Home / अपडेट / अल निनो चे रूपांतर ‘Super El Nino’ मध्ये: यंदा किती टक्के दुष्काळाची शक्यता?

अल निनो चे रूपांतर ‘Super El Nino’ मध्ये: यंदा किती टक्के दुष्काळाची शक्यता?

सुपर अल निनो व दुष्काळाची शक्यता

अल निनो चे रूपांतर ‘Super El Nino’ मध्ये?

आज ऑगस्ट च्या मध्यापर्यंत आपण पोहोचलो तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात विशेषकरून मराठवाड्यात पावसाची गैरहजेरी कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चितेंत दिवसागणिक वेगवेगळी भर पडत असतानाच WMO (World Meteorological Organization – जागतिक हवामान संघटना) ही एक संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक विशेष संस्था आहे, जी हवामान, जलवायु (क्लायमेट) आणि जलसंपत्तीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य व संशोधन करते यांच्या,

आणि NOAA (मूळ वृत्त येथे वाचा) यांच्या बातमी नुसार एल निनो / अल निनो चे संकट जेवढे आपल्याला वाटत होते त्याहून अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. सदर बातमीला दुजोरा म्हणून IMD (भारतीय हवामानशास्त्र विभाग) यांच्या बुलेटिन नुसार मागील जून महिन्यातील वीक अल निनो आता मध्यम ते तीव्र स्वरूपातील अल निनो मध्ये बदलण्याच्या स्थितीकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. हे निश्चितच शेतकऱ्यानं साठी व पर्यायाने सर्व भारतीयांसाठी चिंतेची बाब ठरत असल्याचे दिसत आहे.

अल निनो म्हणजे काय?

अल निनो ही एक समुद्रातील तापमानाची परिस्थिती आहे जी, नैसर्गिक हवामान प्रक्रियेच्या अंतर्गत मोडते. ‘अल निनो’ हा स्पॅनिश शब्द असून या सारखाच आपण ‘ला निनो‘ हा देखील शब्द नेहमी ऐकतो त्याचे कारण यांचा थेट संबंध समुद्राच्या तापमानाशी आहे. सरळ अर्थाने अल निनो म्हणजे लहान मुलगा तर ला निनो म्हणजे लहान मुलगी असा होतो.

पण अल निनो म्हणजे, पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणे. तर ला निनो म्हणजे, पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी होणे असा आहे.

जरी अल निनो व ला निनो हे पॅसिफिक महासागराशी संबंधीत असले तरी याचा जागतिक हवामानावर मोठा परिणाम होतो त्यात भारताच्या हवामाना विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर अल निनो ची परिस्थिती भारतात कोरडा दुष्काळ आणते आणि ला निनो ची परिस्थिती ओला दुष्काळ आणते.

अल निनो चे वर्गीकरण कसे होते?

समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील बदलाचे किमान ३ महिन्यांच्या स्थिर नोंदी वरून अमेरिकेतील हवामान संस्था NOAA तापमानातील वाढीची माहिती ओशनिक निनो इंडेक्स च्या आधारे मुल्यमापण करून निनो चे वर्गीकरण सौम्य (Weak), मध्यम (Moderate), व तीव्र (Super/ Very Strong) या प्रकारात करते 

सर्वसाधारण पणे सौम्य प्रकारात ०.५ ते ०.९ डिग्री सेल्सियस ने वाढलेले असते तर १.० ते १.४ डिग्री सेल्सियस तापमान मध्यम प्रकारात गणला जातो, आणि १.५ ते १.९ डिग्री सेल्सियस किंवा याहून अधिकचे तापमान हे सूपर प्रकारातील निनो चे असते.

यंदा किती टक्के दुष्काळाची शक्यता?

निनो चा प्रभाव जसा भारतावर कोरड्या दुष्काळाच्या स्वरूपात होत असतो तसाच तो अमेरिका, चीन आणि पूर्व आफ्रिकेत या भागात अतिवृष्टी आणि विनाशकारी पुराच्या अश्या विरुद्ध स्वरूपातील भूमिकेत पण विनाशकारीच असतो. एकूणच या परिस्थितीत येत्या नजीकच्या काळात अन्नधान्याची टंचाई व त्यानुषंगाने महागाई मधे मोठी वाढ होण्याची शक्यता दाट आहे.

IMD चा मान्सून अंदाज :

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दुबार पेरणीचे संकट येऊन उभे ठाकले असताना, दिवसागणिक उष्णेतच्या लाटा अधिक तीव्र होत असल्याचे जाणवत आहे व येत्या नजीकच्या काळात ही परिस्थिती अशीच कायम राहून उष्णेतच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता IMD मार्फत कळविण्यात येत आहे. यामुळे पेरणीवरील संकट हे कमी होणे दूर अजून वाढले गेले आहे.

