Mobile लवकर स्लो होतो ? Advertisement खूप दिसतात?
नवीन मोबाईल घेतल्यावर काही दिवस किंवा महिने अतिशय छान चालणारा Mobile नंतर मात्र स्लो होतो किंवा सततच्या नोटिफिकेशन किंवा जाहिरांतीमुळे आपण वैतागून जातो आणि नवीन मोबाईल घ्यायचा विचार करतो. असा काहीसा अनुभव तुम्हाला देखील येत असेल तर हा लेख तुमच्या साठीच आहे. चला तर जाणून घेऊ असे का होते आणि असे होऊ नये व तुमचा आवडीचा मोबाईल तुम्ही अजून काही दिवस अधिक कसा वापरू शकाल हे पाहू.
Mobile Adware
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मोबाईल मध्ये सर्वसाधारण तीन प्रकारच्या advertisement ( जाहिराती ) आपण पाहतो त्यात प्रथम जिथे इंटरनेट च्या माध्यमातून काही गोष्टी शोधता येतात अश्या वेब ब्राउज़र मध्ये, दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इंटरनेट चा वापर करणारे पण एकाच किंवा विशिष्ट सुविधा देणारे निरनिराळे Apps /ऍप/ मोबाईल एप्लीकेशन, आणि तिसरे म्हणजे पूर्ण पणे मोबाईल च्या स्क्रीन वर कुठेही आणि केव्हाही दिसणाऱ्या जाहिराती.
Web Browser मधील जाहिराती

तर या सर्व जाहिराती कुठे दिसतात हे आपण पाहिले असेलच तरी web ब्राउज़र मध्ये एखादी वेबसाइट ओपन केली आणि त्या वेबसाइट च्या मध्ये असलेला लेख किंवा वेगवेगळ्या प्रकारातील मूळ कंटेंट असतील त्यांच्या डाव्या, उजव्या बाजूस किंवा वर-खाली असे जाहिरातींचे बैनर लावलेले दिसतात ते आपण पाहिले असेलच ह्या अतिशय सौम्य प्रकारातील जाहिराती आहेत.
in app दिसणाऱ्या जाहिराती

ब्राउज़र मध्येच दुसऱ्या प्रकारातील म्हणजे ब्राउज़र एप्लीकेशन मध्ये ब्राउज़र उघडल्या उघडल्या स्वतःहून दिसणाऱ्या तुम्ही न निवडलेल्या बातम्या किंवा एप्लीकेशन चे इतर प्रोडक्ट/ प्रोग्राम किंवा साइट विषयी सुचवलेले बैनर किंवा पोस्ट किंवा लिंक ह्या ठिकाणी फक्त मोबाईल चा विचार केला तर असे बघण्यात येते की, सर्वसाधारण पणे उजव्या व डाव्या बाजूस ह्या जाहिराती नसून फक्त एकदम वरच्या किंवा खालच्या बाजूस बैनर प्रकारात ह्या जाहिराती दिसतात. किंवा सर्च पट्टी च्या खाली एक रांगेने दिलेले दिसतात.
अश्या प्रकारचे जाहिराती देखील सौम्य प्रकारचे असतात. जसे ब्राउज़र च्या बाबत आहे तसेच इतर apps च्या बाबत देखील आहे असे म्हणता येईल कारण ब्राउज़र हे देखील एक ऍप च आहे. आणि आतील जागा ( यूज़र इंटरफेस ) हा जवळ जवळ सारखी असतो किंवा सारख्या प्रकारात घडवलेली असते. फक्त कोणते एप्लीकेशन कसे आहे यावर तेथील जाहिराती पाठविणे सौम्य आहेत की तीव्र स्वरूपाच्या हे ठरते.
Full Screen Ads , पूर्ण मोबाईल ची स्क्रीन भरून दिसणाऱ्या जाहिराती

तिसरा आणि मुख्य त्रास देणारा प्रकार असतो तो पूर्ण स्क्रीन भरून दिसणाऱ्या जाहिराती. या जाहिराती फोटो, वीडियो किंवा कधी कधी काहीच दिसत नाही पण आवाज येत राहतो असेही घडते ते सर्व वापरकर्त्यांच्या मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारे ठरतात 😅 . पण काळजी करू नका योग्य पाऊले उचलून तुम्ही या परीक्षेतून अगदी सहज पास होऊ शकता. आणि तुमच्या मोबाईल ला देखील वाचवू शकता (वेळ गेली नसेल तर 😆) .
