Mobile buying guide
प्रास्ताविक
सगळ्यांना नमस्कार, मित्रांनो आज आपले जग मोबाईल च्या अवतिभवती गुरफटून बसल्यासारखे जर कोणाला वाटत असेल तर घाबरू नका तुम्ही एकटे नाही आहात. पण हो निश्चितच आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले हे छोटेसे यंत्र; ज्याचे मूळ काम व उद्देश्य आपले एकमेकांशी संपर्क करून द्यायचे आहे, तेच आपले संपर्क तोडत तर नाहीयेत ना हे एकदा नक्की तपासा. आणि जरी काळा च्या ओघात ह्या यंत्राने संपर्काच्या व्यतिरिक्त आपली उपयोगिता सिद्ध केली असली तरी संपर्क हा मूळ मुद्द्यांपैकी एक प्रमुख मुद्दा नेहमी राहावा हीच माझी तरी इच्छा आहे.
मित्रांनो, आपले या mobile बद्दल काय मत आहे, हे सांगायला मुळीच विसरू नका. आपण आपले मत कमेंट बॉक्स मध्ये सर्वांना वाचण्यासाठी लिहा जेणेकरून आपण सर्वजण यावर अजून चर्चा करू शकू. आपले मत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
तर मित्रहो, आपले फ्रेंड सर्कल असेल अथवा आपले नातेवाईक असतील प्रत्येक जण आज मोबाईल चा वापर करतोच पण नुसता वापर करायचा म्हणून किंवा आवश्यक आहे म्हणून वापर करणारे लोकं, मला वाटते त्यांची संख्या जवळपास नसल्यात जमा आहे. तर आज फक्त वापर करायचा म्हणून नाही तर हौशीने मोबाईल चे फीचर्स तपासून काय काय सुविधा मिळत आहेत आणि दिसायला मोबाईल कसा आहे हे सर्व मनासारखे असले की मग इतर वस्तू खरेदी करताना सुट्ट्या पैशांचा मोलभाव करणारे आपण हजारो नाही तर लाखो रुपये खर्च करून नवा मोबाईल घेतो, असो यावर आपण पुढे बोलूतच पण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या जगात जेव्हा प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपला ग्राहक बनू शकतो आणि अश्या मोठ्या बाजारपेठेत आपली एखादी वस्तू नुसती विकल्या जात नाही तर ती लोकप्रिय होते हे व्यापारी वर्गांना एखाद्या सुंदर स्वप्ना सारखे आहे. आणि म्हणूनच इथे सुरू होते ती खरी स्पर्धा. मग विचार केल्या जातो की बाजारातील सर्व mobile मधून आपल्या कंपनीचाच मोबाईल लोकं कसे खरेदी करतील आणि लोकांच्या इच्छानुसार त्यात ग्राहकांना हवे ते देण्याचा प्रयत्न पूर्ण करण्यात काही कंपन्या यशस्वी होतात तर काही धारातीर्थी पडतात. आपल्या भारतात अनेक कंपन्या या mobile दुनियेच्या सोनेरी स्वप्नांच्या मागे धावत काळाच्या पडद्या आड कुठे गेल्या काही कळलेच नाही तर काहींनी पूर्ण व्यवसायच बदलला आता ते मोबाईल ऐवजी दुसऱ्या गोष्टीत आपले नशीब आजमावत आहेत.
मग प्रश्न येतो की एवढे अवघड असताना काही कंपन्या इतक्या कमी किमतीत खूप सुविधा असलेले फ़ोन कसे देतात तर दुसरीकडे काही कंपन्या खूप कमी सुविधा असलेल्या मोबाईल ची किंमत खूप ठेवतात आणि विशेष म्हणजे असे मोबाईल घेण्या करिता जत्रेत जश्या राहाट पाळण्या साठी रांगा लागतात अगदी तश्या रांगा लागून हे मोबाईल खरेदी केले जातात. मग खरेच लोकं इतके व्यवहारशून्य झाले आहेत का? नाही तर मग नेमके असे काय आहे जे आज काही कंपन्याना म्हणजे उदा. जसे की, Apple, Samsung, यांना अगदी छान जमते आणि इतराना नाही.
