Home / जीवनशैली / iPhone आवडतो? मग, ‘ ही ‘ चांगली वेळ दवडू नका, होईल मोठा फायदा.

iPhone आवडतो? मग, ‘ ही ‘ चांगली वेळ दवडू नका, होईल मोठा फायदा.

iPhone 18 update blogpost fetured image

iPhone ची इच्छा

फोन मध्ये फोन आयफोन 😜 बरोबर ना?, असो काहीही म्हणा एखादी व्यक्ती मोबाईल घ्यायला गेल्यावर भलेही दुसरा मोबाईल घ्यायचा ठरवून दुकानात आली असेल आणि त्याने तो विकत जरी घेतला तरी मोबाईल घेताना एकदा का होईना मनात आयफोन घ्यावा असं वाटत नाही तो माणूस निराळाच.

होय अगदी बरोबर आहे तुमचे; इतके महाग फोन त्यात बऱ्याचश्या सुविधा कित्येक वर्षांपासून अँड्रॉइड मध्ये आलेल्या पण आयओएस मध्ये नाहीत, त्यात designs देखील बल्की असेच असते. असे असून सुद्धा काय असेल बरं की खूप जणांना iPhone च घ्यावा वाटतो.

पर्याय प्रैक्टिकल असणे व न आवडण्याचे खरे कारण

मग हे सगळं स्टेटस करताच होतं का? की खरच काही special आहे या iPhone मध्ये ज्यामुळे सगळ्यांना तो फ़ोन आपल्या कडे पण असावा असे वाटते. पण फक्त काही जणांसाठी तो एक ‘ practical ‘ पर्याय नसतो, म्हणून नाकारल्या जातो. पण यामुळे घेणारे काही कमी होतात असे नाही.

आता वरकरणी एखादी व्यक्ती मला iPhone मुळीच आवडत नाही असे म्हणेलही पण ती व्यक्ती बहुतांशी त्याच्या ह्या वर दिलेल्या कारणांमुळे जसे सुविधा Android पेक्षा कमी, डिज़ाइन आवडीचे नाही, खूप महाग आहे असे म्हणत असते पण, एकंदर सुविधेचा भाग विचारात घेतला तर आजही फक्त iPhone नव्हे तर Apple कंपनी ने तयार केलेले संपूर्ण ecosystem हे सुविधा देण्यात अव्वल दर्जाचे काम करते यात कोणाचेही दुमत असण्याचे काही कारण नाही.

AI Generated Image

जेव्हा नवीन एखादा iPhone लाँच होतो तेव्हा अगदी जत्रेत उडावी अशी झुंबड उडते हे आपण देखील पाहिले असेल. आणि आयफोन च्या किमती ह्या सर्वांनाच म्हणजे फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील कितपत किफायतशीर वाटतात ह्या बद्दल देखील फारशी सांगायची गरज मला तरी वाटत नाही. कारण सर्वत्र मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती करिता iPhone हा शक्यतो प्रैक्टिकल थिंग म्हणून कधीतरीच राहिला आहे.

कंपनी विषयी विश्वास

म्हणून ही गर्दी ज्या फोन साठी होते किंवा जो विश्वास ह्या कंपनीने कमावला आहे की चार पैसे आगावू गेले तरी हरकत नाही पण Apple चेच उत्पादन घेऊ. आणि तसे दीर्घकाळ तर बरेच कंपन्यांचे उत्पादने चालतील पण ज्या दर्जाची सेवेची गुणवत्ता ग्राहकांना अभिप्रेत असते. ती गुणवत्ता देण्यात कंपनी आजपर्यंत तरी निश्चितच यशस्वी झाली आहे. 

आता आजपर्यंत म्हणत आहे त्याचे कारण ऍपल कंपनी बऱ्याच कालावधी नंतर एक आव्हानात्मक गोष्ट करताना दिसत असल्याचे दिसते , आव्हानात्मक एवढ्या करीता की, प्रत्येकच फ़ोन त्यातल्या त्यात एक नविन आव्हानच असतो पण ऍपल कंपनीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे जसे की, नेहमी एकायला मिळते की, अमुक सुविधा तर एंड्राइड मध्ये खूप वर्षापासून आहे मग ऐपल कंपनी ने ती अजून देखील दिली नाही.

