Home / जीवनशैली / Photos मुळे स्टोरेज फुल? फोटो कॉम्प्रेस व रिसाईझ करून मेमरी वरील भार करा कमी. Free Pro Bulk Image Resizer and Compressor Tool वापरा मोफत

Photos मुळे स्टोरेज फुल? फोटो कॉम्प्रेस व रिसाईझ करून मेमरी वरील भार करा कमी. Free Pro Bulk Image Resizer and Compressor Tool वापरा मोफत

इमेज रिसायझर टूलचे वर्णन करणारे डिजिटल चित्र; स्टोरेज फुलची समस्या सोडवण्याचे टूल

Free Pro Bulk Image Resizer and Compressor tool ची गरज

आजच्या डिजिटल काळात खासकरून प्रत्येक मोबाईल चे अत्याधुनिक कॅमेरे जितके छान फोटो काढत आहेत, तेच छान फोटो जागा देखील तितकीच छान मोठी घेत आहेत. आणि आता आपल्यासाठी मोबाईल चे स्टोरेज करीता हळू-हळू मोबाईल कंपन्या देखील मोठे मोठे पर्याय देत आहेत जसे आज घडीला जास्तीत जास्त 2TB इतके स्टोरेज मोबाईल मध्येच मिळत आहे.

128MB ते 2TB स्टोरेज चा प्रवास, तरी स्टोरेज अपुरे?

सर्वसाधारण कोणताही आजच्या काळातील मोबाईल (स्मार्टफोन) हा 128GB स्टोरेज सोबतच येतो, आणि फार नाही पण 10-12 वर्षापूर्वी मोबाईल मध्ये 128 MB स्टोरेज खूप वाटायचे.पण आज जास्तीत जास्त 2 TB पर्यंत जरी स्टोरेज क्षमता पुरवणारे मोबाईल आपण वापरत असाल तरी सावध व्हा. आपली सवय बदलली गेली आहे आणि यात जाणून बुजून केले आहे असे काही काँट्रोवर्सी प्रमाणे बोलणार नाही. पण खरेच आपण मोबाईल नव्हते त्यावेळी काय छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो काढत होतो का?

आणि प्रत्येकाला जिथे नैतिक दृष्ट्या चांगले कामे करण्याचे / फोटो काढण्याचे पूर्ण स्वातंत्र आहे. त्या वेळी आजचे युग आपल्याला CLOUD STORAGE सारखे अत्यंत उपयोगी पर्याय देखील पुरवत आहे. त्यातील काही जसे Google Drive किंवा Onedrive किंवा Apple iCloud जे सुरुवातीस काही स्टोरेज स्पेस अगदी मोफत देत आहेत. आणि एवढे सगळे करून देखील त्यांचे मोफत लिमिटेड स्टोरेज देखील आपण पूर्ण वापरुन सब्सक्रिप्शन देखील घ्यायला लागलो आहोत.

पण एवढे देऊन ही कमी पडत असल्याचे दिवसेंदिवस दिसून येत आहे. कारण आहे आपलीच फोटोग्राफी 😉, नाही खुप छान फोटो काढणारे आहेत त्यांचे कौतुकच आहे आणि फक्त वयक्तिकच नाही तर पत्रकारिता देखील डिजिटल झाली आहे. नोकरी असेल किंवा जागरूक नागरिक म्हणून देखील पुराव्या करिता आपण फोटोचा वापर करतो. तेव्हा आजघडीला अश्या फोटोंची वारेमाप संख्या मोठ्या-मोठ्यांची नियोजने मोडकळीत आणताना दिसून येते.

