Home / मनोरंजन / आयुष्याचा प्रवास ( Life’s Journey ) सांगणारे सुविचार करा कॉपी एका क्लिक मध्ये

आयुष्याचा प्रवास ( Life’s Journey ) सांगणारे सुविचार करा कॉपी एका क्लिक मध्ये

A classical philosopher in a toga sits on a stone terrace with columns at sunset, holding a scroll and surrounded by ancient books, overlooking a Mediterranean coastal landscape. Large text reads "LIFE & PHILOSOPHICAL QUOTES", and a button says "EXPLORE QUOTES & GET INSPIRED".

खरेच सामर्थ्यवान आहेत ती शब्दे जी सांगतात आयुष्याचा प्रवास

सुविचार हे एखाद्या जादुई आदेशासारखे असतात; ते केवळ ऐकले तरी आपण त्यांचे पालन करण्यास प्रवृत्त होतो. आपण सर्वजण दररोज आपले आयुष्य जगत असतो, जणू काही आपल्याला काहीतरी करायचेच आहे; पण दिवसाच्या शेवटी, ज्या व्यक्तीने इतरांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत, तिलाच खरी ओळख आणि मान्यता मिळते.

आणि विचारवंतांनी इतरांच्या जीवनावर प्रभाव पाडण्यासाठी वापरलेल्या अनेक मार्गांपैकी ‘शब्द’ हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. शहाणपण हे आपल्या आयुष्यातील विषारी परिस्थितीवर उपाय करणाऱ्या अमृततुल्य औषधासारखे आहे आणि ते मिळवण्यासाठी ‘शिक्षण’ हेच एकमेव चलन आहे.

आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही एखाद्या गंभीर संकटात असाल (आणि तसे पाहता जवळजवळ प्रत्येकजणच कोणत्या ना कोणत्या संकटात असतोच), तर त्यातून स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शहाणपण; कारण शहाणपणाशिवाय तुम्हाला जे करणे आवश्यक आहे, ते तुम्ही करू शकणार नाही.

पण यासाठी एक निश्चित कृती आराखडा आहे: सर्वप्रथम, तुम्ही हे सुविचार मनात पक्के बिंबवून घेतले पाहिजेत आणि त्यांचा वापर केला पाहिजे. दररोज स्वतःला त्यांची आठवण करून द्या; यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.

जीवनशैली वरील तत्वज्ञान सांगणारे सुविचार

माझ्या मते , वरील सुविचारांचे अर्थ :

“The unexamined life is not worth living.” — Socrates

याचा अर्थ ”विना आत्मपरीक्षण जगणे हे व्यर्थ आहे”, हा सुविचार शेवटच्या क्षणी कदाचित उपयोगी पडणार नाहीत, परंतु सुविचाराचा उद्देश तुम्हाला अधिक चांगल्या आयुष्याकडे नेणे हा आहे; आणि हे सुविचार ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर, त्यातून दाखवलेल्या मार्गावर तुम्ही चाललात, तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरतील.

“I think, therefore I am.” — René Descartes

मी विचार करतो म्हणून मी आहे.” जगातल्या प्रत्येक गोष्टीला बौद्धिक सिद्धांतावर पडताळून पाहणे थोडक्यात अंधानुकरण टाळून विवेकशील विचाराला स्वीकारण्याचे सुविचार सुचवतो.

“He who has a why to live for can bear almost any how.” — Friedrich Nietzsche

”ज्याच्याजवळ जगण्याचा हेतू निश्चित आहे, तो कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो” असे सुविचारातून सांगण्या मागे उद्दयेश जगताना हेतू असणे महत्वाचे आहे व हेतू असला की, अडचणी ना दूर करण्याचे सामर्थ्य किंवा इच्छाशक्ती व्यक्ती मध्ये निर्माण होते असा आहे.

“To live is the rarest thing in the world. Most people exist, that is all.” — Oscar Wilde

‘live’ आणि ‘exist’ शब्द खुबीने वापरून सुविचार व्यक्तीला विचार करायला भाग पाडतो म्हणजे सुविचाराचा अर्थ सांगतो की, ”खरं जगणं क्वचितच कोणाला माहीत आहे बाकी नुसते जन्माला येतात आणि जातात.”

“We are what we repeatedly do. Excellence, then, is not an act, but a habit.” — Aristotle

आपण जे करतो तेच आपण बनतो, निपुणता ही कृती नाही सवय आहे.’‘ शिस्तीचे महत्व सांगण्यासाठी सुविचार प्रेरित करतो.