इतिहास
तर मला असे वाटते की, हा विषय समजून घेण्या साठी आपण पुढील प्रमाणे विचार करू आणि मोबाईल चे जग नेमके समजते का ते पाहू. तर प्रामुख्याने काळाचा विचार केला तर आजच्या काळातील mobile आणि पूर्वीचे संपर्काची संसाधने असे प्रथम वर्गीकरण करू कारण आताच मी म्हटले की मुख्य मुद्दा संपर्क राहावा आणि मीच विसरलो तर काय फायदा म्हणून पूर्वी 1832 च्या आसपास चे टेलिग्राफ म्हणून होते, जे की फक्त टिंब आणि रेषा एवढ्या च माहिती आधारे संदेश देऊ शकत होते. याचा देखील विचार व्हायला हवा असे मला वाटते. या अगोदर यंत्रे नव्हती तर व्यक्ती किंवा पशू – पक्षी यांवर ही जबाबदारी दिली जायची. पण नंतर श्रीमान बेल साहेबानी, पहिला टेलिफोन बनवला आणि खऱ्या अर्थाने मानवी मनातील शास्त्रज्ञाला भूक लागली पण तशी ही भूक जास्त पेटली ती म्हणजे मोटोरोला कंपनी ने या गोष्टीत लक्ष घातल्या नंतर ज्यात बऱ्या पैकी पूर्वी जवळपास किलोभर वजनाचे असलेले फोन आणले ज्याना ब्रिक फ़ोन देखील म्हणल्या जायचे जे की त्या फ़ोन च्या बाबतीत अगदी अचूक ठरते कारण फूट भर लांब आणि जवळजवळ किलोभर वजनाचे विटकरी सारखे आकाराचे हे फ़ोन असायचे म्हणून ब्रिक फ़ोन आणि मग छोटे मोठे खूप बदल झाले जे सर्वसामान्यांना त्यावेळी आजच्या सारखे एखादी गोष्ट जशी वणव्या सारखी माहीत होते तशी झाली नसली तरी मोटोरोला आणि इतर कंपन्यांनी ह्या यंत्रा मागील सुप्त क्षमता (potential) ओळखली होती आणि म्हणून काही वर्षातच मोटोरोला यांनी फ्लिप म्हणजेच उघडझाप करणारा mobile आणला पण दुसरी कडे भारता सारखी मोठी बाजारपेठ विचारात घेऊन नोकिया ने जी काही क्रेझ आणली आणि मग फक्त भारतच नाही तर अख्ख्या जगात भारताकडे एक संभाव्य क्षमतापूर्ण बाजारपेठ म्हणून बघितल्या गेले आणि आज ते चित्र अगदी सार्थ ठरत असल्याचे दिसते त्यामुळे फक्त मोबाईलच नाही तर इतर जणू सर्वच गोष्टीमध्ये भारताकडे इतर देशांचा बघायचा दृष्टिकोन काही प्रमाणात अजून सुधारला असे मला वाटते.
आजची परिस्थिती
आता विषय येतो तो आजच्या काळातला नवा स्मार्ट प्लस नेक्स्ट जनरेशन फ़ोन चा ज्यात फक्त स्मार्ट केटेगरी च्या गोष्टी राहिल्या नसून तो एक अति शहाणा फ़ोन झाला आहे 😂; हो हो मी अति शहाणा म्हणालो, त्याला AI कारणीभूत आहेतच पण मी अति शहाणा म्हणण्या मागे कारण आहे ते म्हणजे मुख्यत्वाने त्यातील छुप्या आणि प्राइवेसी ची दररोज नवी व्याख्या लिहिणाऱ्या कंपन्यांचे ऐच्छिक दिसणारे परंतु मुळात छुप्या अटी असणारे एप्लिकेशन्स किंवा OS मधील छुप्या सर्व्हिसेस ज्या सामान्यांना सर्विस देण्या साठी माहिती गोळा करतात आणि ते त्या सर्विसेस उत्तम प्रकारे (निवडक एप्स किंवा टूल्स) देतातही पण तुम्हाला जर माहिती द्यायची नसेल तर तुमच्या कडे दुसरा पर्याय असेलच असे नाही म्हणजे आजच्या युगात आपली माहिती ही देखील एक करेंसी बनली आहे. आणि ज्या वेगाने या सेवा – सुविधांचा विकास होत आहे तुमच्या फ़ोन ची अनिवार्यता आणखी वाढत जात आहे आणि तुमच्या माहितीची किंमत देखील, परतू सर्व भोळ्या ग्राहकांना ह्या विषयी माहिती आज देण्याचा आज तरी मला कुठलाही प्रभावशाली मार्ग सुचत नाही.
