहणे आवश्यक असते.

सर्वांचे शरीर ज्या नियमांवर चालते ते वेळ-परिस्थिती नुसार आपल्याला द्यायचा तो योग्य न्याय दिल्या वाचून राहत नाही. मग अशा वेळी कधी कधी लोकांना अगदी साधी-साधी कामे करतानाही धाप लागते किंवा थकवा येतो पण त्यांना त्यामागील शास्त्रीय कारण माहीत नसते. आणि मग दवाखाने आणि महागडी औषधे आपल्याला घ्यावी लागतात आणि तरीही स्वस्थ व निरोगी शरीरामुळे जो उत्साह व आनंद माणूस उपभोगू शकतो तो त्याला उपभोगता येत नाही.

कधी कधी कामाच्या व्यापात इच्छा असूनही आपल्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येते तर कधी कधी तंत्रज्ञानाने समृद्ध अश्या आधुनिक जीवनशैली मध्ये आपल्याला काम करण्याची फारशी गरज उरलेली नसते. पण असे असेल तर वेळीच सावध व्हा कारण आपले शरीर हे नुसते बसून राहणे किंवा झोपून राहणे या परिस्थिती मध्ये अकार्यक्षम बनत जाते. आणि विविध सामाजिक परिस्थिती मध्ये ते काम करण्यासाठी ते सक्षम राहत नाही व आजारपणा मध्ये देखील ते योग्य लढा देऊ शकत नाही.

काय आहे फिजिकल डिकंडिशनिंग ?

एखादी व्यक्ती दीर्घकाळ नियमित केल्या जाणाऱ्या सामान्य हालचाली जसे तोंड धुणे, खाणे-पिणे, झोपणे, मोबाईल वर जास्त वेळ घालवणे सारख्या मर्यादित फारश्या श्रमाच्या हालचाली न करणे एवढ्या दैनदिन कामकाजा पुरती आपली हालचाल फक्त मर्यादित ठेवते किंवा त्या देखील करणे बंद करते जसे मोबाईल च्या किंवा टीवी सीरियल व गेम्स च्या आहारी जाऊन वेळी अवेळी जेवण करणे, पोषणा कडे दुर्लक्ष करणे व सतत पडून (झोपून) राहून अशी कामे करणे या सर्व सवयी शरीराला आतून पोखरून टाकतात शरीराची कार्यक्षमता कमी होऊन ताकद व तग धरण्याची क्षमता कमी होते.

आणि एकदम लाईट चालू बंद झाल्या सारखे आपले शरीर काम करणे बंद तर करत नसते याची सुरुवात हळूहळू होत असते आणि आपण वेळीच याची लक्षणे ओळखून आपली जीवनशैली सुधारली नाही तर परिस्थिती अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते ज्यात शरीरातील स्नायू, हृदय, फुफ्फुसे यांच्या कार्यक्षमतेत झपाट्याने घट होत जाते.

लक्षणे :

(पुढील लक्षणे सामान्य परिस्थिती दिसणाऱ्या क्रमानुसार आहेत यात प्रकृती परत्वे फरक असू शकतो.)

  • लवकर दम लागणे
  • सतत थकवा जाणवणे
  • स्नायू कमजोर होणे
  • सांधे आखडणे
  • स्नायूंचा आकार कमी होणे

आपण वर चर्चा केल्या प्रमाणे फिजिकल डिकंडिशनिंग म्हणजे काय हे समजून घेत असताना काही सवयी जसे की व्यायामाचा अभाव किंवा अत्यंत आळशी व बसून राहण्याची जीवनशैली चा विचार केला पण काही वेळा गंभीर आजारपण किंवा दुखापतीमुळे दीर्घकाळ अंथरुणावर किंवा रुग्णालयात भरती राहणे (बेडरेस्ट) असणे हे देखील एक कारण आहे. आणि वय वाढी मुळे नैसर्गिकरित्या शरीराची हालचाल कमी होत असते.

जर आपणास कुठल्या आजारपणा मुळे म्हणजे आजारपण होऊन गेल्यानंतर उदा. क्षयरोग (टीबी) हा त्रास होत असेल तर पोस्ट टीबी सिंड्रोम किंवा पोस्ट टीबी फटीग असे म्हणले जाऊन त्या आशयाने याचा विचार करावा लागतो कधी कधी सांगितलेला आराम (बेडरेस्ट) व्यवस्थित घेतल्या गेल्या नाही किंवा कमी आराम झाला तसेच औषधांचा शरीरावर झालेला परिणाम विविध वैद्यकीय तपासण्या डॉक्टरांच्या द्वारे तपासून त्यांच्या सल्ल्यानुसार आहार व व्यायामाची सुरुवात करावी लागते. बऱ्याचदा जंतू निष्क्रिय झाल्यावर देखील शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील बदलांशी लढत असते.

तर थोडक्यात प्रत्येक आजार व शारीरिक परिस्थिती पाहता योग्य ती पाऊले उचलत या परिस्थितीवर मात करता येते व आपले जीवनमान पूर्ववत सुधारता येते. आजारपण असेल किंवा बैठी जीवनशैली या परिस्थितीत आपण काही ठराविक संरचनात्मक पद्धतीने आपल्या शरीरात सुधारणा करण्या साठी उपाय योजना करण्या जोग्या असतात जसे की,

  • टप्प्या टप्प्याने कामाची सुरुवात करणे : सुरुवातीस हलकी, शरीरास झेपेल अशी कामे थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घेत पूर्ण करणे.
  • उच्च प्रथिने युक्त आहार : ज्याना मांसाहार पटत किंवा पचत नसेल अश्यानी शाकाहारातील विपुल प्रमाणत उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा विचार केला पाहिजे फक्त प्रकृती परत्वे पदार्थांचे तज्ञांच्या सल्ल्याने निवड करून आहारात समावेश करावा. व शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित रहावे या दृष्टीने पाणी पिणे कमी नाही झाले पाहिजे
  • हलका व्यायाम आणि प्राणायाम : थकवा आहे म्हणून पडून न राहता शक्य तेवढा वेळ नियमित सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 मिनिटे संथ गतीने चालणे सारखे व्यायाम व अनुलोम विलोम सारखे प्राणायाम फुफ्फुसांच्या कार्यक्षमता वाढीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व त्यांच्या निदर्शना खाली सुरू करावे.

वरील प्रमाणे काळजी घेतल्यास निश्चितच आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल यात शंका धरू नका. बऱ्याच वेळा शारीरिक परिस्थिती मुळे मानसिकता देखील खराब होते व व्यक्ती नैराश्येच्या गर्तेत जाण्याची शक्यता नाकारता येत नसते अशावेळी आपल्या मनाची इच्छाशक्ती आपल्याला वाढवणे आवश्यक असते सोबतच अश्या मानसिकतेत आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवल्यास निश्चित फायदा जाणवतो.

सदर लेखाच्या अनुषंगाने आमची फेसबुक वरील वीडियो पोस्ट देखील नक्की पहा. (फेसबुक वरील पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा) फिजिकल डिकंडिशनिंग चे दुष्परिणाम सांगत एक्सरसाइज व एक्सर्शन मधील फरक देखील सांगण्याचा आम्ही AI मार्फत तयार केलेल्या त्या वीडियो मधून देण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.

अश्याच नव नवीन माहिती करिता आमच्या kridavishwa.in ला नेहमी भेट देत रहा.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Home
Search
Menu
×