Bloatware, System Bloatware
वर वेगवेगळ्या प्रकारात दिसणाऱ्या जाहिराती व त्यांचा होणारा त्रास आपण अनुभवला असेल तर यावर आपण एक गोष्ट विचार केली तर लक्षात येते ती म्हणजे हे नवीन मोबाईल घेतल्या नंतर काही काळाने जाहिरातींचे प्रमाण हळू हळू सुरू होते आणि मग कालांतराने वाढत जाते हे लक्षात येईल. आणि सगळ्याच जाहिराती ह्या पूर्णपणे बंद करणे आजच्या युगात तरी अशक्य वाटत असल्या तरी याला हव्या त्या प्रमाणात मर्यादित ठेवून स्वतः च्या वयक्तिक व गोपनीय माहितीला यातून सुरक्षित नक्कीच ठेवता येते.

यामधील आपले निरीक्षण अगदी बरोबर आहे की, कालांतराने जसे जाहिरातींचे प्रमाण वाढते तसे मोबाईल चा वेग देखील मंदावतो. तर याठिकाणी नेमके काय होत असते हे आपण बघितले पाहिजे. जेव्हा आपण नवीन मोबाईल घेतो त्यात ज्या कंपनीचा मोबाईल घेतला आहे त्या कंपनीचे किंवा त्या कंपनीशी संपर्क करून काही त्रयस्थ एप्लीकेशन बनवणारे ऑपरेटिंग सिस्टम सोबतच त्यांचे एप्लीकेशन इन्स्टॉल करून देतात.
डिलीट न होणारे ऍप कसे बंद करावे
आणि यात काही apps तर आपल्याला डिलीट देखील करण्याची मुभा नसते. त्यांना संगणकाच्या/ मोबाईल च्या तांत्रिक भाषेत ब्लोटवेअर असे म्हणतात. आणि खरी सुरुवात इथूनच होते. जसे की तुम्ही सॅमसंग, जिओमी-शाओमी असे काही कंपन्यांचे फ़ोन घेतले की त्यात हे ब्लोटवेअर बघायला मिळते आणि यात काही एप्लीकेशन मानकित कंपन्यांचे असतात जसे की फेसबुक किंवा नेटफ्लिक्स यांचा व मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या यांच्यातील करारा मुळे ही एप्लिकेशन्स पूर्णपणे डिलीट देखील करता येत नाहीत.
काही मोबाईल्स मध्ये ही apps कधी कधी डिलीट झाल्या सारखी वाटतात. पण मोबाईल फॉर्मेट केल्यानंतर पुन्हा येतात. पण याना नियंत्रित करण्या साठी आपण आपल्या मोबाईल मधीलच एप्स डिसेबल करण्याचे पर्याय निवडून अश्या एप्स पासून सुटका करून घेऊ शकता. किंवा जागेची अडचण असल्यास मोबाईल कम्प्युटर शी जोडून रूट न करता ADB Tool (Android Debug Bridge) हे टूल किंवा कमांड्स वापरून ते कायमचे काढून टाकता येते. आणि रूट केल्यास तर पूर्ण मोबाईल हार्डवेयर सोबत त्याच्या सॉफ्टवेयर वर देखील आपल्याला सत्ता गाजवता येते.
काही मोबाईल्स मध्ये ही apps कधी कधी डिलीट झाल्या सारखी वाटतात. पण मोबाईल फॉर्मेट केल्यानंतर पुन्हा येतात. पण याना नियंत्रित करण्या साठी आपण आपल्या मोबाईल मधीलच एप्स डिसेबल करण्याचे पर्याय निवडून अश्या एप्स पासून सुटका करून घेऊ शकता. किंवा जागेची अडचण असल्यास मोबाईल कम्प्युटर शी जोडून रूट न करता ADB Tool (Android Debug Bridge) हे टूल किंवा कमांड्स वापरून ते कायमचे काढून टाकता येते. आणि रूट केल्यास तर पूर्ण मोबाईल हार्डवेयर सोबत त्याच्या सॉफ्टवेयर वर देखील आपल्याला सत्ता गाजवता येते.

