तुमचे Mobile Internet ( Web ) Browser Guide
आपण ब्राउज़र smart पणे कसा वापरायचा या विषयी माहिती नक्की घेणारच आहोत पण त्या आधी, त्या ब्राउज़र चा मूळ आधार असलेले ‘इंटरनेट’ च्या विषयी आपणास किती माहिती आहे? आणि, आज जितक्या आनंदाने आपण या इंटरनेट चा वापर करतो त्या विषयी चा थोडा इतिहास आपल्याला माहिती आहे का? मुळात इंटरनेट चा इतिहास हा अतिशय रंजक आहे तो आपण आमच्या संकेतस्थळावरिल पोस्ट : “तुम्ही Internet चा वापर करता? मग जाणून घ्या ‘इंटरनेट’ च्या जन्माची रंजक कहाणी” वर नक्की वाचू शकता.
आता ब्राउज़र चा विषय असेल तर काही जणांना असे वाटणे साहजिकच आहे की ब्राउज़र विषयी एवढं विचार करायची काय गरज आहे. आहे त्या ब्राउज़र मध्ये सर्व कामे व्यवस्थित पणे करता येत आहेतच तर दुसऱ्या ब्राउज़र चा विचार कशाला करायचा?. आपण मोबाईल, लैपटॉप सारख्या आधुनिक वस्तू वापरतो. आधुनिक या करिता म्हणालो कारण जरी मोबाईल येऊन बरीच वर्षे झालेली असली तरी आपण जुनेच फ़ोन वापरतो का? तर नाही. आपण फार फार तर एक ते दोन वर्षे आणि फारच बिज़ी शेड्यूल असेल किंवा वापरत असलेले डिवाइस फारच आवडले तर चार ते सहा वर्षे यानंतर आपण किंवा आपल्या पैकी बहुतांश जण मोबाईल किंवा लैपटॉप सारख्या वस्तू बदलत असतात. आणि बदललेल्या नव्या फ़ोन / नव्या यंत्रा मध्ये मध्ये नवीन तंत्रज्ञान असते.
मोबाईल आल्या नंतर सुरुवातीच्या काळात मोबाईल वर वॅप पेजेस, मग एचटीएमएल ची उत्क्रांती आणि आताचे AI मोड या मध्ये आपण एक पाहत आलो आहोत की, जितका वेग तंत्रज्ञानाचा आहे सामाजिक प्रगती देखील तितक्याच वेगाने होत आहे. मग आपण स्वतः ला नव्या तंत्रज्ञानाने नुसते समृद्ध करून म्हणजे मोबाईल, लैपटॉप सारखे वस्तू खरेदी करून नुसते जवळ बाळगून आपण डिजिटल युगात यशस्वी होऊ शकतो का? तर नाही. मग नुसते जवळ बाळगण्यात समृद्धता नाही तर नव्या तंत्रज्ञानाने स्वत:ला सुशिक्षित बनवून समृद्ध होणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला आपण समजून घेतल्यास आपले काम अधिक सोईचे व सुरक्षित तर होतेच पण वापरत असलेल्या यंत्राचा जसे मोबाईल, लैपटॉप यांचा वापरतानाचा अनुभव (युजर एक्सपीरियन्स) देखील लक्षणीय रित्या सुधारतो.
यात अजून एक गोष्ट अशी देखील आहे की, कितीही वेगवान प्रगती होत असली तरी या ब्राउज़र च्या क्षेत्रात दोन गोष्टींचा अभाव नेहमी राहिला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. (आता पर्यंत तरी) त्या दोन गोष्टी म्हणजे 100 % सुरक्षितता आणि स्टेबल यूज़र एक्सपिरियन्स. आणि तेव्हा मनात प्रश्न येतो तो म्हणजे –
तुमचा Mobile Web Browser खरच सेफ आहे?
तुमचा मोबाईल ब्राउज़र ज्या मार्फत आपण इंटरनेट ची दुनिया पाहतो वेगवेगळ्या साईट्स ना भेट देतो. तेथील आवश्यक माहिती घेतो किंवा आपली महत्वाची कामे जसे ऑनलाइन बैंकिंग वगैरे करतो त्या ब्राउज़र बद्दल तुमच्या मनात कधी असा प्रश्न नाही का आला की, आपण वापरतो तो ब्राउज़र खरच सुरक्षित आहे? तसे सुरक्षिततेच्या बाबतीत बघितले तर browser सेफ आहे का हे जसे महत्वाचे आहे त्याहून कित्येक पटींनी तुम्ही ब्राउज़र कसा वापरत आहात हे महत्वाचे आहे. हल्ली चे बहुतांश जसे की एंड्राइड असेल तर गूगल प्ले स्टोर वरील ब्राउज़र अप्लिकेशन आणि आयफोन असेल तर ऍप स्टोर वरील ब्राउज़र एप्लीकेशन आणि अश्याच अधिकृत ठिकाणावरील ब्राउज़र हे सुरक्षितच असतात पण आपला वापर कसा आहे त्यावरून आपण सुरक्षित राहू किंवा कसे हे ठरते त्यामुळे या लेखात आपल्या स्मार्ट ब्राउज़र चा स्मार्ट वापर करण्या साठी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू.

