SPIDER MAN – BRAND NEW DAY Movie
मार्वेल युनिव्हर्स मधील बहुचर्चित सिनेमा SPIDER MAN – BRAND NEW DAY लवकरच म्हणजे 31 जुलै 2026 ला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. Marvel Cinematic Universe मध्ये क्वचितच एखादे पात्र कमी लोकप्रिय असेल पण जास्त लोकप्रिय आहेत अश्या प्रमुख पात्रांपैकी SPIDER MAN हे एक मोठे लोकप्रिय असे पात्र आहेत आणि मूळ लोकप्रियता ह्या पात्रांना कॉमिक बुक्स मधूनच मिळाली हे जरी खरे असले तरी कॉमिक बुक्स चे कल्चर हे भारतात तरी विदेशा इतके लोकप्रियेतेत पुढे आहे किंवा होते असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे Marvel Universe असो की DC Universe असो, जागतिक स्तरावर त्यातल्या त्यात विशेष करून भारतात तरी कॉमिक बुक्स पेक्षा चित्रपटां मुळेच ह्यांच्या लोकप्रियतेत प्रामुख्याने भर पडली असे मला वाटते.
SPIDER MAN (मुख्य पात्र Tom Holland असलेल्या सीरीज मधील चौथा चित्रपट)
SPIDER MAN च्या लोकप्रियते बद्दल तुलना करायची झाली तर कदाचित चाहते वर्गात त्या विषयी मतमतांतरे भिन्न असतील पण एका कलाकाराने एका भूमिकेच्या एका पेक्षा जास्त चित्रपटात काम करण्याने जर पात्राची लोकप्रियता सिद्ध होत असेल तर SPIDER MAN हे एक असे पात्र आहे ज्यात एका भूमिकेचे एका पेक्षा जास्त स्वतंत्र चित्रपटे तर आहेतच पण त्या सोबतच एका पेक्षा अधिक कलाकारांनी वेगवेगळ्या स्वतंत्र चित्रपटांच्या मालिकेत काम करून ह्या SPIDER MAN पात्राची लोकप्रियता अधोरेखित केली आहे.
Tobey Maguire यांनी साकारलेले स्पाइडर मॅन मालिकेतील तीन चित्रपट
वर्ष 2002 , 2004 , 2007 साली अनुक्रमे SPIDER MAN , SPIDER MAN 2, व SPIDER MAN 3 या Sam Raimi दिग्दर्शित चित्रपटांनी जगभरात या पात्राचीच नाही तर अख्ख्या Marvel Universe ची ओळख करून दिली आणि जगभर लोकप्रिय झालेले हे चित्रपट आल्यानंतर आज 2026 मध्येही त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो Tobey Maguire यांनी साकारलेले स्पाइडर मॅन मुव्हीज अधिक उत्तम असल्याचे मानतात आणि कॉमिक बुक तसेच चित्रपटातील काही दृश्यांवरून Tobey यांनी साकारलेले स्पाइडर चे पात्र अधिक ताकतवर असल्याचे देखील सर्वसाधारण मत आहे.
Andrew Garfield यांनी साकारलेले स्पाइडर मॅन मालिकेतील दोन चित्रपट
कॉमिक बुक्स मधील विविधतेतून Andrew Garfield यांनी साकारलेले तसेच Marc Webb यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट हे स्पाइडर पात्रास अधिक अवखळ तसेच टिपिकल कॉलेज कुमार दाखवण्याचा प्रयत्न करतात. Andrew यांनी साकारलेले चित्रपट म्हणजे The Amazing Spider Man 2012 व The Amazing Spider Man 2014 आहेत.
Tom Holland सिरीज चे वेगळेपण
पण बऱ्याच वेळा ज्यांना MCU विषयी अजूनही जास्त माहिती नाही त्यांना वेगवेगळे कलाकार हे स्पाइडर मॅन चे चित्रपट फक्त नवीन पिढीसाठी नव्याने तयार करत असल्याचे वाटते परंतु याचे उत्तर तितकेसे सरळ नाही. कारण नवीन पिढीसाठी नव्याने चित्रपट काढणे ही गोष्ट काही नवीन नाही उदाहरणार्थ जंगल बुक असेल किंवा अलादीन असेल हे चित्रपट दर काही वर्षांनी नव्याने आणले जातात आणि असे अजून बरेच चित्रपट आहेत त्यामुळे त्यानुषंगाने हा तर्क बरोबर देखील म्हणावा लागेल पण MCU ज्याला ( Marvel Cinematic Universe ) असे म्हणले जाते म्हणजेच त्याचा अर्थ मार्वल चित्रपट कंपनीची काल्पनिक सृष्टी इथे UNIVERSE (सृष्टी) हा शब्द वापरून कल्पकतेला फक्त एका चित्रपटाच्या अंतर्गत मर्यादित न ठेवता त्यास अमर्यादित व्यापकतेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका सृष्टी ची कल्पना केली आणि त्यात विविध वास्तववादी व काल्पनिक नियमांच्या आधारे जादू, विज्ञान तसेच अमानवी शक्ती यांचा वापर करून मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून जनमत तयार करणे ह्या वैचारिक उद्दिष्टाना चित्रपटाच्या प्रभाव शक्तीचा उपयोग करून जगभर प्रसिद्धी सोबतच एक निष्ठावंत असा चाहता वर्ग देखील निर्माण केला.