निश्चितच आपण त्या सुविधा घ्याव्यात कारण अत्यंत सोईस्कर अश्या ह्या सुविधा फक्त आपले मोबाईल हलके व फास्टच ठेवण्यात आपली मदत करत नाहीत तर आपल्या आयुष्यातील (नव्या सवयीनुसार 😉) लहान मोठ्या सर्व अविस्मरणीय क्षणांना जणू जिवंत ठेवण्याचे मोठे काम लीलया पार पडत आहे. (हा लेख स्पॉन्सर्ड नाही. ) पण ह्या पेड सुविधा तुमच्या पाकिटावर जसा भार देत आहेत तसाच भार हा वातावरणातील डिजिटल कार्बन फुटप्रिंट व स्टोरेज करण्यासाठी लागणाऱ्या सर्वर करिता आवश्यक असलेल्या विजेवरती देखील देत आहेत. याचा आपण विचार कधी केला आहे का?

मग अश्या सर्व फोटोंचे नियोजन छान व्हावे ह्या करिता एखादे एडवांस्ड टूल असणे अगत्याचे होते आणि मग तुम्ही जर क्लाउड स्टोरेज वापरले तर तुमचा कोटा देखील लवकर संपणार नाही आणि यामागील हेतू मोठा आहे म्हणून असे छान सुविधा जर मोफत देता येत असेल तर नक्की ती मोफत रहावी हीच माझी इच्छा आहे. म्हणून आपण ह्या एडवांस्ड तंत्राने बनलेल्या Free Pro Bulk Image Resizer and Compressor tool चा नक्की वापर करावा ही विनंती.

जबाबदार नागरिक रहा.

आता समाजात सुविधा कोणतीही असो जोपर्यंत एक जागरूक, सुजाण, सजग व चांगला नागरिक थोडक्यात सांगायचे झाले तर विवेकसंपन्न दायित्वपूर्ण कर्तव्यदक्ष जबाबदार नागरिक ( 🤪 ) व म्हणून आपण त्या सुविधेचा वापर केला पाहिजे. आणि खरचं, कोणाला माझ्या शब्द संरचनेमुळे व इमोजी मुळे हा चेष्टेचा विषय वाटू नये म्हणून सांगतो की, फक्त तुम्हाला न घाबरवता हलक्या फुलक्या वातावरणात चर्चा व्हावी म्हणून अशी शब्द संरचना वापरली पण या मागचा हेतू तितकाच गंभीर आहे.

निसर्गाला साथ द्या.

आपण लहानपणी अनुभवलेला निसर्ग आपल्या पुढच्या पिढीला अनुभवणे आज कठीण आहे. आणि पुढील पिढी साठी निसर्गाचे एक छान वातावरण असावे असे कोणाला वाटणार नाही पण यासाठी प्रयत्न देखील आपल्यालाच करावे लागतील कारण निसर्ग जरी स्वत:च ऑटोमैटिक मशीन सारखा काम करत असला तरी कुठेतरी कळत नकळत आपण याच्या बाजूने उभे राहायचे सोडून, आपल्या सर्वांच्या हातून याच्या विरुद्ध काम होत असल्याचे दिसून येते.

Advanced Technology ( प्रगत तंत्रज्ञान )

हे कसे तर इंटरनेटवर आपल्या स्मार्ट मोबाईल ने काढलेले फोटो असोत की, कुठल्या DSLR कॅमेऱ्याने, मोठ्या आकाराचे फोटो साठवण्यासाठी आणि लोड करण्यासाठी मोठमोठाली डेटा सेंटर्स असतात ही डेटा सेंटर्स प्रचंड वीज खर्च करतात, ज्यामुळे वातावरणात ‘डिजिटल कार्बन फूटप्रिंट’ मध्ये वाढ होते. या टूलच्या मदतीने फोटो कम्प्रेस केल्याने फाईलची साईझ अत्यंत कमी होते, त्यातल्या त्यात Google चे WebP तंत्र (जे खासकरून आपल्या टूल मध्ये आहे) अत्यंत प्रगत असल्याने तुमच्या फोटोज चा आकार अत्यंत कमी होऊन देखील तयार झालेले चित्र व पूर्वीचे चित्र यातील फरक सध्या डोळ्यांनी ओळखणे कठीण जाते इतके छान गुणवत्तेने हे टूल तुमचे फोटो कंप्रेस करते.