चांगले ब्राउज़र शोधत असाल तर आमच्या मार्फत निष्पक्ष पणे सुचवलेले ब्राउज़र वापरून पाहू शकता. आमच्या लेखाची लिंक
नवीन काळातील ब्राउज़र मध्ये नव्या तंत्रज्ञानाने बऱ्याच प्रमाणात सुरक्षितता वाढण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहेत आणि पेजेस वेगाने लोड होण्या साठी व एकंदर ब्राउज़र च्या अनुभवाला वेगवान आणि स्मूथ बनवण्या साठी देखील विशेष प्रयत्न केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या सुविधा जसे इनबिल्ट डाउनलोडर, vpn, pwa इंस्टालेशन, इत्यादी बऱ्याच छान सुविधा आहेत आणि तसे आपल्याला प्रश्न पडत नाही असे नाही पण वेळेअभावी किंवा इच्छाशक्ती च्या अभावी आपले त्याकडे दुर्लक्ष होत असते. आणि म्हणूनच आपल्याला सर्वसाधारण पणे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे मी या ठिकाणी देत आहे. या प्रकारे आपले प्रश्न देखील सुटतील आणि आपण ब्राउज़र विषयी अधिक माहिती देखील मिळवू.
मी काही सॉफ्टवेयर किंवा हार्डवेयर क्षेत्रातील तज्ञ नाही पण असे प्रश्न मलाही पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या साठी देखील ही प्रश्न-उत्तरे मला जशी नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर करणारी ठरली तशी ती आपल्यालाही उपयोगी पडतील अशी मला आशा आहे. तर मला पडलेली प्रश्न आणि मिळालेली उत्तरे आपण पुढे पाहू. कारण यातील बहुतांश प्रश्न हे वेगवेगळ्या ब्राउज़र मध्ये असलेल्या सेटिंग बाबत असून त्या चालू ठेवाव्यात की बंद याविषयी जो संभ्रम आहे तो निघून जाईल.
प्रश्न : ब्राउज़र मध्ये फ़्लैश प्लेयर असावे का?
उत्तर : पूर्वी फ़्लैश प्लेयर ची एक वेगळीच क्रेझ होती त्यामुळे फ़्लैश प्लेयर असावेच असे वाटायचे मग त्याचा नेहमी वापर नसला तरी पण नंतर ऐकण्यात आले की ते सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत धोक्याचे असते त्यामुळे याचे उत्तर आहे, “नाही” ब्राउज़र मध्ये फ़्लैश प्लेयर नसावे. याचा वापर करून हॅकर्स सिस्टीम मध्ये वाइरस पाठवू शकतात. 2020 मध्ये हे तंत्रज्ञान (Adobe Flash Player) कालबाह्य ठरवून बंद केले गेले. आता त्याची जागा WebGL, WebAssembly, तसेच HTML चे आधुनिक वर्जन ने घेतली आहे.
प्रश्न : एक्सटेंशन किंवा एक्सटर्नल डाऊनलोडर सारखे पर्याय किंवा सुविधा वापराव्यात का?
उत्तर : मोझिला फायरफॉक्स तसेच क्वेटा सारखे काही ब्राउज़र एक्सटेंशन सपोर्ट ची सुविधा देतात आणि ह्या सुविधा अत्यंत सोईयुक्त असल्याने आपल्याला चांगला युजर एक्सपीरियन्स मिळतो यात शंका नाही. पण हे पूर्णपणे सुरक्षित आहे किंवा नाही याचे सरळ असे उत्तर देता येणे कठीण आहे, कारण फायरफॉक्स सारखे ब्राउज़र ऐड ऑन फीचर अंतर्गत त्यांनी स्वत: तपासलेले व सुरक्षिततेची हमी असलेलेच फक्त एक्सटेंशन डाउनलोड करीत उपलब्ध करून देत असले तरी आणि क्वेटा सारखे ब्राउज़र क्रोम एक्सटेंशन चे सपोर्ट प्रोवाइड करतात जे गूगल सारखे नामांकित कंपन्यांच्या तज्ञ मंडळी कडून तपासलेले असतात तरी देखील ऍप अपडेट करणे आवश्यक असते तसे एक्सटेंशन देखील अपडेट ठेवणे तितकेच आवश्यक असते.