तुलनात्मक तथ्य

पण काही काळानंतर का होईना ती सेवा देखील iOS वर पाहायला मिळते त्यावेळा एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते ती म्हणजे उशिरा का होईना पण iPhone असेल किंवा Apple कंपनी च्या इकोसिस्टम मधील इतर उत्पादने जसे आयपॅड, मॅकबुक असतील यांची एकमेकांशी सांगड चांगली घालून एकंदर सुविधेचा अनुभव कसा वाढवता येईल यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून, मग भलेही इतर ठिकाणी त्या आधीपासून सुरू असलेली सुविधा iOS किंवा MacOS वर उशिरा सुरू होते पण त्यात एक विशिष्ट स्थिरता जाणवते.

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित Foldable Phone ( फोल्डेबल फ़ोन )

आणि आता देखील हीच परंपरा कायम राहणार का?, ऍपल त्यांच्या स्टाईल मध्ये सेवेत स्थिरता असलेली गुणवत्ता दाखवू शकेल का हा प्रश्न आज बरेचसे नेटकरी विचारात आहेत. त्या मागे कारण आहे. ‘ फोल्डेबल फ़ोन ‘, होय तुम्ही नीट ऐकले आहे जवळजवळ मोबाईल जसा लोकांना माहीत झाला तसा सुरुवातीच्या काळापासून मोटोरोला सारख्या दिग्गज कंपन्यांनी फोल्डेबल फ़ोन बाजारात आणले आणि ते प्रचंड लोकप्रिय देखील झाले. परंतु ऍपल कंपनीने अद्यापही फोल्डेबल फ़ोन, मार्केट मध्ये आणलेले नाहीत आणि याविषयी उत्सुकता देखील काही नवीन नाही.

सुगावा लागला

पण आता कदाचित ही प्रतीक्षा लवकरच संपेल असे दिसायला लागले आणि पुन्हा एकदा या विषयी चर्चाना उधाण आले. याचे कारण म्हणजे ऍपल कंपनीने स्वतः जरी याविषयी कुठलेही ऑफिशल स्टेटमेंट ( अधिकृत वक्तव्य ) त्यांच्या नेहमीच्या पॉलिसी प्रमाणे केलेले नसले तरी जी काही यंत्रणा फ़ोन बनवण्यात किंवा ऍपल कंपनीशी संलग्न असते यांच्या मार्फत एक अशी बातमी बाहेर आली ज्यात apple कंपनी फोल्डेबल फ़ोन चे 10 मिलियन म्हणजेच 1 कोटी ढाचे मागवले आहेत.

यावरून तरी असे दिसते की कंपनी फोल्डेबल फ़ोन बाबत गंभीर आहे. पण ऍपल कंपनी ला फोल्डेबल फोन आणायला इतका वेळ का लागला? यामागे कारण देखील तसेच आहे. कारण फोल्डेबल फ़ोन ची रचनाच अशी क्लिष्ट आहे की यात चुकीला माफी नाही. आणि इथे एक उच्च पण समान दर्जाची गुणवत्ता जी आज पर्यंत कंपनीने देण्यात यश प्राप्त केले आहे, त्याला देखील बाधा तर पोहणार नाही ना? याची देखील काळजी घेत उत्पादन तयार करायचे आहे.

Apple ची पूर्व तयारी

आणि आताच काही काळा पूर्वी म्हणजे मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नवीन लॉंच झालेला iPhone 17 Air हा अत्यंत स्लिम फ़ोन बाजारात आणून ते या फोल्डेबल फ़ोन साठी तयार आहेत या विषयी जणू त्यांनी सुतोवाच केले होते. कारण सर्वसाधारण आयफोन म्हणले की जाडसर फ़ोन हे ठरलेले आहे आणि पकड नीट राहण्यासाठी देखील ते अत्यंत उपयोगी आहे, यातही शंका नाही.

