Gemini , असेल किंवा इतर AI टूल्स असतील रोजच्या जीवनात त्यांचा वापर दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. अशातच गुगल ने Notebook LLM सेवे अंतर्गत दिलेल्या विविध अत्यंत उपयुक्त सुविधांपैकी वीडियो ओव्हरव्यू ची सुविधा अल्पावधीतच लोकप्रियता गाठत आहे.
याचे कारण असे की, आज रोजी प्रत्येक जण वीडियो पाहण्यात किंवा वीडियो बनवण्यात व्यस्त आहे, अशा परिस्थितीत ही सुविधा अत्यंत उच्च दर्जाचे वीडियो शॉर्ट्स बनवते.
ज्याबद्दल त्यांचे मत “Doom scrolling but make it educational” असे आहे.
Doom scrolling but make it educational 🤓
— NotebookLM (@NotebookLM) June 30, 2026
Introducing Short Video Overviews in NotebookLM! Turn your most complex sources into 60-second, vertical videos that deep dive into any concept.
Rolling out now to Google AI Ultra and Pro subscribers on mobile & web (free users soon!) pic.twitter.com/vaOa4ELbw4
आता नवीन सुविधा – ( video overview )आणि तेही वीडियो बनवणारी सुविधा असल्यामुळे वापरून बघितली पाहिजे या विचाराने मी देखील ती सुविधा वापरायचे ठरवले आणि तीन वेगवेगळ्या प्रकारांत (प्लान घेतलेला असल्यास- सिनेमॅटिक, एक्सप्लेनर, आणि शॉर्ट) वीडियो तयार करता येणारी ही सुविधा विना प्लान घेतल्यावर देखील काम करते फक्त प्रकार आणि वेळेची मर्यादा सारखे काही बंधने लागतात.
परंतु जेवढी मर्यादा जसे की, 10 सेकंदाचा वीडियो जरी म्हणालात तरी अत्यंत प्रोफेशनल दर्जाच्या व्यक्ती कडून तयार करून घेतल्या सारखे उच्च गुणवत्तेचे व्हिडिओज या सुविधे मार्फत तयार करून मिळतात. ज्या योगे मला तरी असे वाटते की ह्या मुळे सहज हे फीचर लोकांच्या अत्यंत पसंतीचे ठरेल आणि अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय होईल.
याचे जुने ऑडियो विषयक फिचर देखील कौतुकाचे पात्र आहे यात दोन व्यक्ती दिलेल्या विषयावर पॉडकास्ट च्या थीम सारखे चर्चा करताना ऐकायला मिळते. व मराठी, हिंदी अश्या स्थानिक भाषेमध्ये देखील हे ऍप अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करत असल्याचे जाणवते. गूगल ने घेतलेली ही भरारी निश्चितच वाखाणन्याजोगी आहे.
गूगल च्या जेमिनी व Notebook LLM ऍप हे अजून कोणत्या नवनवीन सुविधा आणणार याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण AI चे पदार्पन झाल्या नंतर गूगल ने आणलेल्या सर्व नव – नवीन सुविधा अत्यंत उत्कृष्ट बनत चालल्या आहेत. आणि गूगल मुळे मार्केट मध्ये इतर प्रतिस्पर्धी असलेल्या दिग्गजांना देखील घाम फुटताना दिसून येत आहे.
आणि मित्रांनो, मराठीत देखील जवळपास तितक्याच ताकदीने हे मॉडल अत्यंत सुंदर पद्धतीने वीडियो तयार करू शकते. आणि विशेषकरून सांगवेसे वाटते की इतर AI टूल्स प्रमाणे याचा आवाज किंवा वीडियो बनावट न वाटता तो जणू एखाद्या व्यक्तीनेच तयार केला आहे असे प्रकर्षाने वाटते. दिवसेंदिवस ही दरी भरून निघत असली आणि बऱ्याच जणांना धडकी भरवत असली तरीही तंत्रज्ञानाची प्रगती ही रोखण्यात शहाणपणा नाही तर शिकून त्यावर सुविधायुक्त समाज बनवण्यात खरा शहाणपणा आहे असे मला तरी वाटते.
आता तुम्हालाही हे कितपत चांगले वीडियो तयार करू शकते हे मला दाखवायचे होते म्हणून एक सहज उदाहरणासाठी वीडियो तयार केलेला आमच्या फेसबुक पेज वर शेयर केला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. वीडियो पहिल्या नंतर कृपया फेसबुक पेज ला फॉलो कार्याचे विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या ब्लॉग वरील सर्व नवीन पोस्ट व फेसबुक वरील अश्याच आकर्षक गोष्टींविषयी नेहमी वेळेत माहिती मिळेल.
नोटबुक एलएलएम मार्फत ऑडियो ओवरव्यू ची सुविधा आधीपासूनच सुरू आहे त्या सुविधे मार्फत आपण पॉडकास्ट सारखे ऑडियो बनवू शकता आणि यात देखील जे ऑडिओ आहे ते अत्यंत व्यावसायिक दृष्टीने उच्च दर्जाचे तसेच वास्तविक व्यक्तींच्या आवाजातील असल्या सारखे वाटते.
पण निश्चितच नवीन वीडियो ओवरव्यू सुविधा ही एक गूगल / नोटबुक एलएलएम मार्फत वापरकर्त्यांना अत्यंत आकर्षित करत आहे. व अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय सुविधा म्हणून पुढे येत आहे. आणि प्रचंड स्पर्धेचे असे हे क्षेत्र असल्याने इतर AI टूल्स मार्फत काही अश्या सुविधा लवकरच बघायला मिळाल्या तर नवल वाटायला नको.
आपण देखील ह्या सुविधे मार्फत काही वीडियो बनवले असल्यास आमच्या सोबत नक्की शेयर करा, या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये आपण आपल्या सोशल अकाउंट वरील वीडियो ची लिंक देऊ शकता. आम्हाला देखील बघायला नक्की आवडेल.
आमचा ब्लॉग व सोशल अकाउंट नवीन आहेत कृपया अश्याच सर्वसमावेशक व दर्जेदार माहिती करिता आमच्या सोशल अकाउंट जसे फेसबुक पेज, व्हॉट्सऍप चैनल व टेलीग्राम चैनल ला फॉलो करून नवीन येणाऱ्या सर्व पोस्ट वाचण्यासाठी फॉलो करा.