पण रूट करणे हे नवशिक्यांसाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकते. व कंपनी कडून मिळणारे सर्व फायदे यात निघून जातात. त्यामुळे कंपनी मोबाईल रूट करण्या विषयी पूर्ण विरोधात असतात. त्यामुळे सर्वसाधारण पणे बहुतांश लोक रूट करणे टाळतात. आणि खरोखरची सर्वसामान्य वापर असलेले बहुतांश वर्गातील वापरकर्त्यांसाठी ADB टूल ची किंवा कोडिंग/ कमांड वापरण्याची देखील गरज नाहीये.
असे ब्लोटवेअर डिसेबल करून आपण मोबाईल चा बऱ्या पैकी भार खाली करता आणि तुम्हाला मोबाईल मध्ये अनावश्यक apps देखील दिसत नाहीत. डिसेबल करण्या साठी ऍप च्या सेटिंग मध्ये uninstall चे चिन्ह येत नाही तर त्या ठिकाणी डिसबेल चा पर्याय दिसतो त्यामुळे तुम्ही एखादे ऍप जसे uninstall करता तसेच प्रक्रियेद्वारे तुम्ही इनबिल्ट प्री इंस्टॉल्ड ऍप डिसेबल करू शकता.
कोणती काळजी घ्यावी
पण हे झाले ब्लोटवेअर/ ट्रायलवेअर/ इनबिल्ट प्री-इन्स्टॉल्ड ऐप्स च्या बाबतीत त्या नंतर आपल्याला काळजी घ्यायचीये ती म्हणजे आपण कोणत्या वेबसाइट वर जातो आणि तेथील कुठले नोटिफिकेशन्स ऑन करतो याकडे तसेच प्ले स्टोर किंवा इतर कुठले कंपनी चे स्वत: चे ऍप स्टोर असल्यास तेथून कुठले ऍप डाउनलोड करतो आहे याकडे. विवो सारख्या कंपन्या स्वतः चे ऍप स्टोर वरून ऍप डाउनलोड व्हावे या कडे जास्त प्रयत्न करताना दिसते.
apps अधिकृत एप्लीकेशन स्टोर वरूनच डाउनलोड करावे.
याठिकाणी कोणताही गोल्डन रूल नाहीये की इथूनच डाउनलोड करा किंवा इथून करू नका. कारण बहुतांश ठिकाणी चांगली सुरक्षित व सुविधायुक्त एप्स मिळतात. पण आपल्याला या क्षेत्रातील जास्त माहिती नसल्यास एंड्राइड वर गूगल प्ले स्टोर व Apple च्या आयफोन, आयपॅड, व मॅकबुक OS (Operating System ) करीता त्या त्या डिवाईस मधील App Store इथूनच एप्स डाउनलोड करावे. आणि यातही आवश्यक अशीच अप्स डाऊनलोड केल्यास मोबाईल च्या मेमरी व रैम वरती अतिरिक्त भार पडत नाही व मोबाईल फ़ास्ट कामे करतो.
सेटिंग मध्ये काय बदल करावा
बऱ्याचदा असे होते की, आपण असे काही apps वापरतो जे आपल्याला नेहमी नाही पण कधी कधी त्याची खूप गरज असते आणि त्यावेळी जर आपल्या मोबाईल मध्ये ते ऍप नसेल तर गैरसोय होऊन वेळ वाया जातो. अशावेळी वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण मोबाईल मध्ये जर पुरेशी जागा असल्यास असे एप्स डाउनलोड करून ठेवतो जसे उदा. वाढदिवस किंवा इतर तत्सम कार्यक्रम झाला की त्याचे फोटो वीडियो एडिट करण्यासाठी फोटो किंवा वीडियो एडिटिंग चे apps किंवा रेल्वे , टैक्सी सारख्या प्रवासाची काळजी घेणारे बुकिंग apps याची आपल्याला रोज गरज जरी नसली तरी वेळेवर यात वेळ घालण्यात अर्थ नसतो.
नोटिफिकेशन पूर्ण किंवा अंशत : बंद करणे.
म्हणून तुमचा विचार बरोबरच आहे पण अश्या apps डाउनलोड केल्यानंतर त्यांचे रोजचे गरज नसलेले अनावश्यक नोटिफिकेशन्स आपला वेळ व मानसिकता जर खरात करत असतील तर आपण याठिकाणी apps च्या सेटिंग मध्ये त्यांचे नोटिफिकेशन संपूर्णत: किंवा पार्शली म्हणजे हवे तेवढे चालू व हवे तेवढे बंद करून ठेवू शकता.
