Home / अपडेट / दि. २८ जुलै २०२६ चे विशेष वृत्त व विचार

दि. २८ जुलै २०२६ चे विशेष वृत्त व विचार

28 July Dinvishesh and Aajcha Vichar in Marathi blogpost

दि. २८ जुलै २०२६ चे दिनविशेष

वाचकहो नमस्कार! आपण बातम्या रोजच वाचतो किंवा पाहतो पण ही माहिती आपण बहुधा वृत्तपत्रे वाचून किंवा प्रसार माध्यमांवर पाहून मिळवतो. यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात आवश्यक असणारा तटस्थपणा त्या ठिकाणी आपसूकच सोबत येतो आणि सर्व गोष्टी जणू वातावरणात रुक्षतेची जाणीव अधिक तीव्रतेने करून देतात.

याच रुक्ष वातावरणात सकारात्मकतेचे चैतन्य व विवेकाचा दृष्टिकोन आणण्या करिता या ओपिनियन जर्नलिजम प्रकारातील Kridavishwa.in या ब्लॉग ची सुरुवात झाली आणि या ठिकाणी नुसत्या बातम्या व फॅक्ट्स आपल्याला वाचायला मिळणार नसून त्यावर खऱ्या मानसिक भावनेचे प्रतिबिंब आपल्याला वाचायला मिळेल असा माझा प्रयत्न आहे.

या प्रयत्नातूनच आपल्या अपडेट कॅटेगरी मध्ये ‘दिनविशेष व आजचा विचार‘ लेखात आज इतिहासात काय घडले यापेक्षा आज दिवसभरात झालेल्या जगभरातील लक्ष वेधून घेणाऱ्या आजच्या काही ठळक घडामोडी व त्यावरील माझे मत मी आपल्या समोर मांडत आहे. याठिकाणी आजचा विचार हे दोन्ही अर्थाने वापरले आहे ते असे की, चालू घडामोडीं वरील माझे मत व एक हितचिंतक म्हणून आजच्या काळानुसार आवश्यक आहे असा मला वाटतो तो विचार.

शक्यतो माझा प्रयत्न असेल की, अपडेट कॅटेगरी मध्ये ‘दिनविशेष व आजचा विचार’ किंवा ‘अपडेट्स व आजचा विचार’ सत्रात मी आपल्याशी चालू घडामोडींच्या संदर्भात संवाद साधू शकेल. हा केलेला प्रयत्न आपल्याला कसा वाटतो व माझ्या मतांशी आपण सहमत आहात की नाहीत हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल ते आपण मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज द्वारे नक्की कळवा. या प्रयत्नांची आपण प्रशंसा केल्यास मला आणखीन बळ मिळेल व काही चुकीचे वाटल्यास पुनर्विचारा अंती ते ही दुरुस्त करण्याचे माझे पूर्ण प्रयत्न राहतील.

चला तर मग, आजचे दिनविशेष पाहू :

(आपल्याला जास्तीत जास्त बातम्या एकाच दृष्टिक्षेपात दिसाव्यात या करिता मजकूर लपवला आहे फक्त विषय समोर आहे मजकूर दिसावा याकरिता विषयाच्या सुरुवातीस असलेल्या > यावर क्लिक करावे )

मेकेदातू धरण आणि कावेरी पाणी विवाद : तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री व माजी अभिनेते म्हणून सी. जोसेफ विजय यांची कारकीर्द….

तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री व माजी अभिनेते म्हणून सी. जोसेफ विजय यांची कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून सुरू झाल्यापासून सतत चांगल्या चर्चे मध्ये आहे. त्यांनी घेतलेले बरेचशे निर्णय बऱ्याच लोकांना आवडत आहेत आणि त्यांना पुढील पंतप्रधान म्हणून बघण्यासाठी देखील चाहते व कदाचित पक्षातील काही कार्यकर्ते देखील तयार आहेत.