पण आपण जर मोबाईल वर वापरत असाल तर उपलब्ध एक्सटेंशन पैकी मोबाईल करिता सूटेबल असलेले एक्सटेंशन चे विकल्प कमी होतात. आणि थोडक्यात सांगायचे झाले तर एक्सटेंशन सुविधेचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्या डिवाइस करिता तयार केलेले आणि नामांकित कंपनी किंवा तज्ञ मंडळी कडून तपासलेलेच एक्सटेंशन वापरणे योग्य ठरेल व त्यालाही नेहमी आपण जसे इतर एप्लीकेशन अपडेट ठेवतो तसे अपडेट ठेवणे आवश्यक असते असे माझे तरी मत आहे.
आणि एक्सटर्नल डाउनलोड विषयी बोलायचे झाल्यास जर ऍप सुरक्षित असले तर वापरायला काही हरकत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही डाउनलोड करत असलेले कंटेंट अश्याच स्रोता मार्फत डाउनलोड करत आहात ज्या बद्दल तुम्हाला सुरक्षित असल्याचा विश्वास आहे. तर चिंता करण्याची काही गरज नसते. आणि आता तर बऱ्याच मोबाईल वेब ब्राउज़र मध्ये तर इनबिल्ट डाऊनलोडर अतिशय परिपक्व बनले आहेत. यामुळे उत्तम परफॉरमेंस व बैटरी ची बचत होते आणि सुरक्षितता व प्राइवेसी ची देखील काळजी घेतली जाते.
प्रश्न : प्री लोड पेज चे तंत्रज्ञान काय आहे त्याने बैटरी किंवा डेटा अधिकचा खर्च होतो का?
उत्तर : प्री लोड पेजेस हे तंत्रज्ञान छान असले तरी बैटरी आणि डेटाचा अधिकचा वापर करते हे खरे आहे. पण खूपच बैटरी वापरल्या जाईल असे देखील नसल्याने यात फार घाबरण्या सारखे काही नाही. या तंत्रज्ञानाने काम लवकर होते आणि वेगाने लोड होणारे पेजेस एक चांगला अनुभव देते. प्री लोड पेजेस ऑन केले असल्यास एखाद्या पेजेस वर खूप सारे लिंक्स असतील तर त्या ब्राउज़र आधीच बैकग्राउंड मध्ये कोणत्या लिंक आपण क्लिक करू याचा अंदाज बांधत ते पेजेस डाउनलोड करून ठेवते. ज्या मुळे आपण जर ती लिंक्स क्लिक केल्या तर त्या खूप जलदगतीने म्हणजे जवळपास सेकंदात लोड होतात. या ठिकाणी आपण एक स्मार्ट गोष्ट करू शकतो ती म्हणजे जर बैटरी कमी असेल आणि चार्जिंग टिकवायची असेल उदा. प्रवासात असताना इ. वेळी आणि डेटा लिमिटेड असेल तर तात्पुरते किंवा इच्छेनुसार हे फिचर आपण बंद करू शकता. या बाबत दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे –
प्रश्न : प्री लोड पेज चे तंत्रज्ञान असुरक्षित आहे का?
उत्तर : याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे जर आपण एखाद्या संकेतस्थळाला भेट देत आहात ज्या बद्दल आपणाला माहिती नाही तिथे तुमच्या सुरक्षेला धोका संभावू शकतो कारण एखाद्या पेज ला भेट देताना मूळ लिंक जरी सुरक्षित असली तरी त्या पेजेस वर अजून काही लिंक्स असल्यास, प्री लोड तंत्रज्ञान हे वेब पेजेस, प्रीडिक्शन अल्गोरिथम चा वापर आणि माउस होव्हर चा विचार करून लोड करत असतात जसे की एखाद्या लिंक्स वर क्लिक केल्यास ते पेज बैकग्राउंडला डाउनलोड करून ठेवणे आणि ते पेज सुरक्षित नसल्यास आयपी लीक होणे, ट्रैकिंग कुकीज सोडणे आणि ब्राउज़र जर चांगले नामांकित नसेल जसे की त्यात काही त्रुटी असतील, सर्वसाधारण पणे नामांकित ब्राउज़र मध्ये मोठ्या टीम मार्फत कामे होत असतात तेव्हा तेथे त्रुटी राहण्याची शक्यता जवळ जवळ नसते. पण छोटे डेव्हलपर्स यांनी तयार केलेली ऐप्स मध्ये त्रुटी असल्यास अश्या वेळी एखादी मालवेअर किंवा वायरस असलेली लिंक आपल्या यंत्रणेला बिघडवू शकते.
