Home / अपडेट / Monsoon पुढे ढकलला गेला?

Monsoon पुढे ढकलला गेला?

कोरड्या जमिनीवर आभाळ असलेले चित्र

Monsoon delayed

सावधान ! या वर्षी महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस कमी असेल असे बोलले जात आहे आणि अजून खऱ्या अर्थाने एकही दमदार पाऊस पडला नाहीये आणि त्यातच आताच तासभरापूर्वी बीबीसी या वृत्त वाहिनीच्या बातमीवरून (मूळ बातमी येथे वाचा – BBC न्यूज़ ) हवामान विभागाने पुढचे अजून काही दिवस पावसाच्या प्रतिक्षेतच जाणार असे सांगितले आहे. आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला या उष्णतेच्या तडाख्यातून जावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

पुढील 3 दिवस म्हणजेच 17 जून पर्यंत Monsoon हवामानाचा अंदाज दाखवत विशेष करून 16 तारखेस सर्वत्र उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. येथे kridavishwa.in च्या सर्व टीम तर्फे मराठवाडा व विदर्भ येथील सर्वांना येत्या पुढील 3 दिवसांत येथे विशेष करून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कारण सर्वसाधारण मराठवाडा व विदर्भ येथे तापमान हे 40 अंशाच्या जवळ असते आणि सध्या वातावरणातील आद्रते विषयी नेमकी माहिती मिळाली नसली तरी आद्रता युक्त उष्णता जर असेल तर उन्हाची किंवा उष्णतेची तीव्रता ही अजून जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना आद्रता युक्त उष्णता राहिल्यास कोरड्या उष्णते पेक्षा ती अधिक घातक असते तेव्हा सर्वानी आवश्यक तेव्हाच दुपारच्या वेळी बाहेर पडून आवश्यक काळजी घेत आपली कामे पूर्ण करावीत आणि हवामान खाते पुढील काय सूचना देतील तो पर्यंत तरी शेतीविषयक निर्णय घायचे टाळायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.