पण आयफोन 17 एयर आणण्या मागे माझ्या मते कंपनीचा भविष्यात लॉंच केल्या जाणाऱ्या फोल्डेबल फ़ोन विषयी एक चांगली मानसिकता पहिले तयार व्हावी हा हेतू असावा असे मला तरी वाटते कारण त्यांचे जे मुख्य धारेचे फ़ोन आहे जसे आयफोन 13 पासून पुढे 16 , 17 ह्यांच्या पेक्षा वेगळे असे एयर कॅटेगरी मध्ये ह्या मोबाईल ला आणून त्यांचा जाहिरातीचा उद्देश्य जणू आम्ही तुमच्या साठी हे स्पेशल करत आहे पण आमची एक्सपर्टीज मात्र मुख्य प्रवाहातील फ़ोन जसे 13, 14, 16 ह्यांच्यातील बेस सेगमेंट आणि प्रो सेगमेंट फ़ोन मध्येच आहे.

iPhone 6 चा संबंध

तसे या अगोदर iPhone 6 देखील स्लिम होता आणि त्याला देखील त्याच्या वाटेची लोकप्रियता मिळाली एवढेच नाही तर आजही संग्रह करणारे हे फ़ोन त्यांच्या संग्रहात नक्की ठेवतात पण आयफोन 6 च्या वेळेस आणि त्यानंतर पुढील काही मॉडेल्स मध्ये त्यांना एक गोष्टीत त्यांच्या मनाप्रमाणे त्याना गुणवत्ता साध्य करता आली नव्हती ती म्हणजे फ़ोन चे मजबूत असणे या मुद्दावर कंपनी ला स्वतः चे काम हे त्यांच्या उच्च पण समान दर्जाच्या गुणवत्तेत बसणारे वाटत नव्हते. जे त्यांनी iPhone 17 air मध्ये करून दाखवले. हा मॉडल इतका सक्षम बनवला की त्याच्या बारीक असण्यावरील चर्चे पेक्षा बारीक असूनदेखील एकदम टफ असा हा फ़ोन आहे अशीच चर्चा एकायला मिळाली.

Apple ने साध्य केले?

आणि नेमके ह्याच विषयी ऍपल कंपनी मुळात वाट पाहत होती असे मला वाटते. कारण मुख्य प्रवाहातील नसून देखील अतिशय दर्जेदार असे उत्पादन आणून त्यांनी त्यांची कामाची पद्धत उत्तम असल्याचे दाखवून तर दिलेच सोबत फोल्डेबल फोन हे जास्त ड्युरेबल ( टिकाऊ ) नसतात अशी जी सामान्य धारणा आहे, जी की पूर्णत: चुकीची देखील नाही. यावर लोकमत बदलावे आणि त्यांचे इतर मुख्य धारेतील फ़ोन ची मार्केट मध्ये जशी लवकर खपत होते तशीच ह्या फोल्डेबल फ़ोन ची देखील व्हावी हा उद्देश असणे मला स्वाभाविक वाटते.

नेहमीपेक्षा आव्हानात्मक

कारण जसे मी आधीच म्हणालो की, हे इतर फ़ोन च्या तुलनेत अधिक आव्हानात्मक काम आहे जेव्हा फोल्डेबल फ़ोन बनवला जातो तो जाड असून चालणार नाही त्यामुळे तो खूप जुन्या काळातील वाटेल आणि स्लिम बनवल्या नंतर तो नाजूक असून देखील जमणार नाही जसे iPhone 6 , 6 प्लस मध्ये बेंडगेट इश्यू येत होते किंवा त्याविषयी ते त्यांच्या इतर फ़ोन इतके मजबूत नव्हते.