पण आज चर्चेत असण्या मागे त्यांचे मा.पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेले पत्र कारण आहे. (मूळ बातमी येथे वाचा.) कर्नाटकातील कावेरी नदीवर धरण बांधून तमिळनाडूला पाणी सोडण्याविषयी निर्णयाची चर्चा असताना, सर्वोच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकार ला धरण बांधणी करिता तामिळनाडू सरकारची परवानगी ची आवश्यकता नसल्याचा निर्णय ( सर्वोच्च न्यायालयाचा 2018 चा निर्णय ) या पत्राला मुख्यत्वाने कारणीभूत असल्याचे समजते.

या पत्रातून मुख्य मंत्री सी. जोसेफ विजय यांनी मा. पंतप्रधानांना धरण बांधणी विषयी कर्नाटक सरकारला कुठलीही परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे

जन नायकन’ (Jana Nayagan) चित्रपट आणि राजकीय क्रेझ : जन नायकन हा थलपती विजय म्हणजेच तमिळनाडू राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय ह्यांच्या अभिनय कारकिर्दीतला शेवटचा पिक्चर …

जन नायकन हा थलपती विजय म्हणजेच तमिळनाडू राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय ह्यांच्या अभिनय कारकिर्दीतला शेवटचा पिक्चर मुख्यमंत्री होण्या आधी ह्या पिक्चर ची सुरुवात झाली आणि आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले सी. जोसेफ विजय हे मुख्यमंत्री झाल्यापासून कुठल्या न कुठल्या निर्णयावरून अगदी विशेषकरून चर्चेत आहेत.

आणि राजकारणातील इतिहासात क्वचितच आढळणारी घटना म्हणजे त्यांच्या विषयी वाईट प्रसिद्धी कमी (नसल्यात जमा) व चांगली प्रसिद्धी जास्त होत आहे. एवढेच नव्हे तर, आंध्र प्रदेश चे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून सी.जोसेफ विजय यांची प्रशंसा केली आहे. तेव्हा 23 जुलै 2026 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला एक वेगळीच प्रसिद्धी व वलय प्राप्त झालेले आहे. आणि खूप अपेक्षा असलेल्या या चित्रपटाने कमाई देखील जोरदार केल्याची माहिती आहे.

परंतु रिलीज होण्या पूर्वी पायरेसी अंतर्गत लीक झालेला हा चित्रपट अजून चर्चेत येतो व जनसत्ता वृत्तपत्रातील माहिती आधारे रिलिज नंतर चारच दिवसात जवळजवळ 100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाने मात्र रसिकांची निराशा केल्याचा सूर आहे. या चित्रपटातील थलपती यांचा अभिनयाचे एकीकडे कौतुक होताना दिसून येत असले तरी चित्रपटाच्या कथानका बाबत मात्र चाहते फारसे प्रभावित झाल्याचे दिसले नाहीत.

फिफा वर्ल्ड कप आणि अर्जेंटीना विवाद : नियमांचा भंग केला म्हणून पुढे चालून संघावर बंदी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फिफा वर्ल्ड कप मधील इंग्लंड विरुद्ध सामन्यात जी निदर्शने करण्यात आली यावरुन चांगलेच वादंग पेटले आहे. फिफा वर्ल्ड कप च्या वतीने या संबंधी तपासा करिता एक समिती देखील नेमली आहे. थोडक्यात अर्जेंटिना च्या फुटबॉल टीम च्या खेळाडूंनी राजकीय विषयावरील पोस्टरबाजी फिफा विश्वचषकात केल्याने त्यांच्या नियमांचा भंग केला म्हणून पुढे चालून संघावर बंदी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.


✨ आजचा सुविचार

स्वतः चे मुल्यमापण अवश्य करा पण, त्या साठी दुसऱ्यांचा नाही तर स्वतः चा तराजू वापरा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Home
Search
Menu
×