आता काही कंपन्या ज्या ह्या रॅटरेस मध्ये मागे पडल्या त्याचे मुख्य कारण म्हणजे मला असे वाटते की ते एक असे ठोस कारण नसून एकापेक्षा जास्त करणे आहेत. कारण ग्राहक पहिले देखील हुशार होता आणि आजही आहे, पण तो फक्त हुशारच नाही तर हौशी देखील आहे त्यामुळेच कधी फ़ोन ला सोन्याचे पाणी लावलेले कव्हर तर कधी हिरे मोत्यांचे कव्हर देखील लावणारे लोक आहेतच. पण अर्थातच, आपल्याला माहिती आहे की असे हौशी लोक संख्येने मर्यादित आहे. तरी आपल्याला स्पेशल वाटावे म्हणून कंपन्या वेळोवेळी स्पेशल एडिशन कॅटेगरी मध्ये काही फ़ोन आणत असतात. ज्यात चित्रपट असतील किंवा एखादे गेम असेल त्याची थीम वापरून मोबाईल ला अजून कस्टमाईज लुक (आवडीनुसार/ त्या थीम सारखा) दिला जातो. पण बहुतांश मध्यम हौशी लोकांसाठी मला वाटते एखादे विशिष्ट फिचर (सुविधा) डोळ्यापुढे ठेवून mobile ला आणखी लोकप्रिय बनवण्याचे प्रयत्न केले जातात. आणि ज्यात मला वाटते की, कंपन्या प्रामुख्याने तीन विभागात त्याचे वर्गीकरण करतात.
वर्गीकरण
ज्यात पहिल्या क्रमांकावर येते ते म्हणजे अत्यंत लोकप्रिय फिचर : कैमरा व डिझाइन; / ज्याला परफॉरमेंस केटेगरी असेही म्हणतात : अर्थातच फक्त एकच गोष्ट मोबाईल मधून दिल्या जात नसल्या मुळे आणि दिसणे हे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे आणि ज्यांनी ह्या गोष्टीचा विचार नाही केला त्या कंपन्या मागे पडल्या किंवा कंपन्यांचे ते मॉडल मागे पडलेले आपण पाहिले असेलच त्यामुळे मुलभूत गोष्ट कोणती द्यायची मोबाईल मध्ये तर त्यात कॅमेरा व उत्तम डिझाईन चा विचार कंपन्यांना करावा लागतो असे मला वाटते. आता परफॉरमेंस केटेगरी मधील फोन मध्ये सर्व वयोगटातील सर्वांना विचारात घेऊन एक दीर्घकाळ टिकणारा असा mobile आणि ज्यात आजच्या काळात ट्रेंडिंग असणाऱ्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न केला जातो ज्यात कॅमेरा देखील आलाच परंतु आता कॅमेरा एक अशी गोष्ट आहे की ह्यातील तांत्रिक बाजू जर लक्षात घेतली तर आपल्या असे लक्षात येईल की, उत्तम सेन्सर आणि प्रकाश उपकरण ह्या सोबतच आधुनिक काळात आफ्टर प्रोसेसिंग करण्या साठी सॉफ्टवेयर ची देखील गरज मोठी आहे आणि जितके मोठे सेन्सर तितका चांगला फोटो परंतु यात कळीचा मुद्दा बनतो तो म्हणजे बॅटरी, मोठ्या सेन्सर साठी आणि प्रकाश उपकरण जे की आज फ़्लैश म्हणून मोबाईल मध्येच दिले जाते आणि ह्याद्वारे काढलेल्या फोटो ला आफ्टर प्रॉसेसिंग मधून छान लुक मिळावा ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी बॅटरी देखील मोठी लागते आणि जर बॅटरी मोठी दिली तर डिझाईन खराब दिसेल आणि रोज वापरण्याच्या वस्तूला चांगला लुक किंवा व्यवहारी आकार नसेल तर ते असुविधेचे मोठे कारण बनून पर्यायाने ग्राहक त्या मोबाईल मॉडल ला नापसंद करतात. आणि बॅटरी कमी दिली तर अर्थातच मोठे सेन्सर आणि आफ्टर प्रोसेसिंग मधून मिळणारा फोटोतील छान लुक मिळत नाही पर्यायाने ग्राहकांना मोबाईल चा कॅमेरा आवडत नाही, तसेच कोणत्याही कैमरा मध्ये फोकल लेंथ, अपार्चर, शटर स्पीड इत्यादी गोष्टी देखील अत्यंत महत्वाच्या असतात पण मोबाईल च्या शब्दातील अर्थानुसार चालता फिरता कुठेही घेऊन जाता येणाऱ्या यंत्रा मध्ये कॉल, इंटरनेट, कैमरा, इ., असे वेगवेगळे फीचर देताना कुठे तरी कंप्रमाइज होऊ शकते किंवा करावे लागते आणि दिवसेंदिवस हेच कंप्रमाइज कमी करण्याचा आणि उत्पादनांना अजून उत्कृष्ट बनवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो.