App Info मधील सेटिंग तपासणे
या करिता सेटिंग मध्ये प्रत्येक कंपनीच्या फ़ोन नुसार वेगळा पर्याय असला तरी एंड्राइड असल्यास मोबाईल स्क्रीन वर दिसणारा ऍप चा आइकॉन थोडा वेळ दाबून ठेवल्यास त्यावर सर्वसाधारण पणे सर्वात वरती डस्टबिन चे चिन्ह नंतर एका वर्तुळात i चे चिन्ह व चौकोनात तिरप्या बाणाचे चिन्ह दिसते. यातील डस्टबिन चे चिन्ह वापरून तुम्ही ते ऍप डिलीट म्हणजे फ़ोन मधून काढून टाकू शकता. तर वर्तुळातील i चिन्हावर क्लिक केल्याने तुम्ही त्या ऍप च्या App info या पानावर जाऊन तेथे Notification शोधून नको असलेले पर्याय बंद ठेवू शकता.
याठिकाणी असलेले इतर पर्याय देखील अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक पर्याया विषयी माहिती घेतल्यास किंवा समजून घेतल्यास आपला मोबाईल चा वापर अजून स्मार्ट होऊन आपला अनुभव लक्षणीय रित्या सुधारू शकतो.
नको असलेले ऍप काढलेलेच बरे
तसेच सांगितल्या नुसार आपण सर्व ऍप चे नोटिफिकेशन तपासून नको असलेले पर्याय बंद केल्यास आपल्याला निश्चितच नोटिफिकेशन मुळे मनस्ताप होऊन मोबाईल बदलावा लागणार नाही. आणि पूर्ण स्क्रीन वर जाहिराती देणारे apps जर आवश्यक नसतील तर ते काढून टाकणेच शहाणपणाचे ठरते ज्यामुळे काळत नकळत चुकून जाहिरातींवर क्लिक होऊन नसतं आणखी काही तरी सेवा संबंधी खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ती शक्यता वगळता येते.
Network Management, App Isolation किंवा Screen Time चा खुबीने वापर
पण जर तुमच्या साठी असे ऍप जे पूर्ण स्क्रीन भरून जाहिरात दाखवतात ते आवश्यक असल्यास ते ऍप जे काम करते तेच काम करणारे इतर पर्यायी apps चा विचार नक्की करावा. आणि तेही अधिकृत एप्लीकेशन च्या स्टोर वरूनच डाउनलोड करून त्याचा वापर करावा. आणि याठिकाणी आपण वेगवेगळे पर्याय करून आपला स्वतः चा सेवा अनुभव व सुरक्षितता वाढवू शकतात.
जसे की एखाद्या ऍप वर विश्वास नसल्यास किंवा ऍप मधील डेटा इतर मुख्य सिस्टम पासून वेगळा ठेवायचा असल्यास नवीन Adroid वर्जन मधील App Isolation हे फीचर वापरू शकता. आणि apple सारखेच मिळते जुळते आता एंड्राइड वरती देखील ‘स्क्रीन टाइम‘ फिचर आले आहे या सारखे पर्याय हुशारीने वापरून या अप्लिकेशन्सना काही वेळच चालू ठेवू शकता किंवा हवे तेव्हा चालू व बंद करू शकता.
तसेच प्रदीर्घ काळा साठी बंद ठेवायचे असल्यास त्या ऍप चा इंटरनेट डेटा Network Management किंवा firewall सारख्या पर्यायांनी इच्छित काळाकरिता बंद ठेवू शकता. वरील प्रकारे सर्व काळजी घेतल्यास तुमचा मोबाईल तुम्ही निश्चितच सध्या पेक्षा जास्त वापर करण्याचा विचार करून पैसे वाचवू शकाल.
आपल्याला या लेखातील कोणती गोष्ट माहीत नव्हती हे कमेंट करून नक्की कळवा आणि या लेखात लिहायची राहिली अशी काही ट्रिक तुमच्या कडे असल्यास तेही नक्की कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या लेखात
अश्याच माहितीपूर्ण व विश्लेषणात्मक लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला नेहमी भेट देत रहा. आमच्या प्रत्येक नवीन पोस्ट चे नोटिफिकेशन आपल्या पर्यंत पहिले येण्या करिता kridavishwa.in ला व्हॉट्सऍप, फेसबुक व टेलिग्राम वर फॉलो करा. 🙏






