Home / जीवनशैली / Tour ला जायचे आहे? यंदा पावसाळ्यात ही ठिकाणे नक्की पहा, मिळेल अप्रतिम अनुभव!

Tour ला जायचे आहे? यंदा पावसाळ्यात ही ठिकाणे नक्की पहा, मिळेल अप्रतिम अनुभव!

"यंदा पावसाळ्यात ही ठिकाणे नक्की पहा, मिळेल अप्रतिम अनुभव!" असे शीर्षक असलेले वेगवेगळ्या निसर्गरम्य प्रदेशातील हिरवळ व धुक्याचे कोलाज प्रकारातील चित्र, "नक्की वाचा" या कॉल टू एक्शन बटन सह.

निसर्गाची जादू!

पावसाळा आला की प्रत्येकाला मग लहान असो की वयस्क घरात अडकून पडल्या सारखे वाटणे स्वाभाविकच आहे यात श्रमिक वर्ग कामासाठी बाहेर पडतो पण त्याचा संबंध येतो तो वाटेत असलेला तो चिखल, गटारींचे रस्त्यावर तुंबलेले पाणी, त्यातही एखादे उघडे मोठे खड्डे किंवा त्याहून भयंकर असे उघडे मॅनहोल तर नाही ना याची भीती, त्यात शेतकरी वर्गाला निसर्गाचे सानिध्य असतेच नाही असे नाही पण कामाचा ताण देखील खूप असतो

असो कामे नेहमी राहतातच पण माणसाच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तरी मला असे वाटते की जर शक्य झाले तर निसर्गरम्य वातावरणात काही काळ आपण दरवर्षी घालवला पाहिजे व तेथील स्वच्छता ठेवून निसर्गाचे पावित्र्य देखील जपले पाहिजे जेणेकरून मला तरी असे वाटते की, पावसाळ्यात जसे जमिनीवर पाणी पडून रोपांना नवसंजीवनी मिळते तसेच माणसाच्या मनाला देखील रोजच्या धकाधकी च्या आयुष्यातून काही काळ निसर्गाचे सानिध्य मिळाल्यास नवचैतन्य मिळाल्या शिवाय राहणार नाही.

तर मग कुठे जाताय या वर्षी फिरण्या साठी?

बऱ्याच वर्षांपासून पावसाळा म्हणले की लोक सर्वसाधारण पणे गर्दी करतात ते धबधबे, डोंगर दर्या असलेली ठिकाणे पण यंदा लोहगडा सारख्या गडांची जर भीती वाटत असेल तर 😂. नाही म्हणजे चेष्टेचा विषय सोडला तरी नेहमीचे जवळपासचे ठिकाणे पाहून झाले असतील व तेच तेच पाहून कंटाळ आला असेल तर पुढील काही ठिकाणे निश्चितच एक छान चेंज ठरेल.

कुर्ग (कर्नाटक) / Coorg ( Karnataka )

कुर्ग हे कर्नाटकातील पश्चिमी घाटांमध्ये वसलेले एक अतिशय नयनरम्य असे हिलस्टेशन आहे. Coorg मध्येही Madikeri हे अत्यंत लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आसून या मध्ये Abbey धबधबा, राजाची खुर्ची, मादिकेरी किल्ला, ही आकर्षक ठिकाणे आहेत तसेच मडिकेरी बाहेर साधारण तासभराच्या अंतरावर दुबारे एलिफंट कैंप, तडिंदमौल पीक असे एकाहून एक इतर छान ठिकाणे देखील आहेतच. पण अजूनही महत्वाचे म्हणजे ही ठिकाणे नुसतीच सुंदर नाहीत तर या ठिकाणी पर्यटनाचे केंद्र म्हणून बऱ्या पैकी लक्ष दिल्या जाते त्यामूळे पर्यटकांची गैरसोय फारशी होत नाही.

तसेच या ठिकाणी सप्टेंबर ते मार्च या महिन्यांत अतिशय सुखद वातावरण असते जे पर्यटनाकरिता खूप छान आहे. इथे पर्यटनासाठी जीप किंवा टू व्हीलर भाड्याने घेऊन फिरू शकता. महाराष्ट्रातून विमानाने जायचे असल्यास 90 किमी अंतरावर जवळ कन्नूर इंटरनेशनल एयरपोर्ट आहे. पण ट्रेन ने जायचे असल्यास मला वाटते मध्ये एखादा हॉल्ट घेऊन जावे कारण अंतर बराच वेळ घेते (सर्वसाधारण पणे 16 तासांच्या वर).