आणि दुसऱ्या क्रमांकावर येते ते म्हणजे सर्व प्रो कैमरा/ गेमिंग फोन्स : सर्व वयोगटातील लोकाना इथे विचारात घेतलेले नसते फक्त ठराविक ग्राहक वर्गाला जे एकतर उत्तम कैमरा किंवा उत्तम गेमिंग व्हावी ह्या करिता मोबाईल खरेदी करतात अश्यांनाच विचारात घेऊन असे फ़ोन तयार केले जातात. सरळमार्गी विचार केला तर ह्या दोन भिन्न कॅटेगोरी आहे पण एकमेकांना पूरक असल्याने बऱ्याच मोबाईल कंपन्या दोन्ही प्रकारचे ग्राहक ह्यान पसंत पडेल असा एकत्रित दृष्टिकोन ठेवून मोबाईल तयार करतात. फक्त काही ठराविक कंपन्या जसे की, asus कंपनी चे ROG phones किंवा रेडमॅजिक चे फ़ोन हे गेमिंग करणाऱ्या ग्राहकांना मुख्यत्वे विचारात घेऊन तयार केले जातात तरीही पुढच्या फ्लैगशिप कॅटेगोरी मध्ये येणारे हे फ़ोन असल्याने ह्यात सर्वच गोष्टी स्टेट ऑफ द आर्ट म्हणजेच अत्यंत अत्याधुनिक अश्या असतात. आणि म्हणून ह्या कॅटेगोरी मध्ये आपण असे म्हणू शकतो की ही एक सब-फ्लैगशिप किंवा सब-प्रीमियम कॅटेगोरीतील मोबाईल असे म्हणू शकतो ज्यांच्या वर्गीकरणासाठी मुख्य मुद्दा हा किंमत असतो सर्वसाधारण पणे 20 ते 25 हजार भारतीय रुपये आतील फ़ोन परफॉरमेंस कॅटेगोरी मध्ये मोडतात आणि त्या वरील विशिष्ट ग्राहकांना आकर्षित करणारे फ़ोन सर्वसाधारण पणे 25 ते 45 हजार भारतीय रुपये आतील फ़ोन जसे की कैमरा किंवा बेसिक गेमिंग साठी खरेदी करणारे ग्राहक यांना विचारात घेऊन बनवले जातात आणि 45 हजार वरील फोन हे फ्लैगशिप कॅटेगोरी मध्ये मोडणारे फ़ोन असतात ज्यात सर्व गोष्टी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असतात. पण सर्वच मोबाईल किंवा एखाद्या मोबाईल मध्ये सर्वच काही भेटेल हे मात्र सगळ्यात महागड्या फ़ोन मध्ये देखील पाहायला मिळत नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे खरेदी करताना कोणता मोबाईल आपल्या गरजेला साजेसा आहे त्यानुसार खरेदी करणे.