“Life can only be understood backwards; but it must be lived forwards.” — Søren Kierkegaard

‘आयुष्य केवळ मागे वळून पाहिल्यावरच समजते, परंतु ते जगताना पुढेच जगावे लागते.” सांगून इतिहास हा शिकण्यासाठीच फक्त वापरा आणि पुढचा विचार करून जागा असे सुविचार सांगतो.

“Man is condemned to be free; because once thrown into the world, he is responsible for everything he does.” — Jean-Paul Sartre

“माणूस स्वतंत्र राहण्यासाठी शापित आहे; कारण एकदा का तो या जगात फेकला गेला, की तो स्वतः करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःच जबाबदार असतो” असे सांगून स्वातंत्र्य तुम्ही निवडू शकत नाही असे सांगून कुठलीही कृती जबाबदारीने करण्यासाठी सुविचार प्रेरित करतो.

“Happiness is not an ideal of reason, but of imagination.” — Immanuel Kant

आनंद हा बुद्धीचा किंवा विवेकाचा ठायी भाव नाही, तर तो कल्पनाशक्तीचा ठायी भाव आहे” असे सांगत आपण ज्या भौतिक गोष्टींना आनंद मानतो तो केवळ कल्पनेतून निर्माण झालेला आनंद असल्याचे सुविचार सांगतो.

“No man ever steps in the same river twice, for it’s not the same river and he’s not the same man.” — Heraclitus

”कोणताही माणूस एकाच नदीत दोनदा पाऊल टाकू शकत नाही, कारण ती नदी तीच राहत नाही आणि तो माणूसही तोच राहत नाही” असे सांगून माणसाच्या आयुष्याच्या गतिमानशीलतेला अधोरेखित करत आयुष्याच्या गतिमानते बाबत मार्मिक सत्य माडले व बदलाचे सत्य स्वीकारणे हे आवश्यक आहे, असे सुविचारातून समजते.

“There is but one truly serious philosophical problem, and that is suicide.” — Albert Camus

“तत्त्वज्ञानात केवळ एकच खरोखर गंभीर प्रश्न आहे, आणि तो म्हणजे आत्महत्येचा होय” प्रत्येकाच्या वैचारिक स्थितीमध्ये केवळ एक अयोग्य गोष्ट खूप गंभीर आहे आणि ती म्हणजे आत्महत्येची मानसिकता असे सुविचार सांगून ह्या मानसिकते पासून स्वतः ला दूर ठेवण्याचे सांगतो.

“Whereof one cannot speak, thereof one must be silent.” — Ludwig Wittgenstein

ज्याविषयी माणूस बोलू शकत नाही, त्याविषयी त्याने शांत राहिले पाहिजे” आपण बोलताना विचार करून बोलले पाहिजे याविषयी सुविचार आग्रह धरतो.

“Out of timber so crooked as that from which man is made nothing entirely straight can be carved.” — Immanuel Kant

माणूस वाकड्या-तिकड्या लाकडापासून बनला आहे, त्यातून पूर्णपणे सरळ किंवा परिपूर्ण अशी कोणतीही गोष्ट कोरली जाऊ शकत नाही” सुविचारातून आपल्याला ‘चुका ह्या माणसाकडून घडू शकतात असे सांगून परिपूर्णतेचा हट्ट मर्यादे पलीकडे न नेण्याचा सल्ला मिळतो.

“Liberty consists in doing what one desires.” — John Stuart Mill

स्व इच्छीत कृती करण्यात स्वातंत्र्य दडले आहे ” स्वतःच्या इच्छेप्रमाणे काम करू शकणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे आहे हे गृहीत धरण्यास सुविचार सांगून, विचार आणि कृती चे व्यक्तिगत स्तरावरील स्वातंत्र्या विषयी स्वच्छंद मत ठेवण्या बद्दल सुविचार सुचवत आहे.

“To be is to be perceived.” — George Berkeley

सुविचार दिसायला लहान असला तरी खूप खोल अर्थाचा आहे यात”अस्तित्वात असणे म्हणजे अनुभूती मिळणे होय” असे शब्दश: वाटत असले तरी माझ्या मते, सुविचाराचा अर्थ हा : “अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपण अस्तित्वात आहोत. असा आहे.

