body heat वाढणे किंवा ‘उष्णता वाढलीय’ असे जे आपण म्हणतो ते म्हणजे काय?
Table of Contents
उन्हाळ्यात गरमी होत असते हे काही नवीन नाही पण शरीरातील उष्णता जेव्हा बाहेर पडते त्यावेळेस होणारा त्रास देखील उन्हाळ्यातील गरमी पेक्षा कमी नसतो. मग काय होते या त्रासामध्ये तर उष्णता वाढली असे बऱ्याचदा बोललेले आपण ऐकले असेल किंवा आपल्याला ही पुढील काही लक्षणे दिसली असतील त्याचा बहुतेक वेळा संबंध उष्णतेशी असतो.
लक्षणे
- हाता-पाया वरील त्वचेची सालपट निघणे
- तोंड येणे / जिभेला कात्रीसारखा आकार येणे
- शरीरावर फोड येणे
- पोटात टोचल्यासारखे दुखणे
सदर लेख फक्त माहितीकरिता आहे, वैद्यकीय सल्ला तसेच तपासणी किंवा उपचारा करिता तज्ञांना भेटा.
वरील लक्षणे वेगवेगळ्या कारणांमुळे जरी होत असली तरी उष्णते मुळे होणाऱ्या त्रासांमध्ये देखील ह्या लक्षणांचा समावेश होतो, पण आताच सांगितल्या प्रमाणे वरील लक्षणे दिसल्यास उष्णता समजून घरीच उपचार करू नका योग्य उपचारांसाठी तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.
कारणे
तसे पाहिले तर उष्णता होण्या मागे खाण-पान, चुकीची जीवनशैली जशी कारणीभूत ठरते त्याचप्रमाणे ऋतू बदलताना देखील वातावरणातील झालेला अचानक बदल शरीर जुळवून घेत असताना शरीराची यंत्रणा कमी पडल्यास हा त्रास होतो याला आयुर्वेदात ‘ऋतूसंधी‘ असे म्हणल्या गेले आहे.
तर थोड्या वेळे करिता आपण ऋतूसंधी हा विषय सोडला तर खान-पाना मुळे किंवा चुकीची जीवनशैली अंगीकारल्याने होणाऱ्या त्रासा पासून सुटका मिळविण्या साठी आपला आहार व जीवन शैली कशी बदलायची हे पाहू :
पथ्य
खानपान हे साधे असले तर फारसा त्रास होत नाही हे खरे आहे पण साधे नसणे म्हणजे यात खूप आंबट, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे किंवा मिठाचा आहारात जास्त वापर असणे तसेच जागरण, धूम्रपान करणे अश्या सवयी शरीरातील उष्णता वाढीला कारणीभूत ठरतात म्हणजे मुळतः हे पाचन संस्थेला आधी बिघडवतात व नंतर त्यमुळे पित्त वाढते (यालाच आयुर्वेदात पित्त प्रकोप असे म्हणतात) व आपल्याला उष्णतेचा त्रास होतो.
सोबतच शरीरात उष्णता वाढीस घालणारे इतर पदार्थांमध्ये दही हे अश्यावेळी खाऊ नये. कारण आयुर्वेदामध्ये, दह्याला गुणधर्मा नुसार उष्ण गुणाचे म्हणजेच शरीरात उष्णता वाढवणारे मानले आहे.
दह्या पासून बनणारे ताक हे मात्र थंड असते कारण त्यातील फॅटचे प्रमाण काढून टाकलेले असते, आणि लस्सी मध्ये जरी फॅट असले तरी लस्सी जर आंबट दह्यापासून बनली असेल तरच उष्ण असते नाहीतर ती देखील शीत असते. पण शक्यतो उष्णता वाढत असेल तर लस्सी पिणे टाळावे कारण लस्सी पचायला जड असते.
इडली, डोसा हे आंबवलेले पदार्थ देखील आम्लधर्मीय असतात तसेच पचायला जड असतात. लोणचे अशा परिस्थितीत अधिक त्रासदाय ठरू शकते कारण लोणचे आंबट असते सोबत तेलकट तिखट आणि मसालेदार गोष्टींची देखील उपस्थिती लोणच्यात असते, त्यामुळे एक प्रकारे पोटामध्ये ते विस्फोट घडवून आणण्याचाच प्रकार लोणचे करते.
आयुर्वेदातील पित्तप्रकोप
तसे पित्त आणि पोटातील एसिड याचा सरसकट एकच असल्या सारखा अर्थ कोणी घेऊ नये. कारण आयुर्वेदातील पित्त हे एकूण शरीरातील पेशीस्तरावरील पासून पूर्ण शरीरातील एकूण ऊर्जा व रसायने या कारकांची वाढ होऊन जी उष्णतेत वृद्धी होते त्यास पित्त वाढ म्हणतात.
काय खावे
शरीरात उष्णता वाढल्यावर काय खावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे आणि त्यात मनाला नाराज न करता काही चविष्ट पर्याय उपलब्ध आहेत का या विषयावर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू.