Abbey Falls – (Google Map📍- 12°27’28.7″N 75°42’59.2″E ) नैसर्गिक धबधबा

Abbey फॉल्स ला व्यूपॉइंट वरच जाता येते. मसाल्यांच्या बागांतून 10- 15 मिनिटे सुंदर वातावरणातून पायी जात धबधब्याच्या जवळ hanging पूल आहे जिथून एकूणच सर्व दृश्य अतिशय सुंदर दिसते व अंगावरती पाण्याचे तुषार उडत असल्याने लोक इथे प्रचंड फोटो काढण्यात मग्न असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथे धबधब्याच्या पाण्यात जाता येत नसल्याने धबधब्याच्या पाण्यात पोहणे, स्नान/अंघोळ इथे कोणाला करता येत नाही. आणि सुरक्षेच्या दृष्टीने तिथे पोलिस देखील असतात त्यामुळे एकूण अनुभव खूप छान होतो.

कारण निसर्ग सुंदरच आहे हो, पण माणूसच त्याच्या वागण्यातूनच इतरांचे व पर्यायाने स्वतः चे देखील पर्यटनाचे जे चांगले अनुभव त्यांना घेता येऊ शकतात ते खराब केल्या जातात. शिस्त आणि माणुसकीतून आपण आपला एकंदर सामाजिक अनुभव सुधारू शकतो. असे मला वाटते. तसे तिथल्या पायऱ्या सततच्या सांडणाऱ्या पाण्यामुळे निसरड्या होतात तर जाण्या अगोदर बूट चांगले पकड असलेलेच निवडा. तसेच तिथे पाण्यात जळूंचे प्रमाण देखील बऱ्या प्रमाणात असल्याने त्याकडे देखील लक्ष द्यावे लागते.

कुर्ग मध्ये एकंदरीत प्रवास हा सप्टेंबर ते मार्च महिन्यात करणे लोक पसंत करतात पण आपण फक्त Abbey फॉल्स लाच भेट देणार असाल तर थोडे आधी म्हणजे जुलै पासून पावसाचा सर्वसाधारण अंदाज पाहून जाऊ शकता. पण आपल्यालाही जर माझ्यासारखे शांत धबधबे पाहायला आवडत असतील तर थोडे उशीरच जा. कारण पावसाळ्याच्या सुरुवातीस व मध्यास पाण्याला प्रचंड वेग असतो व धबधबा खूप प्रचंड वेगाने वाहत असतो.

Raja’s Seat (Google Map📍- 12°24’51.4″N 75°44’13.1″E ) मोठे उद्यान

राजा सीट हे एक उत्तम पारिवारिक टुरिस्ट डेस्टिनेशन ठरू शकते या ठिकाणी मोठे असे छान उद्यान आहे. राजा महाराजांच्या काळी ‘कुर्ग’ चे राजे त्यांच्या राणी सोबत सूर्यास्त बघण्यासाठी येत. त्यामुळे इथले नाव राजा सीट असे पडले. संपूर्ण परिवारासोबत अश्या ठिकाणी वेळ कसा जातो हे कळत देखील नाही. लहान मुलांकरिता इथे टॉय ट्रेन आहे जी बऱ्यापैकी उद्यानाभोवती छान फेरी मारते. संध्याकाळी म्यूज़िकल फाउंटेन देखील बघायला छान वाटते.

राजा सीट सोबतच मांडळपट्टी ची ट्रेकिंग व जीप एडवेंचर देखील प्रसिद्ध आहे. राजा सीट, Abbey फॉल्स, मांडळपट्टी ही ठिकाणे मडिकेरी मधील प्रमुख आकर्षणाची ठिकाणे आहेत. व एकमेकांपासून जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

Mandalpatti (Google Map📍- 12°29’31.9″N 75°43’04.7″E, ) जीप च्या सोबत ऑफ रोड एडवेंचर

तरुण वर्गाकरिता मांडळपट्टी ( Mandalpatti ) मधील ट्रेकिंग हा एक छान अनुभव होऊ शकतो, येथील निसर्गरम्य वातावरणात फारशी गर्दी नसलेल्या कमी गजबजलेल्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत व ट्रेकिंग व जीप मार्फत ऑफ रोड एडवेंचर हा देखील तुमच्या साठी नेहमी लक्षात राहणारा अनुभव ठरू शकतो.