प्रश्न : DNS, VPN, WebRTC IP Protection यातील फरक काय आहे.
उत्तर : DNS (Domain Name System) हे इंटरनेट वर जी नावे दिसतात जसे Google.com, kridavishwa.in यांना डोमेन नेम म्हणतात आणि ही नावे संगणकाला समजण्यासाठी एका आयपी अड्रेस मध्ये बदलण्याचे काम DNS करते त्यामुळे हे इंटरनेट वापरायचे म्हणल्यावर आवश्यक असे तंत्र आहे.
दुसरे तंत्र म्हणजे VPN (Virtual Private Networks) ह्या तंत्रज्ञानात दोन मुख्य उद्येश्य असतात एक म्हणजे वापरकर्त्याचा आयपी एड्रेस लपवणे / ओळख बदलणे आणि ट्रॅफिक इनक्रिप्ट करणे याद्वारे वापरकर्त्यांची सुरक्षितता व गोपनीयता जपण्यास मदत होते. या गोष्टीचा फायदा घेऊन वापरकर्ते आपल्या देशात सुरू न झालेल्या किंवा परदेशात जिथली आपली तात्पुरती बदललेली ओळख आहे तिथे सुरू असलेल्या गोष्टीचा फायदा घेऊ शकते
उदा. भारतात नेटफिल्क्स वापरून मनोरंजनाचा लाभ घेणारे वाचक नेटफ्लिक्स च्या नवीन चित्रपटास पाहू इच्छित आहेत पण तो आपल्या देशात नेटफ्लिक्स वर प्रदर्शित नसून परदेशात आहे तर तुम्ही तो व्हीपीएन च्या साहाय्याने पाहू शकता किंवा तुम्ही परदेशात प्रवास करत आहात आणि तुमच्या आवडीचा कंटेंट अजून तुमच्या देशा बाहेर प्रदर्शित नाही तर तो देखील व्हीपीएन मधील सुविधेद्वारे लाभ घेऊन पाहू शकता. तर अश्या पद्धती मध्ये व्हीपीएन चा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
बरेच जण vpn ब्राउज़र मध्ये मिळणाऱ्या proxy सुविधेचा देखील लाभ घेतात पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्हीपीएन तुमच्या डिवाइस चे उदा. मोबाईल चे संपूर्ण नेटवर्क सुरक्षित टनल मार्फत वळवतो. आणि प्रॉक्सी मध्ये केवळ ब्राउज़र च्या आतील डेटा वळवल्या जातो आणि त्यातही इंटरनेट वर फ्री मिळणाऱ्या प्रॉक्सी च्या नादात सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता खूप असते.
WebRTC IP Protection हे तंत्रज्ञान व्हीपीएन तंत्राला सहाय्यभूत म्हणून वापरण्याचा सार्वत्रिक कल असला तरी याचे स्वतंत्र वापराचे फायदे देखील आहेत. WebRTC म्हणजे (Web Real-Time Communication) जेव्हा फाइल शेअरिंग किंवा वीडियो कॉलिंग करत असताना थर्ड पार्टी शिवाय थेट संपर्क करत असताना याचा उपयोग होतो पण असे करत असताना हे कुठलाही डेटा इनक्रिप्ट करत नाही आणि तुम्ही व्हीपीएन जर वापरत असाल तर तुमचा आयपी लपवण्याचा प्रयत्न इथे अयशस्वी होऊन तुमचा आणि आयपी अड्रेस लीक होऊ शकतो त्याकरिता WebRTC IP Protection किंवा mDNS अनोनिमायजेशन पर्याय चालू ठेवल्याने तुमचा IP एड्रेस सुरक्षित राहतो.
प्रश्न : DNT आणि GPC काय असते?
उत्तर : काही संकेतस्थळे मर्यादे पलीकडे ट्रॅकर्स च्या माध्यमातून माहिती गोळा करीत असतात अश्या संकेतस्थळांना ‘ट्रैक करू नका’ सांगणारे/रिक्वेस्ट पाठवणारे DNT हे तंत्रज्ञान आहे. पण ह्यावर कायदेशीर वचक नव्हता त्यामुळे dnt रिक्वेस्ट ला बहुतांशी दुर्लक्षित केले जायचे. पण GPC (Global Privacy Control) तंत्रज्ञान हे DNT चे आधुनिक रूप असून यात कायद्याची तरतूद आहे. उदा. कॅलिफोर्निया, युरोप सारख्या देशांमध्ये डेटा विक्रीपासून कायदेशीर संरक्षण मिळते.