काय खावे या विषयावरती बोलण्याकरता प्रथम उन्हाळ्यात उष्णता वाढणे किंवा इतर ऋतूमध्ये उष्णता वाढणे या विषयी काही गोष्टी लक्षात घेऊ, सर्वसाधारणपणे प्रत्येक वातावरणामध्ये उष्णतेचा त्रास होऊ शकतो.
पण त्यातल्या त्यात प्रत्येक प्रत्येक ऋतू बदलताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाहेरील तापमानात जो बदल होत असतो तेव्हा आपले शरीर बाहेरील तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. यावेळी शरीर जुळवून घेण्याकरता कमी पडल्यास आपण त्या त्या ऋतू नुसार शरीराला पोषण मिळेल तसेच उष्णतेपासून संरक्षण होईल अशा पदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते
उन्हाळ्यात उष्णता वाढणे
आता उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढणे ही एक सर्वसाधारण समस्या आहे. आणि एकूणच वातावरणातील गरमीचे वाढते प्राबल्य पाहून आपण ताक, शिकंजी, वेगवेगळे शरबत असे घेऊन आपण शरीराला थंडावा देऊ शकतो पण महत्वाचे म्हणजे आपले चयापचय क्रिया कशी राहते याकडे देखील लक्ष देणे आवश्यक असते. या दिवसात इतर पदार्थांच्या तुलनेत तिखट पदार्थ जास्त त्रासदायक ठरतात.
पावसाळ्यातील उष्णता वाढणे
खास करून उन्हाळा संपत आला की सुरुवातीचे काही दिवस वातावरणात चढ उतार सुरू असतो आषाढाचा महिना लोक बरेचसे तळणीचे पदार्थ घरात करत असतात. आणि असे पदार्थ शरीरासाठी आवश्यक देखील असतात फक्त प्रमाण आपले आपण स्वतःची तब्ब्येत बघून ठरवायचे असते कारण सतत पडणारा पाऊस व दमट हवामान असेल तर शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते.
तळणीचे पदार्थ वेगाने ऊर्जा व उष्णता शरीरात देतात तसेच काही अंशी दूषित पाण्यापासून देखील तेलकट पदार्थ शरीराला वंगण वापरल्या सारखे आतून सुरक्षित ठेवण्याचे काम करतात त्यामुळे ठरावीक दिवसांत प्रथेप्रमाणे आहारशैली ठेवणे फायद्याचेच असते फक्त प्रमाणात खाणे ही गोष्ट लक्षात ठेवावी.
व शेवट शेवट ऑक्टोबर महिन्यातील ऑक्टोबर हीट तर आणखी प्रसिद्ध आहे, पावसाळा संपत हिवाळ्याची चाहूल लागत असते, शरद ऋतू मधील हे दिवस जास्त काळजीचे असतात. नेहमीच पाणी खूप पिणे हे आवश्यक असते पण या दिवसात विशेष काळजी आवश्यक आहे. उष्णतेचा त्रास याच महिन्यात जास्त होतो पावसाळ्यात पित्त साचते आणि अचानक कडक पडलेले ऊन पित्तास उद्यपित करते. या दिवसात खास करून गाईचे तूप, दूध, लोणी, आवळा, खडीसाखर थोडक्यात थंड प्रवृत्तीचे व गोड पदार्थ व फळे यांचा आहारात समावेश करावा.
हिवाळ्यात उष्णतेचा त्रास
हिवाळ्यात वरील प्रमाणे त्रास शक्यतो कमी होतो पण जरी झाल्यास वरील प्रमाणे उपाय करता येतात. योग्य प्रमाण व संतुलित आहार घेणे व सोबत कसरत / व्यायामाची जोड देणे ही उत्तम कार्यप्रणाली असून अश्या पद्धतीने जीवनशैली ठेवल्यास निश्चित निरोगी आयुष्याचा आनंद घेणे शक्य होते.
लक्षात घ्या
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतः च्या प्रकृती मधील कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता तसेच स्वत: हून कुठलेही निदान न करता वेळीच तज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा व हे हिताचे असते.
कारण जसे हात पायांची सालपट निघणे (डेस्कमेशन) ज्याला म्हणतो ते Keratolysis Exfoliativa (केराटोलिसिस एक्सफोलिएटिवा) तसेच तोंड येणे हे Stomatitis (स्टोमाटायटिस), व फोड येणे हे Miliaria (मिलियारिया) सारखे आजारांची लक्षणे असून त्यांच्या साठी तज्ञांचा सल्ला व योग्य औषोधोपचार यासाठी आवश्यक आहेत.
सदर लेखातील माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने दिली आहे याविषयी माहितीची अचूकता किंवा वयक्तिक प्रकृती परत्वे याचे फरक विषयी आम्ही दावा करीत नाही. योग्य उपचार/ सल्ल्या करिता तज्ञांची भेट आवश्यक असते.
आमचे अस्वीकरण, टर्म एंड कंडीशन तसेच गोपनीयता धोरण वाचा.