या तंत्राचा वापर केल्याने इंटरनेटचा डेटा आणि सर्व्हरवरील विजेचा भार दोन्ही वाचतात. परिणामी, प्रत्येक वेळी ऑप्टिमाईज केलेली (लहान आकाराची) इमेज वापरून आपण अप्रत्यक्षपणे विजेची बचत करतो आणि ‘डिजिटल प्रदूषण’ कमी करून निसर्गाचे रक्षण करण्यास आपला मोलाचा हातभार लावतो. चला तर मग पुढील मोफत असलेले Pro Bulk Image Resizer and Compressor tool वापरून आपले इमेज ऑप्टिमाईज करून घ्या.

Pro Bulk Image Resizer and Compressor tool कसे वापरावे.

  • हे साधन (टूल) वापरायला अत्यंत सोपे आहे यातील पहिल्या क्रमांकावरील “इमेजेस निवडा (एकापेक्षा जास्त निवडू शकता)” इमेज निवडा असे जिथे दिले आहे त्या ठिकाणी निळ्या रकान्यात Choose File शब्दावर क्लिक केल्याने आपल्या डिवाइस वरील आपल्याला हवे असलेली चित्रे निवडायची आहेत.
  • यानंतर दुसऱ्या क्रमांकात ” साईझ ठरवा ” पर्यायावर क्लिक केल्याने तुम्हाला काही प्रीसेट आधीच सुचवलेले आहेत जसे तुम्हाला ब्लॉग ची मुख्य इमेज कशी असते तशी इमेज बनवायची असल्यास किंवा आपण युट्युबर असाल व वीडियो चे thumbnail तयार केलेले कॉम्प्रेस करायचे आहे तर तो देखील पर्याय दिलेला आहे. पण या टूल चे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही स्वतः हवा असलेला रुंदी व उंची नुसार आकार ठरवू शकता खालील रकान्यात आकडे भरून.
  • त्यानंतर तिसऱ्या क्रमांकातील पर्याय ” रिसाइझ पद्धत ” मध्ये :सर्वसाधारणपणे फोटो रिसाइझ करत असताना वेगळ्या रूंदी-उंची मुळे चित्रे बिघडू नये म्हणून सुचवलेल्या पर्यायांपैकी हवे असलेले पर्याय निवडा.
  • यानंतरचा चौथा पर्याय अत्यंत महत्वाचा आहे. (वेगवेगळ्या इमेजेस च्या फॉर्मेट विषयी माहिती घेण्या साठी इथे क्लिक करा. ) या पर्यायात वर उल्लेख केल्या प्रमाणे Google ने तयार केलेला WebP फॉर्मेट अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने समृद्ध असून याद्वारे कॉम्प्रेस केलेले चित्र गुणवत्तेत साध्या नजरेस ओळखता येणार नाही इतके मूळ गुणवत्ते सारखी गुणवत्ता दिसून येते. पण या खेरीज इतर लोकप्रिय पर्याय देखील आपण येथे निवडू शकता.
  • यानंतर पाचवा आणि अंतिम पर्याय म्हणजे सुरक्षा आणि क्वालिटी (Compression) ठरवण्यासाठी खाली दिलेला स्लायडर बार वरील आकडा कमी जास्त करून अंतिम इमेज तयार करा हे बटन प्रेस करू शकता. व आपल्या सर्व इमेजेस ऑप्टिमाइज करू शकता. येथे स्लायडर बार सरकावताना तुम्ही ठरवलेली गुणवत्ता (आकडा) कश्या पद्धतीने चित्र तयार करून देईल हे सांगणार रंगीत संदेश देखील तिथे स्पष्ट दिला आहे जेणेकरून चुकीचा किंवा चुकीने अत्यंत कमी पर्याय निवडून तुमचा वेळ वाया जाऊ नये.
⚠️

अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी (Disclaimer & Terms of Use)

१. १००% प्रायव्हसी आणि सुरक्षितता (Data Privacy): हे ‘इमेज रिसायझर आणि कम्प्रेसर’ टूल पूर्णपणे तुमच्या ब्राउझरवर (Client-side) काम करते. तुम्ही अपलोड केलेले कोणतेही फोटो किंवा इमेजेस आमच्या किंवा इतर कोणत्याही बाह्य सर्व्हरवर सेव्ह (Save) केले जात नाहीत. तुमचा डेटा १००% सुरक्षित आणि खाजगी आहे.

२. मेटाडेटा काढणे (Metadata Stripping): युजरची सुरक्षा जपण्याच्या हेतूने, या टूलद्वारे रिसाईज केल्या जाणाऱ्या इमेजेसमधील मूळ ‘मेटाडेटा’ (उदा. GPS लोकेशन, कॅमेऱ्याची माहिती) आपोआप काढून टाकली म्हणजे डिलीट केली जाते.

३. अचूकतेची हमी नाही (No Guarantee): हे एक मोफत आणि स्वयंचलित टूल आहे. आम्ही हे टूल शक्य तितके अचूक बनवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु विविध ब्राउझर्स आणि उपकरणांनुसार इमेजेसच्या क्वालिटीत किंवा साईझमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. व्यावसायिक किंवा अत्यंत संवेदनशील कामासाठी मूळ (Original) इमेजेसचा बॅकअप स्वतःकडे ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे वापरकर्त्याची (User) राहील.

४. तांत्रिक बिघाड किंवा नुकसान (Liability): या टूलचा वापर करताना इमेज खराब झाल्यास, डेटा नष्ट झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नुकसान झाल्यास, त्याला ‘kridavishwa.in’ ची टीम किंवा हे टूल जबाबदार राहणार नाही. हे टूल वापरून तुम्ही या सर्व अटी मान्य करत आहात.

Pro Bulk Image Resizer and Compressor Tool

🖼️ प्रो बल्क इमेज रिसायझर आणि कम्प्रेसर

एकाच वेळी अनेक इमेजेस निवडा. kridavishwa.in मार्फत वेब-ऑप्टिमाईज्ड, सुरक्षित आणि १००% प्रायव्हसी जपणारे मोफत टूल. (शक्यतो एकावेळी जास्तीत जास्त १५ – २० चित्रे निवडा, म्हणजे मोबाईल ब्राउज़र स्लो किंवा हैंग होणार नाही.)

नाव दिल्यास फाईल्स ‘नाव-1’, ‘नाव-2’ अशी सेव्ह होतील. रिकामे सोडल्यास मूळ नाव वापरले जाईल.

💡 टीप: फोटोची साईझ 200KB च्या आत आणण्यासाठी रुंदी (Width) किंवा उंची ८०० ते १२०0 ठेवावी.

क्वालिटी: 80% ✅ वेब-सेफ (Web Safe)

महत्त्वाची सूचना: उत्तम आणि जलद परिणामांसाठी कृपया एका वेळी जास्तीत जास्त १५ ते २० इमेजेस निवडा. एकाच वेळी खूप जास्त इमेजेस निवडल्यास ब्राउझर स्लो किंवा हँग होण्याची शक्यता असते. ( तुम्ही हे टूल कितीही वेळा मोफत वापरू शकता ! )


आर्थिक व्यवहाराशी निगडीत आमचे Smart Financial Toolkit ( स्मार्ट फायनान्शियल टूलकिट ) देखील वापरा. व रोजच्या किंवा नेहमीच्या वापरातील काही कॉमन कन्वर्शन करण्यासाठीचे लोकप्रिय टूल्स असलेले Common Converter (कॉमन कन्वर्टर) देखील वापरा.
Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.