प्रश्न : De-AMP तंत्रज्ञान काय आहे.
उत्तर : AMP – (Accelerated Mobile Pages) हे गूगल चे तंत्रज्ञान असून यात आपण सर्च केलेली पेजेस गूगल स्वत: च्या सर्वर वरून लोड करत असल्याने ते वेगाने लोड होतात पण सोबतच यामुळे गूगल कडे डेटा जाऊन गोपनीयतेचा भंग होतो तेव्हा गूगल कडे सर्व डेटा जाऊ देण्याची इच्छा नसल्यास De-AMP तंत्रज्ञान गूगल ची लिंक टाळून थेट मुळ वेबसाइट ची लिंक लोड करते. या मुळे स्पीड कमी होते पण डेटा सगळा गूगल कडे जात नाही.
प्रश्न : ब्राउज़र मध्ये लिंक्स एक्स्टर्नली ओपन होऊ देणे सुरक्षित असते का?
उत्तर : सुविधेच्या दृष्टीने चांगले असले तरी ब्राउज़र कोणते ऍप ओपन करत आहे या कडे लक्ष देणे आवश्यक असते आणि काही प्रकरणात ते धोकादायक ठरू शकते.
प्रश्न : Auto Verify ऑन ठेवल्याने गोपनीयता वाढते का ?
उत्तर : होय, तसे केल्याने संकेतस्थळांना संपर्क केल्यावर आपण रोबोट तर नाही ना हे तपासण्यासाठी जो captcha वापरून ओळख पटवण्याची गरज असते ती कमी होते.
प्रश्न : मोशन सेन्सर्स व एनएफसी ची परवानगी का असते.
उत्तर : मोशन सेन्सर्स हे फेकबुक किंवा इतर सोशल मीडिया ऍप वर आपण पाहिले असतील असे 360 डिग्री फोटोज पाहण्या साठी वापरले जाते. पण एनएफसी चा वापर वेब ऐप्स मार्फत स्मार्ट कार्ड स्कैन करण्यासाठी केला जातो पण या दोन्ही परवानग्या बंद असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरते कारण काही ट्रॅकर्स आपल्या मोबाईल च्या हलण्याच्या गतीवरून (Motion fingerprintig – मोशन फिंगरप्रिंटिंग) द्वारे तुमची ओळख पटवू शकते.
स्मार्ट वापर : पण याचा स्मार्ट वापर पद्धतीने करण्यासाठी, आपण गरज आहे आणि माहिती आहे अश्याच वेळी केल्यास स्वत: ला सुरक्षित देखील ठेवता येईल व सुविधेचा फायदा घेता येईल थोडक्यात सांगायचे झाल्यास जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एखाद्या वेबसाईट वरील एखादे कंटेंट आपल्याला पाहायचे आहे आणि आपल्याला ब्राउज़र सांगत आहे की या सुविधा ऑन नसल्याने हे दिसत नाही किंवा काहीही न सांगता देखील नसते दिसत नसेल तर आपण सेटिंग मध्ये तात्पुरत्या वेळेकरिता हा बदल चालू करून सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि वापर झाल्या नंतर सुरक्षिततेच्या कारणासाठी पुन्हा बंद करून ठेवू शकता.
प्रश्न : जावास्क्रिप्ट ऑन ठेवावे का?
उत्तर : होय, आधुनिक काळातील इंटरनेट वरील बहुतांश ठिकाणी जावासक्रिप्ट चा वापर हा सर्वसामान्य आहे कारण आता इंटरनेट पूर्वी प्रमाणे फक्त अक्षरे वाचण्यासाठी राहिला नसून त्यात चित्रे, चलचित्रांचा, अनिमेशन चा समावेश आहे आणि जावासक्रिप्ट नसल्यास कोणतेही बटन क्लिक होणार नाही तर ऑनलाइन बैंकिंग, शॉपिंग, सोशल मीडिया सारखे कामे करता येणार नाही.
प्रश्न : दर काही दिवसांनी ब्राउज़र चा कैचे/ कैशे डेटा क्लियर करावा का?