आणि बैटरी हा एक स्लिम फ़ोन मधील एक आव्हानात्मक मुद्दा आहे कारण ज्या फ़ोन मार्केट मध्ये हल्ली जास्त काळापर्यंत फ़ोन चार्ज न करता कसा वापरता येईल याविषयी विचार करून जास्त मोठ्या क्षमतेची बैटरी देण्याचा प्रयत्न केला जातो अश्या कम्पटीशन असलेल्या मार्केट मध्ये अतिशय लो परफॉरमेंस देऊन देखील जमणार नाही.

पण थांबा एवढेच नाहीये, आताच अशक्य वाटत आहे ना की एवढे असल्यास चांगला स्लिम फ़ोन बनेल कसा ज्यात सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या असतील. तर मग अजून काय राहिले तर ते म्हणजे ‘ हीट इश्यू ‘ काहीना वाटेल की मी असे का म्हणत आहे स्लिम फ़ोन कोणी हेवी गेमिंग करिता थोडीच वापरतात पण फक्त हेवी गेमिंग च हीट इश्यू ला कारणीभूत ठरत नाही तर सगळ्यांच्या आवडीचा कैमरा देखील ठराविक प्रमाणा पेक्षा जास्त वापरल्यास मोबाईल मध्ये हीट इश्यू झालेला दिसून येतो.

आणि कैमरा तर कोणत्याही मोबाईल मधील मुख्य आकर्षणाचे ठिकाण झाले आहे आणि त्यात आयफोन चा कॅमेरा असल्यावर विषयच वेगळा. आणि तसेही पाश्चात्य देशांतील बहुतांश थंड प्रदेशातील वातावरणात शक्यतो हीट इश्यू ही एवढी मोठी समस्या वाटत नसेल पण भारतात ह्या विषयी मात्र निश्चितच समस्या मोठी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. हिट इश्यू मध्ये भलेही सुरक्षेची काळजी घेतलेला आयफोन सुरक्षित राहील देखील पण वापरताना जी असहजता निर्माण होते ते कोणीच नाकारू शकणार नाही.

‘ प्रयत्नांती परमेश्वर ‘

तेव्हा वरील सर्व अडचणीवर मात करत ऐपल कंपनी ला फोल्डेबल फ़ोन तयार करायचा आहे. त्यामुळे आयफोन एयर ने ऍपल कंपनीचा स्लिम फ़ोन देखील मजबूत असू शकतो हे दाखवून देत पाडलेली छाप निश्चितच येणाऱ्या काळातील फोल्डेबल फोन खरेदी करणाऱ्या प्रत्येकाला प्रभावित नक्की करेल पण शेवटी फोल्डेबल फोन नुसता बारीक नसून त्यात हिंजेस असतात आणि स्क्रीन एकसलग असल्यास ती देखील iPhone मध्ये नेहमी वापरली जाणारी स्क्रीन वापरली जाणार नाही त्यामुळे परत तोच प्रश्न की उच्च पण समान दर्जाची गुणवत्ता देण्यात यंदा ऍपल यशस्वी होईल का?

असो दरवर्षी जवळपास सप्टेंबर अखेर पर्यंत फ़ोन किंवा आपले उत्पादने लॉन्च करणाऱ्या ऍपल कंपनी कडे सर्वांचे नेहमीपेक्षा जास्त लक्ष लागले आहे यात शंका नाही. पण जसे मी तुम्हाला म्हणालो की, iPhone आवडतो? मग, ‘ ही ‘ चांगली वेळ दवडू नका, होईल मोठा फायदा. याचा अर्थ असा कि, ‘ ही ‘ वेळ म्हणजेच आताची वेळ.

