Home / जीवनशैली / Loan व्याजदराची चिंता? किंवा रिटायरमेंट सेविंगची काळजी? सर्व Financial Calculator एकाच ठिकाणी!

Loan व्याजदराची चिंता? किंवा रिटायरमेंट सेविंगची काळजी? सर्व Financial Calculator एकाच ठिकाणी!

एका डिजिटल डॅशबोर्डवर घर, कार लोन (EMI) आणि निवृत्ती नियोजनाचे (Retirement) कॅल्क्युलेटर्स दर्शवणारे चित्र. यात दोन व्यक्ती आर्थिक नियोजन करत असल्याचे दाखवले असून, 'नियोजन करा' हे कॉल-टू-एक्शन बटण स्पष्टपणे दिसत आहे.

Financial Calculator Tools ची दैनंदिन जीवनातील गरज

आपण या ना त्या पद्धतीने रोज पैशांची देवाण घेवाण करत असतो यात कुठेतरी आपल्याला गरज पडते म्हणून का होईना पण काही व्यावहारिक निर्णय घावे लागतात जसे उदा. Loan म्हणजेच कर्ज कोणालाही घ्यावेसे वाटते म्हणून ती व्यक्ती कर्ज घेत असते असे नसून त्या व्यक्तीला काहीतरी अत्यंत आर्थिक गरज आहे, तेव्हाच तो कर्ज काढतो.

पण ज्यावेळी गरज असते त्यावेळी आपल्या मनाप्रमाणे कर्जाची रक्कम असो किंवा व्याजदर आपल्याला भेटत नाही आणि भेटला तरी वेळीच सावध होऊन पैशाचे नियोजन केले नाही तर कर्जाचा डोंगर पार पोखरून काढतो तेव्हा आपली रिस्क घेण्याची क्षमता किती आहे तसेच इतर सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे हे हिताचे असते.

तेव्हा योग्य वेळी अपेक्षित तांत्रिक मदत जसे अमुक रक्कम घेतल्यास मला किती कालावधीत इतक्या व्याजदरामुळे मला किती आगावू रक्कम द्यावी लागेल. तसेच एखादी व्यक्ती जेव्हा लोन घेण्या करिता बँकेत संपर्क साधते तेव्हा बँक त्याचे DTI (Debt to income) रेशो चेक करूनच लोन मंजूर करते अशावेळी आधीच ही माहिती तपासल्यास वेळेची बचत होतेच सोबत भविष्यातील आर्थिक नियोजन शक्य होते. किंवा अगदी रोजच्या व्यवहारातील एखाद्या वस्तू खरेदी किंवा बिला मधील जीएसटी दरा विषयी शंका असल्यास ते देखील financial toolkit मार्फत तपासून पाहू शकता.

वेळ व पैशाचे गणित

जसे लोन बाबत आहे तसेच थोड्या फार फरकाने सर्व व्यवहारांच्या बाबत असते. वेळेचे आणि पैशाचे एक विशिष्ट नाते आहे, जेव्हा तुम्ही 1 रुपया आहे म्हणता तेव्हा चाणाक्ष गुंतवणूकदार 1 रुपया केव्हाचा हे देखील नक्की विचारात घेतो. तेव्हा काळानुसार पैशाचे मोल बदलत असताना आजची गुंतवणूक भविष्यात काय फायदा देते यावर नक्कीच विचार करणे एक सजग व्यक्तीचे लक्षण आहे. आणि निवृत्ती नंतर पैशाची गरज ही सर्वांनाच असते.

अल्प रोजगार , Job Mismatch , आर्थिक नियोजनाचे महत्व

आर्थिक नियोजनाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे योग्य आर्थिक निर्णय घेऊनच तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित व आनंददायक बनवू शकता. आणि खासकरून मध्यमवर्गीय व त्यातल्या त्यात गेल्या 20 ते 30 वर्षातील प्राबल्याने बहुतांश तरुण पिढी ही भीषण बेरोजगारी तसेच अल्प बेरोजगारी किंवा Disguised Unemployment चे शिकार आहेत तेव्हा गुंतवणूक व निवृत्ती विषयक निर्णय घेणे हे अतिशय महत्वाचे ठरते.