उत्तर : होय, आणि नाही कारण हे तुमच्या सोईनुसार आहे. मोबाईल मधील जागा फार कमी असल्यास आपण हे करू शकतो तसेच साइट डेटा सेव करणे म्हणजेच लोकल स्टोरेज किंवा indexdDB तंत्राने काही डेटा सेव करून पुढील वेळी तीच साईट ओपन केल्यास लवकर ओपन होते पण काही जाहिरातदार याचा वापर सुपरकुकीज म्हणून ट्रैकिंग साठी करतात. त्यामुळे या ठिकाणी दर काही दिवसांनी कैशे क्लियर करणे सोईस्कर व सुरक्षित असते.
प्रश्न : डायग्नोस्टिक डेटा व क्रैश रिपोर्ट समोर टिक करावी का?
उत्तर : टिक करावी की नाही म्हणजेच डेटा पाठवण्या संबंधी परवानगी द्यावी किंवा नाही असे असून याचे उत्तर म्हणजे हे अनिवार्य/ आवश्यक नाही. पण क्रैश रिपोर्टस चालू ठेवल्याने, डेव्हलपर त्यांचे जे उत्पादन तुम्ही वापरत आहात ते अजून उत्तम बनवण्या साठी त्या डेटा चा वापर करतात यात कोणतीही व्यक्ती ची ओळख पटवणारी माहीती शक्यतो नसते त्यामुळे हे चालू ठेवणे सुविधेच्या दृष्टीने चांगले मानले जाते.
प्रश्न : इनकॉग्निटो मोड बनवण्या मागे मूळ उद्देश्य काय होता व त्याचा स्मार्ट वापर कसा करावा?
उत्तर : सुरुवातीला इनकॉग्निटो मोड बनवण्या मागील मुख्य हेतू हा होता की, घरातील एकाच संगणकाचा वापर घरातील अनेक लोक करत असत. तेव्हा तुम्ही काय शोधत आहात (उदा. कोणासाठी तरी गिफ्ट किंवा वैयक्तिक माहिती) हे घरातील इतर लोकांना ‘हिस्ट्री’ मध्ये दिसू नये, म्हणून हे बनवले गेले.
स्मार्ट वापर : याचा वापर तुम्ही विमानाचे किंवा हॉटेलचे तिकीट बुक करण्यासाठी करून निश्चितच स्मार्ट वापर करू शकता कारण ( कुकीजमुळे किमती वाढणार नाहीत ), तसेच तुमच्या एकाच फोनवर दुसऱ्या कोणाचे फेसबुक/ईमेल लॉग-इन करण्यासाठी हा मोड सर्वोत्तम ठरतो. किंवा बाहेर कुठे उदा. ऑफिस किंवा सुरक्षित ठिकाणी आपले सोशल अकाउंट किंवा ईमेल लॉग इन करण्यासाठी हा मॉड फायदेशीर ठरतो ( लक्षात ठेवा: हा मोड तुम्हाला इंटरनेट प्रोव्हायडर किंवा पोलिसांपासून लपवू शकत नाही एवढेच नव्हे तर हा तुम्हाला सायबर गुन्हेगारांपासून देखील लपवू किंवा वाचवू शकत नाही.)

चांगले ब्राउज़र शोधत असाल तर आमच्या मार्फत निष्पक्ष पणे सुचवलेले ब्राउज़र वापरून पाहू शकता. आमच्या लेखाची लिंक
प्रश्न : कुकीज म्हणजे काय व त्याचा उपयोग काय असतो.?
उत्तर : कुकीज बद्दल बऱ्याच वेळा माहिती पूर्ण नसल्याने मनात भीती बसलेली असते की यामुळे ब्राउज़र स्लो होते की काय, किंवा कोणी आपल्याला सतत ट्रैक करतात की काय, किंवा कुकीज मुळे मोबाईल ची मेमरी भरते की काय अश्या अनेक गोष्टी आपल्याला ऐकीव माहिती नुसार वाटणे स्वाभाविक आहे पण यातील सगळ्या गोष्टी पूर्ण निराधार नसल्या तरी यात घाबरून जाण्यासारखे काही नाही आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आपले नवीन मोबाईल व नवीन सुविधायुक्त ब्राउज़र आपल्याला बहुतांशी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. व मेमरी भरण्या विषयी चिंता करण्याची गरज नसते कारण ह्या कुकीज साइज़ मध्ये खूप लहान असतात.