कूर्गचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले Mandalpatti हे एक आव्हानात्मक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी गेल्यावर प्रत्येक ठिकाणी/ वेळी आपली चांगली सोय होईलच असे विचार करून जमत नाही. परत इथे जीप चे भाडे थोडे जास्त वाटू शकते पण हा एक वेगळा अनुभव म्हणून याकडे दुर्लक्ष करणे शक्य होऊ शकते. 😉 , इथे तुम्हाला थोडे आव्हाने झेलण्याची तयारी ठेवावी लागते. इथे वारा सोसाट्याचा असतो आणि पूर्ण वाटेत पाणी किंवा खाणे विषयक सेवा नाही आहे. त्यामुळे बरेच जण सोबत आपली व्यवस्था घेऊन असतात. पण पूर्ण प्रवास व टेकडी वर पोहोचल्यावर अतिशय छान वाटते

मुन्नार (केरळ) / Munnar ( Kerala )

भारतातील दुसरे काश्मीर किंवा दक्षिण काश्मीर म्हणून ओळख असलेले मुन्नार हे निसर्गसौंदर्याने अतिशय समृद्ध असे पर्यटन स्थळ असून येथे बघण्यासारखे खूप काही आहे. जसे की,एराविकूलम राष्ट्रीय उद्यान ( Eravikulam National Park ), अनामुडी शिखर, अट्टुकल व लक्कम धबधबे, पण सुरुवात मात्र थोडी मुन्नार च्या बाहेर तासाभराच्या (32 कि.मी.) अंतरावरील माझी पहिली पसंती असेल ती म्हणजे Kolukkumalai.

पहिला दिवशी

कोलुक्कुमलाई येथील सूर्योदय पाहण्याची करेन यासाठी आधीच जवळ असलेल्या सूर्यनेल्ली ला उतरेल आणि मग सकाळी-सकाळी चार वाजता कोलुक्कुमलाई ला निघेल येथेही जीप चे भाडे थोडे जास्तच वाटते पण हाच एक सोईस्कर पर्याय असतो कारण साधारण 10 ते 15 कि.मी. अंतर आणि अगदी खडबडीत रस्ता पण शिखरावर पोहोचल्यावर मात्र अतिशय नयनरम्य परिसर आपले सर्व विचार थांबवतो.

तिथे निवांत वेळ घालवल्यावर साधारण 10 च्या आसपास थेट मुन्नार ला येऊनच नाश्ता करेन. थोडासा आराम व दुपारचे जेवण केल्यावर अट्टुकल धबधब्या कडे निघायचे येथेही निवांत वेळ घालवावासा वाटतो आणि मग संध्याकाळी काही स्थानिक बाजारात खरेदी कारायची असल्यास करता येते.

दुसऱ्या दिवशी

आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे सात – साडे सात वाजताच एराविकूलम राष्ट्रीय उद्यान येथे तिकिटांची रांग असते तिथे नंबर लावायचा एखाद्या स्थानिक लोकांप्रमाणे किंवा शक्यतो ऑनलाइनच देखील बुकिंग चा पर्याय असतो पण लवकर गेल्यावर जरा काहीतरी हॉलिडे फीलिंग येते 😎. पार्क मध्ये सफारी बसने जावे लागते, या पार्क चे विशेष आकर्षण असलेला दुर्मिळ निलगिरी तहर हा प्राणी जवळून पाहता येतो.

या पार्क मध्येच दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर अनामुडी हे ही आहे, ह्याला खालूनच पाहावे लागते. प्रत्यक्ष शिखरावर जाण्याची परवानगी शक्यतो मिळत नाही. साधारण 12 वाजेपर्यंत निवांत फिरल्यावर मग उदुमलपेट रस्त्याला मुन्नार पासून अंदाजे 30 किमी वर लक्कम धबधब्या कडे जायला निघायचे इथे साधारण चार-एक वाजेपर्यंत वेळ निवांत निसर्ग समृद्ध जंगल व धबधब्याच्या पाण्यात घालवल्या नंतर परत निघता येते.

आपणही असाच सुंदर प्रवासाचा अनुभव घेऊ शकता आणि रोजच्या दैनदिन धकाधकीच्या जीवनातून काही वेळ स्वतः साठी देऊन स्वतः ला रिचार्ज करू शकता. मला शहरात पर्यटनासाठी गेलो की स्थानिकांसोबत बोलायला आवडते त्यामुळे अगदी नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात. पण ज्या वेळी जंगल किंवा निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनासाठी गेल्यावर मात्र शक्यतो मौन रहायला आवडते ज्यामुळे आपल्या अंतर्मनाचा आवाज जरा अजूनच स्पष्ट ऐकायला मिळतो आपणही प्रयत्न करून पहा.

(विनंती: प्रवास कुठेही करताना आपल्या सुरक्षेचा पूर्ण विचार करूनच प्रवास करा.)

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.