“Life is a series of natural and spontaneous changes. Don’t resist them; that only creates sorrow.” — Lao Tzu

“जीवन हा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त बदलांचा एक प्रवाह आहे. त्यांना विरोध करू नका; कारण विरोध केल्याने केवळ दुःख निर्माण होते” आयुष्यातील बदलांकडे सकारात्मकतेने बघण्याचा सल्ला सुविचार देत आहे.

“Entities should not be multiplied unnecessarily.” — William of Ockham

कारण नसताना घटकांची किंवा गृहितकांची संख्या वाढवू नये” असे सांगत सुविचार आपल्याला विवेकशील कृती करण्यास सुचवत आहे.

“The brave man is he who overcomes not only his enemies but his pleasures.” — Democritus

”शूर माणूस तोच आहे जो केवळ आपल्या शत्रूंवरच नव्हे, तर आपल्या सुखांवर आणि वासनांवरही विजय मिळवतो’‘ अत्यंत मार्मिक पद्धतीने खरी शूरता कशात आहे हे सुविचार सांगते.

“Good and evil, reward and punishment, are the only motives to a rational creature.” — John Locke

”चांगले आणि वाईट, बक्षीस आणि शिक्षा, हेच विवेकवादी प्राण्याचे एकमेव प्रेरक ठरतात” माणसाला प्रेरणा कशातून मिळते हे सुविचार अत्यंत चपखल पणे थोडक्यात मांडतो आहे.

“The mind is furnished with ideas by experience alone.” — John Locke

“मानवी मनात विचारांची किंवा संकल्पनांची भर केवळ आणि केवळ अनुभवातूनच पडते” अनुभव हा उत्तम शिक्षक आहे असे आपण म्हणतो त्याप्रमाणे अनुभवातून आपल्याला संकल्पना मिळू शकतात हा सकारात्मक विचार करण्यास सुविचार सुचवते.

“The only true wisdom is in knowing you know nothing.” — Socrates

“खरे शहाणपण हे आपण काहीच जाणत नाही हे मान्य करण्यातच आहे” अतिशय मार्मिक पद्धतीने अजून शिकणे बाकी आहे असे स्वतःला शिकवणे व उन्मादापासून स्वतःला वाचवण्याचे सुविचार सांगतो.

येथे वरील सर्व सुविचारांचे मला वाटतात असे अर्थ मी लिहिले आहे मूळ गाभ्यातील अर्थ सारखाच आहे पण मूळ लेखकास एकूण अर्थापैकी बहुतांश अर्थ अभिप्रेत असू शकतो व इतर बाजूने (मूळ गाभ्यतील अर्थाशिवाय) थोडे मत भिन्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी लिहिलेले अर्थ लेखकाचे मत आहे असे मी म्हणत नाही. कृपया वाचकांनी विवेकशील दृष्टिकोनातून सुविचार वाचावेत.

Life & Philosophical

"The unexamined life is not worth living." — Socrates

"I think, therefore I am." — René Descartes

"He who has a why to live for can bear almost any how." — Friedrich Nietzsche

"To live is the rarest thing in the world. Most people exist, that is all." — Oscar Wilde

"We are what we repeatedly do. Excellence, then, is not an act, but a habit." — Aristotle

"Life can only be understood backwards; but it must be lived forwards." — Søren Kierkegaard

"Man is condemned to be free; because once thrown into the world, he is responsible for everything he does." — Jean-Paul Sartre

"Happiness is not an ideal of reason, but of imagination." — Immanuel Kant

"No man ever steps in the same river twice, for it's not the same river and he's not the same man." — Heraclitus

"There is but one truly serious philosophical problem, and that is suicide." — Albert Camus

"Whereof one cannot speak, thereof one must be silent." — Ludwig Wittgenstein

"Out of timber so crooked as that from which man is made nothing entirely straight can be carved." — Immanuel Kant

"Liberty consists in doing what one desires." — John Stuart Mill

"To be is to be perceived." — George Berkeley

"Life is a series of natural and spontaneous changes. Don't resist them; that only creates sorrow." — Lao Tzu

"Entities should not be multiplied unnecessarily." — William of Ockham

"The brave man is he who overcomes not only his enemies but his pleasures." — Democritus

"Good and evil, reward and punishment, are the only motives to a rational creature." — John Locke

"The mind is furnished with ideas by experience alone." — John Locke

"The only true wisdom is in knowing you know nothing." — Socrates

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.