Financial Calculator Toolkit चा वापर

खाली दिलेल्या Financial Calculator Toolkit मध्ये 8 वेगवेगळी financial कॅल्क्युलेटर्स आहेत जी आपल्याला नेहमी उपयोगात तर येतात व यापैकी व्याज, चक्रवाढ व्याज सारखे पर्याय कर्ज स्वरूपात घायची वेळ कोणावरही येऊ नये. परंतु वेळ आलीच तर पूर्ण तयार असणे आवश्यक असते तेव्हा याचा खूप उपयोग होईल.

खाली दिलेल्या 8 विविध Financial Calculator दिलेली आहेत यात टैब फॉर्मेट मध्ये आपल्या आवश्यकतेनुसार कैलकुलेटर निवडू शकता. यापैकी प्रथम नाव “EMI” आहे हे Loan EMI calculator असून याद्वारे कर्ज रकमेवर किती मासिक हप्ता बसतो हे समजते. पहिल्या रकान्यात कर्ज रक्कम व दुसऱ्या रकान्यात व्याजदर तर तिसऱ्या रकान्यात किती वर्षाची परत फेड आहे किंवा किती वर्षाची परतफेड घेतल्यास किती मासिक हप्ता बसतो हे बघण्यासाठी त्यानुसार वर्ष लिहिल्यास उत्तरात कर्जाचा मासिक हप्ता लिहून मिळतो.

दुसऱ्या टैब मध्ये जिथे नुसते “व्याज” लिहिले आहे ते आहे, “Loan Interest Calculator” आणि हे आपण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या कर्जा विषयी एकूण कालावधीत उपलब्ध व्याजदरानुसार जो मासिक हप्ता लागत/लागणार आहे त्यानुसार किती पैसे व्याज म्हणून आगावू देणे लागते या विषयी माहिती मिळण्यासाठी या calculator चा उपयोग होतो.

बऱ्याचदा आपल्याला व्याजदर खूप आकर्षक आहे, तसेच असा व्याजदर कुठेच मिळणार नाही असे सांगून कर्ज घेण्यासाठी फ़ोन येत असतात पण आपण जर पूर्ण विचार करून निर्णय घेतला नाही तर नंतर आर्थिक नुकसान होण्याचा धोका नाकारता येत नाही. तेव्हा या रकान्यात एकूण कर्ज रक्कम पहिल्या रकान्यात लिहून दुसऱ्या रकान्यात लागणारा मासिक हप्ता व एकूण टेन्योर म्हणजे परतफेडीची एकूण वर्षे लिहिल्यास एकूण कर्ज रकमेच्या अधिक किती पैसे द्यावे लागतील हे समजते. किंवा लोन घेतल्यानंतर देखील आपण किती पैसे देत आहोत हे पाहू शकता.

Loan EMI Calculator
Loan Interest Calculator
Debt-to-Income Calculator
Simple Interest Calculator
Compound Interest Calculator
Investment Return Calculator
Retirement Savings Calculator
GST/VAT Calculator
Income Tax Calculator
Inflation Calculator विषयी माहिती देणाऱ्या लेखाविषयी व मोफत ऑनलाइन calculator असलेल्या पोस्ट मधील आकर्षकता वाढविण्याच्या उद्देश्याने तयार चित्र
AI GENERATED IMAGE

स्मार्ट फायनान्शियल टूलकिट :

स्मार्ट फायनान्शियल टूलकिट

EMI
व्याज
DTI
साधे व्याज
चक्रवाढ
SIP
निवृत्ती
GST
आयकर
महागाई
मासिक हप्ता (EMI):
💡 माहिती: घर, कार किंवा वैयक्तिक कर्जाचा अचूक मासिक हप्ता (EMI) मोजा.
बँकेला दिलेले एकूण व्याज:
💡 माहिती: संपूर्ण कर्जाच्या कालावधीत तुम्ही मुद्दलाव्यतिरिक्त किती अतिरिक्त व्याज भरताय ते तपासा.
DTI प्रमाण:
💡 माहिती: नवीन कर्जासाठी तुमची पात्रता तपासा.
एकूण व्याज:
मुद्दल + व्याज:
💡 माहिती: साध्या व्याजाने मिळणारा परतावा किंवा द्यावे लागणारे व्याज मोजा.
एकूण मिळणारी रक्कम:
💡 माहिती: पैशाने पैसा कसा वाढतो! ‘चक्रवाढ व्याजाची’ ताकद समजून घ्या.
भविष्यातील एकूण संपत्ती:
💡 माहिती: म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारातील नियमित गुंतवणुकीचे फायदे.
निवृत्तीच्या वेळी जमा रक्कम:
💡 माहिती: आज केलेल्या बचतीतून निवृत्तीपर्यंत किती रक्कम जमा होईल ते पहा.
टॅक्स रक्कम:
बिलाची एकूण रक्कम:
💡 माहिती: खरेदी-विक्री करताना बिलातील GST रकमेची अचूक गणना करा.
भरावा लागणारा अंदाजे आयकर:
💡 माहिती: तुमच्या उत्पन्नानुसार सरकारला किती कर द्यावा लागेल याचा ढोबळ अंदाज.
भविष्यात लागणारी रक्कम:
💡 माहिती: महागाईमुळे आजच्या पैशाचे मूल्य भविष्यात कसे कमी होते, ते मोजा.