अमर्यादित व्यापकतेची marvel सृष्टी/विश्व
आणि जेव्हा विषय एका व्यापक अश्या काल्पनिक सृष्टीचा येतो तेथे कथाकार असेल किंवा निर्माते यांनी जे MCU अंतर्गत येणाऱ्या चित्रपटांकरिता वास्तववादी व काल्पनिक नियम ठरवलेले आहेत त्या नियमांची विस्मृती न होऊ देता त्या नियमांची/ तत्वांची व पात्रांची योग्य प्रकारे पटकथेत गुंफण करता येणे हे महत्त्वाचे असते. आणि त्याच कारणामुळे जिथे यूनिवर्स शब्द वापरला तेव्हा कदाचित इतका पुढचा विचार नसावा पण जे नियम ठरवले असतील त्यातील एक म्हणजेच व्यापकतेचे स्वरूप अमर्यादित आहे म्हणूनच मल्टीवर्स ची संकल्पना मांडून Tobey असतील किंवा Andrew असतील यांनी साकारलेले स्पाइडर चे पात्र मल्टीवर्स मध्ये म्हणजेच वेगवेगळ्या सृष्टी/विश्वा पैकी एका marvel विश्वातील कथानक व त्यातील पात्र आहे.
विविध विश्वातील मुख्य विश्व
पण मल्टीवर्स मध्ये ह्या विविध विश्वांपैकी मुख्य विश्व असलेले ज्यात इतरही प्रसिद्ध लोकप्रिय पात्रांची कथा येते किंवा प्रत्येक कथा वेगवेगळ्या विश्वाची दाखवण्या पेक्षा Marvel यांनी माझ्या मते जाणीवपूर्वक कथानकाशी प्रेक्षकांना अधिक आपुलकी किंवा जवळीक वाटावी म्हणून एक मुख्य विश्व निवडून काही चित्रपटांची कथा व त्यातील पात्रे हे एका मुख्य विश्वातील असल्याचे दाखवले आहे. आणि त्यातील सर्वप्रसिद्ध अवेंजर मालिकेतील एंडगेम चित्रपट आपण पहिला असेलच तर मुळात अवेंजर मालिकेतील कथानक व त्यातील जवळजवळ सर्व पात्रे ही मुख्य marvel विश्वातील दाखवली आहे. आणि त्यातीलच Tom Holland यांनी साकारलेले स्पाइडर पात्र आहे.
कथेची मालिकेसारखी गुंफण
आता मुख्य विश्वाची योजना ठेवण्या मागे प्रमुख कारण जितके कथेशी व चाहता वर्गाच्या मागणी शी संबधित आहे तितकेच ते व्यवसायिक दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे. पण इथे कथेचा विचार केला तर आपण लक्षात घेऊ शकतो की, त्यामुळे कथेमध्ये मालिकेसारखी गुंफण करणे आणखी सोयीस्कर होते हे निश्चित.
विविध विश्वातील वेगळेपण आणि साम्य
प्रत्येक कलाकाराने ज्यांनी स्पाइडर ची भूमिका साकारली त्यांनी त्यांचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला किंवा करण्यात ते नि:संशय यशस्वी झाले परंतु जसे की कॉमिक बुक ची व चित्रपटांची सांगड घालत असताना तसेच मल्टीवर्स ची संकल्पना अधिक वास्तववादी वाटण्या करिता प्रत्येक स्पाइडर पात्रा मध्ये मुख्य गोष्टी जश्या की पात्राचे उद्येश्य, सामाजिक व सर्वसाधारण परिस्थिती इत्यादि मध्ये सारखे पणा ठेवून काही गोष्टी मध्ये भिन्नता ठेवणे जसे की त्यांची अमानवी शक्ती ही निश्चितच मानवी मर्यादे पेक्षा जास्तच आहे परंतु त्यांच्यातच (वेगवेगळ्या विश्वातील स्पाइडर मॅन मध्ये) एकमेकांमध्ये तुलना केल्यास शक्तीचे प्रमाण वेगळे जाणवायला हवे.

Spider Man – Brand New Day मधील सरप्राइज
आणि त्यामुळेच Tobey यांनी साकारलेले स्पाइडर चे पात्र हे स्वत: च्या शरीरातूनच जाळे फेकू शकते तर इतर दोन पात्रांत ही समानता नाही. किमान आतातरी दिसत नाहीये पण नवीन आलेल्या ट्रेलर नुसार यामध्ये बदल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागील एवेंजर व Tom Holland यांनी साकारलेल्या स्पाइडर च्या भूमिकेतील स्पाइडर मॅन चे पात्र हे विकसित होत असलेल्या स्पाइडर सारखे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जो की त्यांच्या मुख्य विश्वाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पात्रांच्या वेगवेगळ्या कथानकांत स्पाइडर मॅन चे पात्र तितकेच रंजक बनवून ठेवण्या साठी आवश्यक असल्याचे निर्मात्यानं वाटत असावे असे मला वाटते. आणि व्यावसायिक दृष्टीने देखील हा निर्णय बरोबर असल्याचा वाटतो.
नवीन ट्रेलर यूट्यूब वर पाहण्या साठी खालील चित्रावर क्लिक करा.

भविष्यातील योजना
Tobey यांनी साकारलेले स्पाइडर मॅन चे पात्र नि:संशय अधिक शक्तिशाली दाखवले होते जे की मार्वेल च्या मुख्य विश्वात नाही पण पुढील कथानकांत मुख्य विश्वातील स्पाइडर मॅन चे पात्र अधिक रंजक बनवण्या साठी Tom यांचे स्पाइडर मॅन चे पात्र निश्चितच अधिक शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनोरंजन विश्वातील अश्याच रंजक माहिती व विश्लेषणा साठी kridavishwa.in ला नेहमी भेट देत रहा.
आणखी वाचा : Dridam सिनेमा कसा आहे.?