Stable एक्सपीरियन्स

कारण आपल्यापैकी बहुतांश वर्ग हा ऍपल कंपनीचे उत्पादने त्यांच्या उच्च गुणवत्ते मुळे, एकंदर वापरातील सुरेख अश्या स्थिरता देणाऱ्या अनुभवा करिता घेत असतो, आणि प्रत्येकाचा वापर हा उत्पादनांना आव्हान देणारा नसतो म्हणजे तांत्रिक बाबीनुसार विचार केल्यास iPhone 13 च्या A15 बायोनिक चिप पासून आयपॅड व मॅकबुक मधल्या A सीरीज च्या व M सीरीज च्या M2 ते M4 पर्यंत ची उत्पादने जवळ जवळ सर्व क्षेत्रातील व्यकींची कामाची पद्धत पाहता अतिशय लिलया ही उत्पादने कामे पूर्ण करतात. कुठलाही दबाव असल्याचे जाणवत नाही तेव्हा नवीन येणाऱ्या संभाव्य A20 चिप ची नितांत गरज आहे त्याशिवाय कामेच होणार नाहीत अश्या वर्गात मोडणाऱ्यांची संख्या इतरांच्या तुलनेत नगण्य असल्याचे मला तरी वाटते.

फायद्याचा सौदा.

मग जर जुनी उत्पादने देखील इतकी प्रभावी पणे कामे हाताळत असतील तर नव्याचा आग्रह का धरावा तर यात दोन गोष्टी बरेचसे ग्राहक विचारात घेतात ते म्हणजे एक सिक्योरिटी अपडेट्स व बैटरी लाइफ पण काही प्रमाणात का होईना बऱ्याचश्या प्रमाणात लोकाना अति सामान्य कामे ज्यात इंटरनेट चा फारसा अंतर्भाव नसतो ती करण्या साठी एक दर्जेदार व विश्वसनीय उत्पादन हवे असते त्या करिता नव्या तंत्रज्ञानाची मोजलेली किमंत निश्चितच फायद्याचा सौदा ठरत नाही. आणि याठिकाणी मग फार जुनी नसलेली पण काही उत्पादनांच्या अगोदरची उत्पादने खरेदी करणे निश्चितच फायद्याचं सौदा ठरतो.

जवळपास उत्पादनांची उपलब्धता

आता या ठिकाणी लक्षात एक घायचे आहे ते म्हणजे किती मागे जाणे ठीक राहील तर मला असे वाटते फारसा इंटरनेट चा वापर नसल्यास आयफोन मध्ये २०२२ मधील आयफोन १४ पासून पुढील फ़ोन तर आयपॅड मध्ये प्रो सीरीज च्या ५ ते ८ , एयर मधील ५ ते ७ , मिनी मधील 6 वे तर रेग्युलर मधील ९ ते ११ जनरेशन चे आयपॅड घेणे ठीक राहील तसेच मॅकबुक मध्ये M2 चिप असलेले लैपटॉप घेणे किफायतशीर ठरते. पण ही उत्पादने घेत असताना ऑनलाइन ही उत्पादने शक्यतो मिळत नसल्याने एक गोष्ट लक्षात घेत काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ही उत्पादने अधिकृत ऍपल उत्पादनांच्या विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी जेणेकरून यातील सुरक्षिततेचा संभाव्य धोका टाळता येतो.

आता याकरिता कदाचित तुम्हाला सर्व आजूबाजूस असलेल्या अधिकृत विक्रेत्याकडे आपल्या पसंतीच्या उत्पादनांच्या उपलब्धते विषयी चौकशी करावी लागू शकते. पण हा निर्णय तुमच्या खूप मोठी बचत करणारा असू शकतो.

हीच ती संधी आणि हीच ती वेळ

आणि जर तुम्हाला २०२५ मध्ये लाँच झालेला ‘आयफोन १७’ (iPhone 17) किंवा इतर कोणतीही ॲपल उत्पादने खरेदी करायची असतील, तर हीच ती योग्य वेळ आहे! दरवर्षीप्रमाणे नवीन उत्पादने मार्केटमध्ये आणण्यापूर्वी, कंपनी जुन्या मॉडेल्सचा स्टॉक संपवण्यासाठी त्यांच्या किमती कमी करते. यंदाही या किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्टुडंट आयडी (Student ID) किंवा विविध बँक क्रेडिट कार्ड्सवरील ऑफर्सचा स्मार्ट वापर करून तुम्ही मोठी बचत करू शकता. त्यामुळे खरेदीची ही सुवर्णसंधी अजिबात दवडू नका!

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.