Home / अपडेट / नोकरी शोधताय ? SBI मध्ये Vacancies उपलब्ध

नोकरी शोधताय ? SBI मध्ये Vacancies उपलब्ध

SBI PO Recruitment 2026-27 Notification Out - ऑनलाईन अर्ज आणि महत्त्वाचे तपशील

SBI मध्ये भरती देशभरात 1500 जागांवर

सर्वांना नमस्कार 🙏, भारतात बँकेत नोकरीला आहे म्हणले की एक वेगळाच रुबाब असतो आणि त्यात पुन्हा SBI बँकेत नोकरीला आहे सांगितल्यावर प्रश्नच नाही. तेव्हा यंदा बॅंकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थांसाठी आनंदाची बातमी म्हणजे देशभरात 1500 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी SBI (अधिकृत संकेतस्थळ ची लिंक) ने अधिसूचना जाहीर केली असून त्यानुसार ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 18 जून 2026 ते 08 जुलै 2026 दरम्यान आहे. 8 जुलै रोजी अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पूर्वपरीक्षा (prelims) अंदाजे या वर्षी ऑगस्ट महिन्यात तर मुख्य परीक्षा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये इतर चाचण्या व गट चर्चा तसेच मुलाखतीचे टप्पे पार पाडून डिसेंबर अखेर अंतिम निकाल लागू शकतो.

SBI PO अर्जदार पात्रता अटी

वयाची अट

अर्जदार 30 वर्षापेक्षा मोठा किंवा 21 पेक्षा कमी नसावा म्हणजेच 1996 ते 2005 मधील जन्म असलेलेच अर्जदार पात्र असतील तसे सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गा साठी वयोमर्यादेत सवलत राहू शकते.

शैक्षणिक अट

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे. सध्या अतिम वर्षात किंवा अजून प्रमाणपत्र प्राप्त झाले नसेल अश्या उमेदवारांनी अर्ज केला आणि मुलाखतीसाठी निवड झाली तर तेथे पदवी शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल याचा विचार करून त्या दृष्टीने अर्ज करताना विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत.

अर्जाचे शुल्क

उपलब्ध माहितीवरून सर्वसाधारण पणे खुल्या प्रवर्गा करिता 750/- रुपये शुल्क भरणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

SBI भरती साठी अर्ज कसा करावा?

SBI PO Recruitment 2026-27 Notification Out - ऑनलाईन अर्ज आणि महत्त्वाचे तपशील
Source : https://sbi.bank.in/web/careers/current-openings

SBI PO ची निवडप्रक्रिया

पहिला टप्पा – Prelims

साधारण पणे एसबीआय PO पद भरती दरम्यान प्रक्रिया सुरुवात ते शेवट तीन प्रमुख टप्प्यांत पार पडेल. जसे की, पूर्व परीक्षा (Prelims) हा पहिला टप्पा असेल ही परीक्षा 1 तासाची एकूण 100 गुणांची ऑनलाइन पद्धतीची राहणार आहे आणि यात इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर प्रश्न विचारले जातील. या टप्प्यातील परीक्षेत सेक्शनल कट ऑफ नसतो

दुसरा टप्पा – Main Exam

या टप्प्यात Prelims पास झालेले उमेदवार पात्र ठरतात आणि यावेळी 200 गुणांची बहुपर्यायी (Objective) व 50 गुणांची वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा असेल.

तिसरा टप्पा

या टप्प्यात केवळ एक परीक्षा नसून यात सायकोमॅट्रिक चाचणी, गट चर्चा तसेच मुख्य मुलाखत अश्या तीन परीक्षेतून उमेदवारास जावे लागू शकते.

जर आपणही या परीक्षेची तयारी करत आहात तर kridavishwa.in च्या सर्व टीम तर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 💐

अस्वीकरण (Disclaimer)

१. केवळ माहितीच्या उद्देशाने (For Informational Purposes Only): या ब्लॉगवर/वेबसाईटवर दिलेली ‘SBI PO भरती २०२६’ (किंवा कोणतीही इतर भरती) विषयीची माहिती केवळ उमेदवारांच्या सोयीसाठी, जागरूकतेसाठी आणि शैक्षणिक उद्देशाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२. शासकीय / बँक संस्थेशी कोणताही संबंध नाही (No Official Affiliation): हा एक स्वतंत्र ‘ओपिनियन ब्लॉग’ असून आमचा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), भारत सरकार किंवा कोणत्याही शासकीय, निम-शासकीय किंवा खासगी प्राधिकरणाशी कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही.

३. निवड प्रक्रियेत शून्य सहभाग (Zero Involvement in Selection Process): बँकेच्या किंवा कोणत्याही शासकीय विभागाच्या अर्ज प्रक्रियेत, छाननीत, परीक्षा पद्धतीत किंवा अंतिम निवड प्रक्रियेत या ब्लॉगचा किंवा माझा (ब्लॉगरचा) शून्य सहभाग आहे. उमेदवारांची निवड पूर्णपणे संबंधित बँक/विभागाच्या अधिकृत नियमांनुसार आणि उमेदवाराच्या गुणवत्तेवर (Merit) आधारित असते. आम्ही कोणालाही नोकरी देण्याचे आश्वासन किंवा हमी देत नाही.

४. अधिकृत माहितीची पडताळणी (Verification of Official Information): आम्ही अधिकृत जाहिरातीचा आधार घेऊन अचूक माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तरीही, अनावधानाने या माहितीत कोणतीही चूक (Typo), त्रुटी किंवा अपूर्णता राहिल्यास आम्ही त्यास जबाबदार राहणार नाही. वाचकांनी आणि उमेदवारांनी अर्जाची फी, तारखा, पात्रता, अभ्यासक्रम आणि इतर सर्व नियमांची खात्री करण्यासाठी नेहमी SBI च्या अधिकृत वेबसाईटला (sbi.co.in) भेट देऊन मूळ जाहिरात (Official Notification) स्वतः वाचणे बंधनकारक आहे.

५. जबाबदारीतून मुक्ती (No Legal/Financial Liability): या ब्लॉगवरील माहितीच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयामुळे (उदा. अर्ज बाद होणे, मुदत उलटून जाणे, आर्थिक नुकसान इ.) उमेदवाराचे किंवा वाचकाचे कोणतेही नुकसान झाल्यास, त्यास मी (ब्लॉगर) किंवा ही वेबसाईट जबाबदार राहणार नाही. कोणत्याही भरतीसाठी अर्ज करताना वाचक स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर आणि जोखमीवर अर्ज करत आहेत.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.