Home / विचारवेध / फादर्स डे – कृतज्ञता फक्त एका दिवसासाठी ?

फादर्स डे – कृतज्ञता फक्त एका दिवसासाठी ?

फादर्स डे ब्लॉगसाठी वडील आणि मुलाच्या आनंदी मिठीचे छायाचित्र, ज्यावर 'HAPPY FATHER'S DAY' आणि 'बाबांसोबतच्या सुंदर प्रवासाचा आनंदोत्सव!' असा मजकूर आणि ब्लॉग वाचण्यासाठीचा कॉल-टू-ॲक्शन आहे."

Fathers Day बद्दल हितगुज

फादर्स डे च्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा 💐 🙏. “फादर्स डे, असो की अजून दुसरा कोणता ‘डे ‘असो हे काही मला पटत नाही. कृतज्ञता काय फक्त एका दिवसापूर्ती मर्यादित असते का? आपण त्यांना नेहमी लक्षात ठेवले पाहिजे” असे म्हणणारे आपले बरेचसे आप्तस्वकीय आपण पाहिले असतीलच, पण खरच आपण या विषयावर कधी विचार केला आहे का? की, एका दिवशीच फक्त आपण आठवण काढणे, त्यांच्या सोबत कृतज्ञतेने व्यवहार करणे आणि नंतर विसरणे योग्य आहे?

मानवी भावना

तर मित्रांनो माझ्या मते माणूस हा प्राणी अत्यंत ‘हुशार’ आहे. आणि सगळ्यात ‘स्वार्थी‘ देखील आहे. पण स्वार्थ आणि हुशारीची सांगड बसली की मग फार काही सांगायची गरज उरत नाही माणूस स्वतः ची खूप छान काळजी घेतो आणि त्यात काही वाईट देखील नाही. आपण स्वतः ची काळजी घ्यायला देखील हवी. पण फरक मुळात इथेच येतो तो म्हणजे व्यक्ती चे व्यक्तित्व चांगले असेल तर तो कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा, करुणा, दया, सहानुभूती, शांति, क्षमाशीलता, उत्साह, आदर, धैर्य, विश्वास, परोपकार, आधार देणे इत्यादी भावनांतून आपल्या स्वतः ला व दुसऱ्यांना अनुभूती देऊन आपले आयुष्य समृद्ध बनवतो. पण व्यक्तित्व चांगले नसेल तर उपरोक्त भावनांच्या विरोधी भूमिका घेऊन स्वतः चे व संपर्कात येणाऱ्या इतरांचे आयुष्य उदासीन बनवतो. किंवा त्याहून वाईट.

दिवस साजरे करणे

आता राहिला प्रश्न दिवस साजरे करायचा, तर प्रश्नातच उत्तर दडले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, ‘दिवस साजरे करणे‘ म्हणजेच साजरे काय करतो तर आपण मुख्यत्वे सन, उत्सव साजरे करतो आणि चांगल्या व्यक्तित्वाच्या उत्तम मानवी मनाने उत्सवात जसे आपण आपल्या आनंदा पेक्षा इतरांचा आनंद मुख्य मानून सर्वांच्या उपस्थितीत (माणूस समाजप्रिय असल्याने) हर्षोल्हासत कल्पकतेने विविध पद्धती ज्या कालओघात नंतर प्रथा म्हणून प्रचलित होतात त्या प्रकारे श्रावण महिन्यातील निसर्गा सारखे टवटवीत नजरेने, जुने विसरून नव्याची कास धरणारे धोरण अवलंबवत आशा – अपेक्षांच्या आधारे नात्यास नव संजीवनी देतो. तर मित्रांनो आपण देखील प्रत्येक दिवसा मागील उद्द्येश समजून घेऊन त्या दिवसाला उत्सवा सारखे साजरे नक्कीच साजरे करत असणार ह्याची मला खात्री आहे पण जरी आता पर्यंत केले नसतील तर इथून पुढे नक्की करावे एवढेच मी तरी सांगेन.

Fathers Day बद्दल

fathers day बद्दल अधिक माहिती जसे केव्हा सुरू झाला आणि इतर देश कश्या पद्धतीने साजरे करतात ह्या विषयी विकिपीडिया चे पान (मूळ लिंक) बरीच माहिती देते पण जुने दिवस साजरे करणे आणि नव्याने सुरू झालेले दिवस यांचे स्वागत करणे हे केवळ तीच व्यक्ती करू शकेल ज्यांना आपल्या तत्त्वांपेक्षा समोरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडेल.

वडिलांचे नाते

वडिलांच्या नात्यावर बऱ्याच छान-छान कविता, अनेक लघू पद्य व गद्य प्रचलित तसेच लोकप्रिय आहेत पण मला आवडलेले लघू पद्य म्हणजे वडिलांच्या प्रति कृतज्ञते विषयी अगदी सोप्या भाषेत जणू लहान मुलाचे बोबडे बोल पण शब्दांची फेक मात्र मोठी कौशल्याने करत मोठ्या गूढ अर्थाचे मत कवितेतून मांडताना पुढील ओळी मनाचा नेमका ठाव घेतात. त्या ओळी म्हणजे,

आपण वरील ओळींवर विचार केला तर लक्षात येईल की, आपण लहान असल्या पासून आपल्या आयुष्यात एक भक्कम आधार म्हणून उभा राहणारे आपले वडील आपल्या जडणघडणी मध्ये नेहमीच मुख्य भूमिका बजावत असतात. kridavishwa.in च्या माध्यमातून सर्व वाचकांस पिता दिवसाच्या (Fathers Day – 21 जून 2026) हार्दिक शुभेच्छा.

जसे एक मूल आपल्या वडिलांकडे एक आदर्श (रोल मॉडल) म्हणून पाहत असते तसेच वडिलांचे प्रेम देखील त्यांच्या उपदेशातून जाणवल्या शिवाय राहत नाही एका लेखकाने (एका पित्याने) अश्याच सुंदर उपदेशांची दोन कवितेत गुंफण घातली आहे. त्या दोन कविता संपूर्ण विश्लेषणा सोबत आपल्या kridavishwa.in च्या साहित्य या विभागात वाचायला उपलब्ध आहे.

वरील दोन कविता व अश्याच छान विषयांवरती विविध लेख वाचण्या करिता kridavishwa.in ला नेहमी भेट देत रहा.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.