आता वर दिलेली माहिती खरीच उपयोगी पडावी म्हणून अजून एक महत्वाची गोष्ट जी आपण सहसा माहीत असून देखील नेमकी वेळेवर विसरतो आणि मग घरी आल्यावर असे वाटते की अरे ह्या मोबाईल मॉडल पेक्षा दुसरा मोबाईल घ्यायला हवा होता असे होऊ नये म्हणून काही प्रमुख कंपन्यांचे वरील निकषांवर आधारित वर्गीकरण करून आपल्या समोर सादर आहे. आता सध्या तरी AI हे विकसित होत असल्याने ह्यांची अजून तरी एखादी स्वतंत्र कॅटेगोरी झालेली दिसत नाही पण निश्चितच येणाऱ्या काळात (लवकरच) ही देखील एक वेगळी कॅटेगोरी असेल असे मला वाटते. आणि पुढील कॅटेगोरी मध्ये फोल्डेबल किंवा इतर डिझाईन संबंधी कॅटेगोरी वेगळी दिली नाही कारण ती एकतर सर्व कंपन्यांकडे आहेच असे नाही आणि दुसरे म्हणजे ते डिझाईन ह्याच कॅटेगोरी मध्ये येऊ शकते कारण तीनही प्रकारातील फ़ोन हे फोल्डेबल असू शकतात. पुढील वर्गीकरण हे प्रामुख्याने बहुतांश ग्राहक वर्गाला विचारात घेऊन ठरवलेले आहे असे दिसते.
टिप्स
- जसे की, माझ्या मते Vivo कंपनी चे T Series चे फ़ोन (परफॉरमेंस कॅटेगरीस) चे फ़ोन असतात.
- तसेच, Vivo कंपनी चे V Series चे फ़ोन (Stylish Camera Phones) असतात.
- आणि, Vivo कंपनी चे X Series चे फ़ोन (Premium Flagship) चे फ़ोन असतात.
- तसेच, माझ्या मते Oppo कंपनी चे Reno Series चे फ़ोन (Stylish Camera Phones) असतात.
- आणि, Oppo कंपनी चे F/K Series चे फ़ोन (परफॉरमेंस कॅटेगरीस) चे फ़ोन असतात.
- व Oppo कंपनी चे Find X Series चे फ़ोन (Premium Flagship) चे फ़ोन असतात.
थोडक्यात तुम्हाला अंदाज आला असेलच की कंपन्या कश्या प्रकारे उत्पादनांचे वर्गीकरण करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेवा देत असतात. पण माझ्या मते आज बहुतांश ठिकाणी Apple कंपनी च्या बाबतीत कितीही लोक त्यातील चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी जगातील प्रमुख यशस्वी कंपन्या मधली आणि मोबाईल च्या कंपन्या मधली देखील एक प्रमुख कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून ह्या कंपनी कडे जेव्हा बघितल्या जाते ते केवळ ह्या कंपनी चे काम करण्याचा पद्धतीमुळे कारण ह्यात प्रत्येक उत्पादन हे एकाच प्रमुख निकषावर आधारित असते ते म्हणजे “सुरक्षापूर्ण उत्तम गुणवत्तेचे उत्पादन तयार करणे” आणि म्हणूनच लोक देखील हे खरेदी करण्या साठी रांगा लावतात. आता याला कोणी फक्त एका कॅटेगोरीतील फोन्स तयार करणारी कंपनी देखील म्हणेल जे की बरोबर देखील असेल जर आपण ती कॅटेगोरी फक्त प्रीमियम फ्लैगशिप अशी गृहीत धरली तर परंतु भलेही एकाच कॅटेगोरी मधली उत्पादने असली तरी त्यांची गुणवत्ता देखील इतरांपेक्षा निश्चित वेगळी असल्याचे मला वाटते कारण जिथे इतर कंपन्यांचे फ़ोन फक्त 4 ते 5 वर्षे टिकतात तिथे ह्या कंपनी चे फ़ोन 1 ते 2 वर्षे अधिक टिकतात. असे माझ्या तरी निदर्शनास आले आहे. आता किमतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फार काही व्यवहारी नाही हे, पण ह्या अश्या ठराविक कंपन्यांची उत्पादने जो पर्यंत आपण वापरतो त्यांचा यूज़र एक्सपीरियन्स सातत्याने चांगला राहतो की नाही हे देखील विचारात घावे असे मला वाटते. शेवटी पैसा ज्याचा त्याला खर्च करायचा आहे. तेव्हा आपण निश्चितच सुजाण नागरिक आहात आपला निर्णय आम्हाला देखील नक्की कळवा.
तसेच आमचे इतर लेख व विश्लेषणात्मक बातम्या वाचण्या साठी नेहमी kridavishwa.in ला भेट देत रहा.