याविषयी आपण थोडक्यात समजून घेऊ. फर्स्ट पार्टी कुकीज (First-Party Cookies): या कुकीजमध्ये थेट तुमचे नाव किंवा पत्ता असेलच असे नाही, परंतु तुमचा ‘युनिक आयडी’ (Unique ID) असतो. तुम्ही भेट देत असलेल्या संकेतस्थळाच्या सर्व्हरद्वारे ही माहिती तयार केली जाते. यात तुमची भाषा सेटिंग, लॉग-इन आयडी/पासवर्ड, शॉपिंग कार्टमधील वस्तू आणि युझर प्रेफरन्स (उदा. डार्क मोड) यांचा समावेश असतो. व्यक्तीची ओळख: यात थेट व्यक्तीची ओळख पटवणारी माहिती (PII) नसू शकते, पण तुम्ही साइटवर लॉग इन असल्यास, तुमचा युझर आयडी थेट तुमच्या अकाऊंटशी जोडलेला असतो. आपल्याला लॉगिन ठेवणे, कार्ट मधील वस्तू सेव्ह ठेवणे किंवा आवडीनुसार एखाद्या वेबसाइट वर सेटिंग जर तुम्ही बदललेल्या असतील तर त्या सेव्ह ठेवण्या सारखे अत्यंत फायद्याचे काम हे कुकीज करत असतात.
थर्ड पार्टी कुकीज (Third-Party Cookies) : तुम्ही भेट देत असलेल्या संकेतस्थळां व्यतिरिक्त अन्य कंपन्यांद्वारे ( उदा. जाहिरात नेटवर्क, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ) या तुमच्या डिव्हाइसवर टाकल्या जातात. यामध्ये तुम्ही कोणत्या जाहिरातींवर क्लिक केले, कोणत्या इतर वेबसाईटस पाहिल्या, तुमचा IP ॲड्रेस आणि डिव्हाइसचे लोकेशन इत्यादी ट्रॅकिंग माहिती गोळा होते व्यक्तीची ओळख: यात व्यक्तीचे नाव नसले, तरीही तुमच्या ब्राउझिंग सवयी आणि IP ॲड्रेसच्या मदतीने तुमची ‘युनिक डिजिटल प्रोफाईल’ (Unique digital profile) तयार होते, ज्यामुळे तुमची ओळख पटवणे शक्य होते. आणि ह्याच ठिकाणी नेमके ह्या कुकीज चुकीच्या हातात आपल्या साठी अत्यंत अहितकारक ठरू शकतात. ट्रैकिंग विषयी सुरक्षितता हवी असेल तर आपण ह्या बंद ठेवणे आवश्यक मानले जाते.
या माहितीचा एक्सेस कोणाच्या हातात जातो? तर, फर्स्ट पार्टी कुकीजचा एक्सेस : ही माहिती केवळ तुम्ही ज्या संकेतस्थळाला भेट देत आहात, त्याच्या मालकाकडे किंवा त्यांच्या सर्व्हरकडे राहते। ही माहिती सुरक्षित मानली जाते. थर्ड पार्टी कुकीजचा एक्सेस : ही माहिती थर्ड-पार्टी कंपन्यांच्या हातात (उदा. Google, Meta/Facebook किंवा इतर ॲडव्हर्टायझिंग कंपन्या) जाते। या कंपन्या या माहितीचा वापर करून तुम्हाला इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्यित जाहिराती (Targeted Ads) दाखवतात. कुकीज बद्दल अधिक माहिती आपण इथे देखील वाचू शकता लिंक : (https://www.cloudflare.com/learning/privacy/what-are-cookies/)
प्रश्न : PWA इंस्टाल प्रॉम्प्ट म्हणजे काय व याचा स्मार्ट वापर कसा करावा.?
उत्तर : हे एक अतिशय छान फिचर आहे. यात आपण आपल्या आवडीच्या वेबसाइटस जसे की आपली Kridavishwa.in ही वेबसाइट आपण आपल्या मोबाईल वर एप्लीकेशन सारखी वापरू शकता. आणि हे करण्या साठी आपल्या आवडीच्या ब्राउज़र पैकी एक ब्राउज़र मधून आपण आपली आवडीची kridavishw.in ही वेबसाइट ओपन करायची आणि ब्राउज़र सेटिंग मध्ये “+ Add Page to” असे ऑप्शन असते. यामध्ये आता ब्राउज़र नुसार थोडेफार नाव वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण साधारण पणे “+” चे चिन्ह असते व पुढे ऐड पेज टू किंवा वेब ऍप असे लिहिलेले असू शकते. त्यावर क्लिक केल्यास होमस्क्रीन वर चा पर्याय निवडायचा आणि ऐड ऑटोमैटिक किंवा आपले वेबसाइट चे लोगो व नाव दिसेल त्यावर जरावेळ दाबून धरल्यास आपणास ते होमस्क्रीन वर पाहिजे त्या ठिकाणी मोकळ्या जागेत इन्स्टॉल करता येते आणि आपण ब्राउज़र मध्ये जाऊन वेगळी लिंक किंवा गूगल वर सर्च करण्यात वेळ घालवायची गरज यामुळे संपते.
