सदर लेख फक्त माहितीकरिता आहे, वैद्यकीय सल्ला तसेच तपासणी किंवा उपचारा करिता तज्ञांना भेटा.
चला बनवू सुदृढ समाज, तेव्हाच बनेल सुदृढ देश
BMI – Body Mass Index का तपासतात ?
BMI – ( बॉडी मास इंडेक्स ) ही एक पद्धत आहे किंवा गणितीय सूत्रांच्या आधारे तुमच्या शरीराचे मूल्यांकन करणे असे आपण म्हणू शकतो. या करिता उंची, वजन अशी माहिती विचारात घेऊन तुम्ही सुदृढ / निरोगी आहात की काही समस्या आहे याचे निदान केले जाते.
BMI कसा मोजतात.
BMI मोजण्या करिता जे गणित आहे ते समजणे अत्यंत सोपे आहे. याचे समीकरण म्हणजे वजनाचा उंचीशी संबंध लावून तुम्ही तुमच्या उंचीनुसार योग्य वजन आहे की नाही हे तपासायचे असते. याकरिता खालील गणिताचे सूत्र वापरले जाते.
BMI = वजन (किलोग्रॅम) /(भागिले), उंचीचा वर्ग (मीटरमध्ये)
तसेच खाली दिलेल्या BMI Calculator Tool मध्येही हेच गणित वापरले आहे ज्याद्वारे आपल्याला वजन व उंची सारखी माहिती भरल्यानंतर बीएमआय कळतो.
तुमचा बीएमआय (BMI) तपासा
Your BMI is
पण मग आलेले उत्तर नेमके काय सांगते बरं, तर यामागे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांनुसार काही निकष आहेत ते असे की,
- जर बीएमआय निकाल 18.5 च्या खाली असेल तर तुमचे वजन कमी आहे
- आणि जर निकाल 18.5 ते 24.9 या दरम्यान असेल तर तुमचे वजन सामान्य आहे.
- तसेच 25.0 ते 29.9 या दरम्यान निकाल आल्यास तुमचे वजन जास्त आहे.
- आणि बीएमआय निकाल हा 30.0 च्या देखील वर असेल तर लठ्ठपणा असल्याचे दिसून येते.
सदर लेखातील माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने दिली आहे याविषयी माहितीची अचूकता किंवा वयक्तिक प्रकृती परत्वे याचे फरक विषयी आम्ही दावा करीत नाही. योग्य उपचार/ सल्ल्या करिता तज्ञांची भेट आवश्यक असते.
बीएमआय कैलकुलेटर ही एक अशी आवश्यक माहिती आहे ज्या द्वारे आपण आपले वजनाचे नियोजन करू शकतो आणि हे साधन सतर्क राहण्या बरोबरच हे एक प्रेरणा देणारे किंवा उद्युक्त करणारे देखील ठरू शकते. आणि शेवटी म्हणतात ना " बेटर सेफ दैन सॉरी " तसे वेळीच माहिती घेत योग्य पाऊले उचलली तर येऊ घातलेल्या संभाव्य धोक्या पासून स्वतः चे संरक्षण देखील करता येते.
तसेच वजन वाढविणे, घटविणे, स्नायू वाढविणे त्याला बळकटी देणे, सध्याचे आरोग्य टिकवणे सारख्या ध्येयाला गाठण्यासाठी देखील उपयुक्त असे हे BMI कैलकुलेटर वापरणे हिताचे ठरते. निरोगी जीवनशैली अंगिकारताना बीएमआय टूल हे एक " मस्ट हॅव " साधन आहे.
निकाला नंतर काय करावे.
तर मग तपासला का BMI, मग आता काय करायचे? असा प्रश्न फक्त माणसाला काही तरी व्यवस्थित नसले तरच जास्तकरून पडतो जेव्हा सामान्य परिस्थिती असते तेव्हा व्यक्ती शक्यतो दुर्लक्ष करणे हाच पर्याय निवडतो.
पण असो, जर तुमचा निकाल सामान्य असेल तर अभिनंदन पण सोबतच एक विनंती समाज सुदृढ तर देश सुदृढ या विचाराने सांगावे वाटतेकी, जरी निकाल सामान्य म्हणजेच चांगला आला तर निवांत होऊ नका आणि निकाल सामान्य नसेल तर घाबरून देखील जाऊ नका; पण सामान्य निकाल आलेल्यांनी आपली प्रकृती अशीच स्थिर आणि उत्तम कशी ठेवता येईल याकडे लक्ष द्यायचे असते. तर निकाल सामान्य नसलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांकडून योग्य तो सल्ला घेऊन आपली दिनचर्या ठरवून घेणे फायदेशीर ठरते.
योग्य संतुलित आहार व नियमित व्यायाम हेच सुदृढ भविष्याची चावी आहे
शेवटी कसेही केले तरी ऐक्टिव राहणे आणि एक्सरसाइज करणे हे आवश्यक आहे पण याठिकाणी एक्सरसाइज करताना एक्सर्शन तर होत नाहीये ना याची देखील काळजी घायची आहे. बऱ्याचदा खूप लोक याच चक्रात अडकल्या सारखे दिसतात जे नेहमी काहीतरी ठरवून आपली परिस्थिती सुधारायचे पाहत असतात. पण योग्य पद्धत न वापरल्याने नेहमीच गोंधळलेले असतात.
योग्य संतुलित आहार व नियमित व्यायाम हेच सुदृढ भविष्याची चावी आहे, असे बऱ्याच ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल 😅. आणि बरोबर देखील आहे पण ही गोष्ट पूर्ण आहे का? तर हो देखील आणि नाही देखील त्याचे कारण गुंतागुंतीचे आहे. पण शब्दाचे भ्रम मोडणे हेच तर खर्या सुजाण व्यक्तीचे लक्षण असते.
तर वरील वाक्य पूर्ण नाही असे मी म्हणण्या मागे माझा उद्देश एवढाच आहे की 'योग्य संतुलित आहार' - आधी एवढ्याच शब्दांची मीमांसा केली तर लक्षात येईल की योग्य ठरवणे कोणाच्या हातात आहे तर तज्ञांच्या पण घरोघरी तज्ञ बनतात कोण तर - आपणच 🤣, दुसरे म्हणजे संतुलिक आहार, आता इथे आणखीन एक पंचाईत होते ती म्हणजे प्रोफेशनल म्हणवून घेणारे आणि खरेच प्रोफेशनल असणारे यात देखील फरक ओळखणे दिवसेंदिवस आव्हानात्मक ठरत आहे. कारण कम्पटीशन चा जमाना आहे; पण ते आवश्यक आहे. कारण एक जण एक माहिती देईल तर दुसरा दुसरीच आणि चुकीची माहिती आपले नुकसान करू शकते.
तेव्हा खरेच प्रोफेशनल आहेत अश्यांकडून संतुलित आहार कसा घ्यायचा याविषयी माहिती घेत त्याचा आहारात समावेश करावा. आणि व्यायामाच्या बाबतीत देखील तो आधी शिकून घेणे सर्वात महत्वाचे आहे.
आमचे अस्वीकरण, टर्म एंड कंडीशन तसेच गोपनीयता धोरण वाचा.






