Home / तंत्रज्ञान / Android वरील हे Best ५ Mobile Browser तुम्हाला माहीत आहे का?

Android वरील हे Best ५ Mobile Browser तुम्हाला माहीत आहे का?

तुम्हाला हे best 5 mobile browser माहीत आहे का विचारात सुंदर aaps चे 5 आइकॉन आणि खाली "आत्ताच वाचा" असे कॉल टू एक्शन आहे.

Best 5 Android Mobile Browser

आपण आता ५जी च्या ही पुढच्या काळात आहोत आणि मोबाईल नुसता फोन करण्या साठी राहिला नाहीये आज बहुतांश लोकांच्या रोज च्या कामातील कितीतरी कामे ही इंटरनेट च्या मदतीने पार पाडली जात आहे. आणि इंटरनेट वापरण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता फक्त कॉम्प्युटर वरच इंटरनेट असा प्रकार राहिला नाही. तेव्हा चांगले ब्राउज़र असणे तितकेच गरजेचे आहे त्या विषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

वापर कुठे?

ब्राउज़र चा वापर कोणाला कसा करायचा हे फारसे सांगण्याची आता गरज आहे असे तरी दिसत नाही पण , रोजच्या कामातील जसे बातम्या वाचणे, पाहणे . गूगल तसेच वेगवेगळ्या सर्च इंजिन च्या मदतीने गोष्टींची सत्यता पडताळून पाहणे, गरजांनुसार वेगवेगळ्या संकेतस्थळांवर उदा. कॉलेज, यूनिवर्सिटी, लाइब्रेरी सारखे ऑनलाइन शिक्षण देखील सुरू झाले आहे. मनोरंजनाची साधने तर विपुल प्रमाणात आहेतच पुन्हा चित्रपट गृहावरील तिकिटे देखील ऑनलाइन बुकिंग सारखे विकल्प देत आहेत. यात bookmyshow सारखे वेबसाइट्स असतील किंवा imdb आणि आमच्या kridavishwa.in सारखे संकेतस्थळे असतील जिथे तुम्हाला चित्रपटांविषयी अधिक माहिती देखील मिळेल की चित्रपट कसा आहे आणि तुम्हाला बघायला तो आवडेल की नाही हे तुम्ही आमचे लेख वाचून ठरवू शकता.

ठळक मुद्दे

एंड्राइड स्मार्टफोन वर ब्राउज़र निवडताना आपण काही ठळक मुद्यांना गृहीत धरून निवड केल्यास मला पुढील 5 ब्राउज़र सर्वोत्तम वाटतात म्हणजे पुढील मुद्द्यांपैकी आपली गरज पाहून त्या मुद्द्यांसाठी लोकप्रिय असलेले ब्राउज़र आपण आपल्या साठी निवडू शकता आणि लक्षात घ्या हा लेख स्पॉन्सर्ड नाही मला या ब्राउज़र किंवा कोणत्याही कंपन्यांकडून प्रसिद्धी करीता पैसे मिळालेले नाही मी हे फक्त आपल्या सोयी करिता माझ्या निदर्शनास आलेले 5 चांगले ब्राउज़र आपणास सुचवत आहे.

  • जाहिराती व ट्रॅकर ब्लॉकिंग
  • कस्टमाइझेशन व सुंदर यूआई व स्टेबल एक्सपिरियन्स
  • आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त (AI एडब्लॉकिंग, De-AMP सारखे फीचर्स)
  • क्रोमियम पेक्षा वेगळा अनुभव घ्यायचा असल्यास

वरील मुद्यांना विचारात घेता जाहिराती व ट्रॅकर ब्लॉकिंग मध्ये Brave Browser उत्तम मानले जाते आणि क्रोमियम बेस्ड असले तरी या ब्राउज़र चा यूज़र एक्सपिरियन्स बऱ्यापैकी वेगळा वाटतो. आणि या ब्राउज़र ला विविध अवार्ड ने पण सन्मानित केले आहे

कस्टमाइझेशन व सुंदर यूआई व स्टेबल एक्सपिरियन्स करिता Vivaldi Browser मला सगळ्यात उत्तम वाटले यात भरपूर कस्टमायझेशन चे ऑप्शन असून दिसण्यात देखील खूप छान अगदी कंप्यूटर सारखे टैब फीचर देखील आहे जे मला वाटते जसे मोबाईल आले आहेत तेव्हा पासून माझ्या सोबत आणखी बऱ्याच लोकांची इच्छा होती की मोबाईल वर कम्प्युटर वेबसाइट टैब मध्ये दिसाव्यात आणि या ब्राउज़र च्या टीम नेच हा पहिला प्रयत्न केला आहे असे नाही आजही बरेच ब्राउज़र किंवा या अगोदर बऱ्याच ब्राउज़र मध्ये हे फीचर देण्याचा प्रयत्न झाला पण मग येतो तो शेवटी नमूद केलेला विषय स्टेबल एक्सपीरियन्स हा प्रत्येक ठिकाणी नव्हता मिळत जो सध्या vivaldi ब्राउज़र मध्ये मिळतो.

आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञान येते आणि आपण देखील त्या अनुरूप आपल्याला अपडेट करणे महत्वाचे असते आणि या करिता Quetta Browser हे उत्तम असल्याचे मला वाटते. यात नवीन काळातील AI एडब्लॉकिंग आहे जी नार्मल एडब्लॉकिंग पेक्षा अधिक प्रगत असल्याचे मानले जाते ज्या मध्ये नार्मल एडब्लॉकिंग मधील स्क्रिप्ट वर अवलंबून न राहता Heuristics पद्धतीने जाहिराती ब्लॉक करतात आणि यातील इनबिल्ट डाउनलोडर देखील छान आहे.

तसे एक्सटेंशन फिचर देणारे firefox जसे स्वतः च्या ऐड ऑन स्टोर वरील एक्सटेंशन डाउनलोड साठी उपलब्ध करून देतात तसे quetta मध्ये क्रोम एक्सटेंशन स्टोर वरील नामांकित एक्सटेंशन इथे डाउनलोड साठी उपलब्ध आहेत पण मला ओपन सोर्स असलेले (फार सुरक्षित) एक्सटेंशन देखील फारसे प्रभावी किंवा स्टेबल नाही वाटत यूज़र एक्सपीरियन्स च्या दृष्टीने तर इथे क्लोज़्ड सोर्स असलेले ब्राउज़र वरील एक्सटेंशन फिचर वापरण्या संबंधी मी फारसे मत प्रदर्शित करणार नाही.

आता टॉप 3 ब्राउज़र तर झाले पण या व्यतिरिक्त Samsung Internet Browser आणि Google Chrome मला छान वाटते. त्यामागील प्रमुख कारण असे की सॅमसंग ब्राउज़र देखील अत्यंत कस्टमाईझ करता येते, दिसायला देखील छान आणि वापरायला देखील छान आहे. व सॅमसंग चा जर फ़ोन वापरत असाल तर यूज़र एक्सपीरियन्स आणखीन छान मिळतो. व तसेच कस्टमायझेशन सोडले तर क्रोम देखील वापरायला छान आहे आणि मुळातच हे ब्राउज़र एंड्राइड फ़ोन मध्ये इनबिल्ट असतेच तर ते एक इकोसिस्टम चा भाग बनत यूज़र एक्सपिरियन्स आणखी छान बनवतो.

आपल्या भाषेत नवीन तंत्रज्ञानाच्या अश्याच माहिती साठी आम्हाला नेहमी भेट देत रहा. Kridavishwa.in वर 🙏
Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.