तसेच एखादी अशी वेबसाइट ज्याची स्वत: ची ऐप्स आपण वापरत आहात जसे फेसबुक किंवा ट्विटर यांचे मूळ आप ची साइज़ मोठी असते आणि मोबाईल वर लोड देखील खूप येते तेव्हा यांचे स्वतंत्र ऍप असेले तरी त्या ऍप पेक्षा PWA मार्फत इन्स्टॉल ऍप ची साइज़ खूप कमी असल्याने त्याने मोबाईल वर भार देखील कमी पडतो. आणि वापरण्यात फारसा फरक देखील जाणवत नाही.
पण एकंदर आपण वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास जोपर्यंत आपण सुरक्षित ठिकाणी ब्राउझिंग करत आहात तोपर्यंत आपणाला यापैकी कुठल्याही गोष्टीची चिंता करायची गरज नसते. तसेच आज बहुतांश एंड्राइड स्मार्टफोन मध्ये गुगलने सी++ मध्ये विकसित केलेले ब्राउज़र मधील v8 हे ओपन सोर्स जावासक्रिप्ट इंजिन हे खूप प्रगत व सुरक्षित आहे तसेच इतर ठिकाणी देखील सुरक्षेचा विचार तेवढाच गांभीर्याने केला जातो.
अस्वीकरण (Disclaimer)
या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य माहितीच्या उद्देशाने (Educational and Informational Purposes) पुरवण्यात आली आहे. इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि मोबाईल तंत्रज्ञान हे विषय अत्यंत वेगाने बदलत असतात. त्यामुळे वाचकांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:
१. माहितीचा उद्देश आणि स्वरूप: या लेखात वेब ब्राउझर्स, प्रायव्हसी सेटिंग्ज, ॲडब्लॉकर्स, व्हीपीएन (VPN), टोरंट्स (Torrents) आणि डार्क वेब (Dark Web) यांसारख्या प्रगत तांत्रिक विषयांवर माहिती दिली आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारचा अधिकृत तांत्रिक, कायदेशीर किंवा व्यावसायिक सल्ला (Professional or Legal Advice) नाही.
२. स्वतःची जबाबदारी (User Responsibility): लेखात सुचवलेल्या कोणत्याही ब्राउझर सेटिंग्ज बदलणे, किंवा थर्ड-पार्टी ॲप्स / सॉफ्टवेअरचा वापर करणे हा पूर्णपणे वाचकांचा स्वतःचा निर्णय आणि जबाबदारी असेल. या माहितीचा थेट किंवा अप्रत्यक्ष वापर केल्यामुळे तुमच्या डिव्हाइसचे, डेटाचे (Data Loss) किंवा गोपनीयतेचे (Privacy) कोणतेही नुकसान झाल्यास, या ब्लॉगचे लेखक किंवा मालक त्यास कायदेशीररित्या जबाबदार राहणार नाहीत.
३. कायदेशीर पालन (Legal Compliance): कोणत्याही तांत्रिक साधनांचा वापर करताना वाचकांनी त्यांच्या देशातील आणि स्थानिक सायबर कायद्यांचे (Cyber Laws) काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही बेकायदेशीर कृतीला किंवा बेकायदेशीर डाउनलोडिंगला या ब्लॉगचा कोणताही पाठिंबा नाही.
४. अचूकतेची हमी नाही (No Guarantee of Accuracy): या लेखातील माहिती प्रकाशित करताना ती अचूक आणि सत्य असावी यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली आहे. मात्र, तंत्रज्ञानातील नवनवीन अपडेट्समुळे यातील काही माहिती कालांतराने जुनी किंवा कालबाह्य (Outdated) होऊ शकते. याची कोणतीही कायदेशीर हमी (Warranty) आम्ही देत नाही.
५. बाह्यदुवे (External Links): या लेखात दिलेल्या इतर वेबसाईट्सच्या लिंक्स केवळ वाचकांच्या संदर्भासाठी आहेत. त्या बाह्य वेबसाईट्सवरील माहितीची, त्यांच्या सुरक्षिततेची किंवा त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीची जबाबदारी आमच्याकडे असणार नाही. बाह्य लिंक्सवर क्लिक करणे ही वाचकांची स्वतःची जोखीम असेल.