असेच वरील प्रत्येक टैब मधील कैलकुलेटर कशासाठी आहे हे थोडक्यात समजून घेऊ :

  • १. लोन EMI कॅल्क्युलेटर (Loan EMI Calculator): तुमच्या कर्जाच्या रक्कमेवर दरमहा किती हप्ता (EMI) भरावा लागेल, हे जाणून घेण्यासाठी हे टूल वापरा. 
  • २. व्याज कॅल्क्युलेटर (Loan Interest Calculator): घेतलेल्या कर्जावर संपूर्ण कालावधीत तुम्ही एकूण किती अतिरिक्त व्याज देणार आहात, हे मोजण्यासाठी हे टूल उपयुक्त आहे. 
  • ३. DTI कॅल्क्युलेटर (Debt-to-Income Calculator): तुमचे मासिक उत्पन्न आणि कर्जाचे हफ्ते यांचे गुणोत्तर (Ratio) तपासून तुम्ही नवीन कर्जासाठी पात्र आहात का, हे ठरवा.
  • ४. साधे व्याज कॅल्क्युलेटर (Simple Interest Calculator): मुद्दल, व्याजदर आणि कालावधी यानुसार साध्या व्याजाची सोपी गणना करण्यासाठी हे साधन वापरा.
  • ५. चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेटर (Compound Interest Calculator): तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाने भविष्यात किती मोठी रक्कम जमा होईल, हे पाहण्यासाठी हे टूल अतिशय प्रभावी आहे.
  • ६. गुंतवणूक परतावा कॅल्क्युलेटर (Investment Return Calculator): तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर दीर्घकाळात किती परतावा (Returns) मिळेल, याचे स्पष्ट प्रोजेक्शन हे टूल देते.
  • ७. निवृत्ती बचत कॅल्क्युलेटर (Retirement Savings Calculator): निवृत्तीच्या वेळी तुम्हाला आर्थिक सुरक्षिततेसाठी किती निधी हवा आहे आणि त्यासाठी आता किती बचत करणे गरजेचे आहे, हे मोजण्यासाठी हे टूल वापरा.
  • ८. GST/VAT कॅल्क्युलेटर (GST/VAT Calculator): कोणत्याही वस्तू किंवा सेवेच्या मूळ किमतीवर टॅक्स लावण्यासाठी किंवा एकूण किमतीतून टॅक्स वेगळा काढण्यासाठी हे साधन वापरा.
  • ९. आयकर कॅल्क्युलेटर (Income Tax Calculator): तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार सरकारला साधारणतः किती आयकर (Tax) भरावा लागेल, याचा अंदाज घेण्यासाठी हे टूल वापरा. 
  • १०. महागाई कॅल्क्युलेटर (Inflation Calculator): महागाईच्या दरानुसार भविष्यात एखाद्या वस्तूची किंवा सेवांची किंमत किती वाढेल, हे जाणून घेण्यासाठी या टूलचा वापर करा.
फोटो स्टोर करताना रिसाईज व कॉम्प्रेस करण्यासाठी आमचे मोफत प्रो बल्क इमेज रिसाइजर व कम्प्रेसर टूल देखील वापरा व, रोजच्या किंवा नेहमीच्या वापरातील काही कॉमन कन्वर्शन करण्यासाठीचे लोकप्रिय टूल्स असलेले Common Converter (कॉमन कन्वर्टर) देखील वापरा. 

आमचे अस्वीकरण, टर्म एंड कंडीशनगोपनीयता धोरण नक्की वाचा.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.