DCU चे Green Lantern पात्र आवडणाऱ्यांसाठी खुश खबर! येत आहे नव्या रूपात
Marvel Cinematic Universe (MCU) व DC UNIVERSE मध्ये नेहमीच फैन फॉलोअर्स मध्ये तुलनात्मक युद्ध सुरू असते. या युद्धात हल्ली काही काळापासून DC युनिव्हर्स चे पारडे मागे पडल्या सारखे वाटत असताना व आधीच एक ग्रीन लैंटर्न चा अश्यातला चित्रपट फारसा गाजला नसताना पुन्हा एकदा एका नव्या युक्ती ने हे पात्र प्रेक्षकांच्या समोर आणण्याच्या प्रयत्नात DC आहे.
हे तुम्हाला माहीत आहे का?
बऱ्याच लोकांना कदाचित प्रश्न पडतो की, ग्रीन लैंटर्न हे पात्र म्हणले की, कथेमध्येच किंवा पात्रातच नव्हे तर पूर्ण मूवी किंवा सीरियल चीच storytelling बदललेली आपल्याला पाहायला मिळाली मग त्यात MCU च्या फॅन्स ना हा DC कडून केलेला अत्यंत कमकुवत प्रयत्न वाटू शकतो पण मूळ पात्रा मागील गोष्ट अशी आहे की, बॅटमॅन किंवा सुपरमॅन सारख्या कथानकांत जशी कथा सहसा एका पात्रा भोवतीच फिरते असते पण तशी ग्रीन लैंटर्न ला दाखवताना केल्या गेलेले वेगवेगळे प्रयत्न आपल्याला दिसण्या मागचे मूळ कारणच असे आहे की, ग्रीन लैंटर्न कोणी एक व्यक्ती नसून संपूर्ण ब्रम्हांडाचे रक्षण करणारी एक मोठी संकल्पना आहे.
ग्रीन लैंटर्न चे मुख्य हेड क्वार्टर : ओआ ग्रह
ओआ ग्रहावर निळ्या एलियन्स ने एका कंदिलात हिरव्या ऊर्जेला साठवून ही टीम निर्माण केली आणि हीच कंदिलाची ताकद मग रिंग ला चार्ज करत असते जी रिंग आपल्या वापरकर्त्याला त्याच्या कल्पनाशक्ती इतके ताकदवान बनवते कारण कल्पनेत येईल ते सत्यात उतरवण्याची (वस्तू किंवा शस्त्र बनवण्याची) क्षमता या रिंग मुळे वापरकर्त्याला मिळते. अशा प्रकारे प्रचंड क्षमता असलेले हे कंदील (लैंटर्न) काही वीकनेस देखील सोबत आणते जसे की, पिवळा रंग जिथे असेल तिथे ही शक्ती निरुपयोगी ठरते.
ग्रीन विरुद्ध पिवळी रिंग
या पिवळ्या रंगाचा आणि ग्रीन रंगाचा DC मध्ये संबंध खूप खोलवर नेला आहे. कारण मुळात DC म्हणजे Detective Comics म्हणून पब्लिश झालेले कॉमिक्स मध्ये फक्त ग्रीनच नाही तर ऑरेंज, पिवळा, जांभळा, लाल, निळा, इंडिगो अश्या वेगवेगळ्या रंगात हे रिंग व त्यांची वेगवेगळ्या ताकदीची व विचारांची सेना दिसून येते पण, आतापर्यंत तरी ग्रीन लैंटर्न वरच चित्रपटे निघाली व आता याच महत्त्वाकांक्षी पात्राला अगदी विचार पूर्वक मूळ थीम मध्ये म्हणजेच डिटेक्टिव टास्क फ़ोर्स च्या रूपात आणि विशेष म्हणजे मालिके द्वारे जिचे नाव LANTERN ठेवले आहे. (पहिल्या सीज़न मध्ये 8 भाग असतील अशी माहिती आहे) HBO व HBO MAX वर येत्या 16 ऑगस्ट पासून आणल्या जात आहे.
आधी काय बघाल?
2023 अगोदर DC Extended Universe मध्ये येणारे विविध चित्रपटे व मालिका यांत MCU इतकी फारशी इंटरकनेक्टिव्हिटी नव्हती मात्र 2024 नंतर James Gunn and Peter Safran यांच्या कडे सूत्रे आल्यानंतर आता DCEU चे DCU होऊन बरेच बदल दिसायला लागले आहेत. यापैकीच एक बदल म्हणजे या अंतर्गत येणाऱ्या चित्रपटांत आता बऱ्यापैकी कनेक्टिविटी बघायला मिळेल आणि मालिका आणण्या मागे त्यांचा हेतू निश्चितच व्यावसायिक असला तरी चित्रपटांची व मालिकेंची एकत्र गुंफण आता करायला DC सुरुवात करत आहे. तेव्हा जर तुम्ही 2025 मध्ये आलेला SUPERMAN पहिला नसेल तर तो पाहून मगच ही मालिका पाहणे मला तरी योग्य वाटते.
नवीन मालिका प्रीमियर : 16 ऑगस्ट 2026
नव्या DCU मध्ये LANTERN मालिका एक अति महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यातून dc एक नवी ओळख बदलू पाहत आहे. तांत्रिक दृष्ट्या DC हे MCU च्याही आधी 4 वर्षे म्हणजे 1934 ला पब्लिश झाले पण लोकप्रियतेच्या तुलनेत MCU मात्र बाजी मारते. पण 2024 नंतर नव्याने एकप्रकारे DC ला उजाळा देण्याचे किंवा एका छता खाली आणण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. येत्या 16 ऑगस्ट ला LANTERN नावाने मालिकेत आरोन पेयरे व कायल चांडलर व नेथन फिलियन हे प्रमुख भूमिकेत दिसतील.
SPOILER 🤪
ट्रेलर मध्ये सिनेस्ट्रा हे कॉमिक्स च्या रुपरेषेतील खलनायकी पात्र दाखवले आहे याचा अर्थ कदाचित आता हे नवीन DCU लोकप्रिय MCU पेक्षाही अति व्यापक होण्याची दाट शक्यता आहे. कारण फक्त लैंटर्न ह्या एका विषयावरच (उदा. ग्रीन, येलो, ऑरेंज, ब्लैक, व्हाइट इत्यादी…) असे कित्येक पात्र आणून कथेची मांडणी विस्तृत केल्या जाऊन पुढे यात खूप रंजकता आणता येऊ शकते त्यात विशेष म्हणजे अमेरिकेतील व जगातील आवडीचा विषय म्हणजे क्राइम ड्रामा सीरीज मध्ये ही पात्रे आणून गुंतागुंतीची अशी भव्य व व्यापक कथा संरचना मांडण्याचे प्रयत्न केल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अश्याच नव नवीन माहिती व समिक्षणा करिता आम्हाला फॉलो करा.






