Home / अपडेट / IND A Vs SL A यश भारताच्या पारड्यात, वैभव, तिलक, यश खरे मानकरी.

IND A Vs SL A यश भारताच्या पारड्यात, वैभव, तिलक, यश खरे मानकरी.

A dramatic, cinematic digital illustration of a cricket batsman wearing a blue jersey with the number 45 on the back, forcefully striking a glowing, fiery cricket ball high into the air. The action takes place in a packed, brilliantly lit stadium at night under towering floodlights. The energetic crowd is cheering loudly and waving Indian flags, while the digital boundary boards in the background vividly display the word 'SIX!'."

IND A Vs SL A मॅच .

आजच्या सामन्यात उपलब्ध माहिती नुसार भारत ए: कडून खेळणार प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा (कप्तान), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, निशांत सिंद्धू, अनुकूल रॉय, विपरज निगम, अशोक शर्मा, यश ठाकुर। 

श्रीलंका ए: निरोशन डिकवेला (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, नुवानिदु फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, साहन अराचिघे (कप्तान), रविंदु फर्नांडो, वानुजा साहन, मोहम्मद शिराज, विजयकांत वियासकांत, दुलाज सामुदिथा, कुगाथस माथुलन।

इंडियन एक्सप्रेस (मूळ बातमी येथे वाचा) मधील वृत्ता नुसार हा अंतिम सामना दांबुला येथील ‘रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम’ वर खेळवला जात आहे. या सामन्यात ‘श्रीलंका ए’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ‘इंडिया ए’ संघाने 50 ओवर मध्ये 9 बाद 377 धावा केल्या.

सामन्यात सुरुवातीलाच युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जो ‘लिस्ट ए’ (List A) क्रिकेटमधील एक नवा विश्वविक्रम ठरला आहे. याआधीच्या सामन्यातील वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता, त्यामुळे या अंतिम सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचे विशेष लक्ष असणे स्वाभाविक होते तरी अंडर प्रेशर असून त्याने त्याच्या खेळात तसे दिसू दिले नाही. असे मला वाटते आणि या सामन्यात चांगला खेळ खेळण्याचा जरी पूर्ण प्रयत्न झाला तरी वैभव पहिल्या 3 उत्कृष्ट (टॉप 3 ) मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आणि तिलक प्रथम क्रमांका वर जाण्यात अपयशी ठरले. आपले या विषयीचे मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

सुर्यांश शेडगे, निशांत सिंधू, विप्रज निगम यांचे या सामन्यात फलंदाजी च्या रूपाने विशेष योगदान दिसले नाही, तरी अनुकूल रॉय ने शेवटच्या टप्प्यात 15 चेंडूत 39 रन काढून 377 धावांचे आव्हान उभे करण्यात मोठी मदत केली.

श्रीलंके कडून सदिरा आणि सहान यांचे खेळातील प्रदर्शन उत्तम होते. पण भारतीय वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि कर्णधार तिलक वर्मा यांनी ह्या दोन विकेट घेतल्या मुळे खेळाचे चित्र पालटले असे म्हणायला हरकत नाही.

15:39 ते 18:40 पर्यंत

भारतीय संघाने एक उत्तम धावसंख्येचे लक्ष्य श्रीलंके समोर ठेवले पण श्रीलंकेच्या खेळाडूंचे देखील तितकेच कौतुक आहे कारण 378 रणांचे लक्ष्य ठेवून देखील संघाने उत्तम प्रकारे धावसंख्येला गाठण्याचे प्रयत्न दाखवले. श्रीलंकेच्या तिसऱ्या विकेट नंतर सातवी विकेट पदे पर्यंत लढा जोमाने दिल्या गेला आणि 34 ओवर मध्ये 6 विकेट आणि 245 धावांपर्यंत पोहोचले पण वानुजा सहान यांच्या विकेट नंतर मात्र श्रीलंकेचे खेळाडू फारसे खेळू शकले नाही. आणि 47 ओवर मध्ये शेवटी 9 विकेट 311 धावांपर्यंत गेल्यावर भारताला श्रीलंकेला थांबवण्यात यश आले. आणि भारत चॅम्पियन बनला.

02:52 ते 15:39 पर्यंत

यश यांनी तिसरी विकेट नवानिदू फर्नांडो यांची घेतली त्यांनी 21 रन काढले आणि सध्या 15 ओवर मध्ये श्रीलंकेचे 3 विकेट 110 रन झाले आहेत.

01:02 ते 14:52 पर्यंत

श्रीलंकेला अजून एक मोठा धक्का देण्यात यश ठाकूर याना यश आले आणि निरोशन डिकवेला याना 25 रणांवरच आउट केले. श्रीलंकेची सध्या 5 ओवर मध्ये 2 विकेट 35 रन अशी स्थिती आहे.

श्रीलंकेची देखील चांगली सुरुवात झाली असे म्हणता येईल पण लगेच म्हणजे 2 ओवर नंतर (02:40 च्या सुमारास) भारताला पहिली विकेट मिळवून देण्यात यश ठाकूर याना यश आले, त्यांनी अविष्का फर्नांडो याना 3 रणांवरच आउट करत श्रीलंकेला लगाम लावण्याचा प्रयत्न केला.

सुर्यांश शेडगे, निशांत सिंधू, विप्रज निगम यांनी अनुक्रमे 2 , 16 आणि 27 धावा काढत लवकरच पॅवेलियन चा मार्ग पकडला त्यानंतर अनुकूल रॉय यांनी 15 चेंडूत 39 रन काढून एकूण भारतीय ए संघाने 377 धावा काढल्या व श्रीलंके समोर 378 धावांचे लक्ष्य उभे केले.

12:41 ते 13:02 पर्यंत

कुशाग्र आणि तिलक यांच्यातील अर्धशतकिय पार्टनरशिप मुळे भारताचे 40 ओवर मध्ये 5 बाद 288 इतक्या धावपर्यंत खेळी पोहोचली. कुशाग्र 36 रन काढून आउट झाले तर कॅप्टन टिलक वर्मा 67 रन काढून आउट झाले.

10:54 ते 12:41 पर्यंत

वैभव आणि प्रियांश आर्या बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्मा यांनी ५० हून अधिक धावांची मजबूत भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड बाद झाला असून, तिलक वर्मा आणि सूर्यांश शेडगे सध्या मैदानावर चांगली फलंदाजी करत आहेत.

10:05 ते 10:54 पर्यंत

सिरीज कोण जिंकणार मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा! आज दिनांक 21 जून रोजी सकाळी 10:05 च्या सुमारास मॅच सुरू झाली तेव्हा वैभव सूर्यवंशी आणि आर्या मैदानात उतरले आणि वैभव च्या जोरदार सुरुवाती कडे पाहून आज नक्की धावांचे टारगेट मोठे राहील असे वाटत होते आणि केवळ 29 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकार ह्यांच्या जोडीने 94 धावा काढत धमाकेदार योगदान दिले आणि प्रियांश देखील 29 चेंडूत आऊट होऊन पॅवेलियन मध्ये परतले प्रियांश आर्या यांनी 6 चौके आणि 1 षटकार यांच्या मदतीने 39 रन बनवले.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.