WMO चा गंभीर इशारा :

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या मते : “विज्ञान स्पष्ट आहे: येत्या काही महिन्यांत एल निनो ९०% निश्चिततेने आपल्या दारात येऊन ठेपणार आहे. जगाने याला एक तातडीचा ​​हवामानविषयक इशारा म्हणूनच गांभीर्याने घेतले पाहिजे. एल निनोची परिस्थिती आधीच तापत असलेल्या जगाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करेल. याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतील, ते अधिक दूरवर पसरतील आणि विनाशकारी वेगाने सीमा ओलांडतील. यावर एकमेव प्रभावी प्रतिसाद म्हणजे या संकटाच्या बरोबरीची हवामान कृती करणे – जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व संपवणे, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांकडे वळण्याची प्रक्रिया वेगवान करणे, सर्वात असुरक्षित घटकांचे संरक्षण करणे आणि सर्वांसाठी पूर्वसूचना प्रणाली उपलब्ध करून देणे,” असे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले

ज्यावर नक्कीच संपूर्ण प्रभावित देशांनी विचार करायला हवा यासाठी नुसतेच पाणी व्यवस्थापन करून भागणार नाही तर शेतकऱ्यांसाठी पीक नियोजन व हवामानाच्या अंदाजा प्रमाणे अंतर्भूत भागीदार व जबाबदार घटकांकडून योग्य पालन केल्या जात आहे किंवा नाही हे देखील पाहावे लागेल असे मला वाटते.

Republic World च्या यूट्यूब वीडियो द्वारे प्रसारित वृत्ता नुसार यंदा दुष्काळाची 60 टक्के शक्यता असून, देशात अंदाजे 90 टक्के पाऊस पडेल व सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची ही शक्यता सर्वसाधारणपणे 80 टक्के इतकी असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

वरील सर्व बाबी पाहता एकूणच परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि शेतीवर पडणारा त्यानुषंगाने महागाईवर पडणारा प्रभाव एकीकडे हैराण करेलच सोबत कमी पाण्यामुळे वीज संकट देखील तितकेच तीव्रतेने जाणवू शकते करिता सर्वांनी मनोमन उपलब्ध संसाधनांचा अतिशय काटकसरीने वापर करणे आवश्यक झाले असल्याचे मला वाटते.

शेतकरी बंधूंनो सावध व्हा :

खासकरून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंनो ऑगस्ट व सप्टेंबर महिना कोरडा जाण्याची शक्यता दाट असल्याचे तज्ञांचे मत असताना आपण पुढील काही ठरावीक गोष्टीचा विचार करून काळजी घ्यावी असे मला वाटते.

  • कमी पाण्यावरील पिकांना पसंती 🌾: पावसाचा खंड पडण्याची शक्यता पाहता, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर येणारी पिके (उदा. बाजरी, मका, तूर, मूग, उडीद) घेण्यास प्राधान्य द्या.
  • पाण्याचे सूक्ष्म नियोजन (Micro-irrigation)💧: उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करा. पिकांना मोकाट पाणी देण्याऐवजी ‘ठिबक’ (Drip) किंवा ‘तुषार’ (Sprinkler) सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करा.
  • आच्छादनाचा (Mulching) वापर 🏖️: जमिनीतील ओलावा (Moisture) दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या दोन ओळींमध्ये पालापाचोळा, वाळलेले गवत किंवा प्लास्टिक मल्चिंगचा वापर करा. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.
  • तज्ज्ञांच्या संपर्कात राहा 🧐: खते आणि फवारणीचे नियोजन करताना स्थानिक ‘कृषी विज्ञान केंद्र’ (KVK) किंवा कृषी सहाय्यकांच्या संपर्कात राहा आणि हवामानाच्या अंदाजानुसारच फवारणीची कामे हाती घ्या.

थोडी दिलासा देणारी बातमी :

सोबतच एकीकडे थोडी दिलासा देणारी बातमी देखील एकायला मिळत आहे की, पॉजिटिव आयओडी (Positive IOD – इंडियन ओशन डिपोल) जसे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढले की, अमेरिका चीन व पूर्व आफ्रिकेत अतिवृष्टी जन्य परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे अरबी समुद्रात पाण्याचे पृष्ठभागावरील तापमान वाढले की, त्यास पॉजिटिव इंडियन ओशन डिपोल म्हणतात आणि यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होते.

पण जरी असे असले तरी निनो चा प्रभाव बैलेंस होऊन नेमका किती पाऊस पडेल हे सांगणे आजघडीला अवघड आहे. आणि औषधापेक्षा उपाय बरा असे म्हणल्यासारखे निनो च्या दीर्घकालीन प्रभावाचा विचार करता जसे की, मार्च 2027 पर्यंत हा प्रभाव दिसेल असे तज्ञांकडून सांगितले जाते आहे त्यास लक्षात घेता. परिस्थिती हाताबाहेर जाण्या पासून रोखणे व सर्वंकष विचाराने नियोजन करणे उचित ठरेल असे वाटते.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Home
Search
Menu
×