Financial Calculator Tools ची दैनंदिन जीवनातील गरज
आपण या ना त्या पद्धतीने रोज पैशांची देवाण घेवाण करत असतो यात कुठेतरी आपल्याला गरज पडते म्हणून का होईना पण काही व्यावहारिक निर्णय घावे लागतात जसे उदा. Loan म्हणजेच कर्ज कोणालाही घ्यावेसे वाटते म्हणून ती व्यक्ती कर्ज घेत असते असे नसून त्या व्यक्तीला काहीतरी अत्यंत आर्थिक गरज आहे, तेव्हाच तो कर्ज काढतो.
पण ज्यावेळी गरज असते त्यावेळी आपल्या मनाप्रमाणे कर्जाची रक्कम असो किंवा व्याजदर आपल्याला भेटत नाही आणि भेटला तरी वेळीच सावध होऊन पैशाचे नियोजन केले नाही तर कर्जाचा डोंगर पार पोखरून काढतो तेव्हा आपली रिस्क घेण्याची क्षमता किती आहे तसेच इतर सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे हे हिताचे असते.
तेव्हा योग्य वेळी अपेक्षित तांत्रिक मदत जसे अमुक रक्कम घेतल्यास मला किती कालावधीत इतक्या व्याजदरामुळे मला किती आगावू रक्कम द्यावी लागेल. तसेच एखादी व्यक्ती जेव्हा लोन घेण्या करिता बँकेत संपर्क साधते तेव्हा बँक त्याचे DTI (Debt to income) रेशो चेक करूनच लोन मंजूर करते अशावेळी आधीच ही माहिती तपासल्यास वेळेची बचत होतेच सोबत भविष्यातील आर्थिक नियोजन शक्य होते. किंवा अगदी रोजच्या व्यवहारातील एखाद्या वस्तू खरेदी किंवा बिला मधील जीएसटी दरा विषयी शंका असल्यास ते देखील financial toolkit मार्फत तपासून पाहू शकता.
वेळ व पैशाचे गणित
जसे लोन बाबत आहे तसेच थोड्या फार फरकाने सर्व व्यवहारांच्या बाबत असते. वेळेचे आणि पैशाचे एक विशिष्ट नाते आहे, जेव्हा तुम्ही 1 रुपया आहे म्हणता तेव्हा चाणाक्ष गुंतवणूकदार 1 रुपया केव्हाचा हे देखील नक्की विचारात घेतो. तेव्हा काळानुसार पैशाचे मोल बदलत असताना आजची गुंतवणूक भविष्यात काय फायदा देते यावर नक्कीच विचार करणे एक सजग व्यक्तीचे लक्षण आहे. आणि निवृत्ती नंतर पैशाची गरज ही सर्वांनाच असते.
अल्प रोजगार , Job Mismatch , आर्थिक नियोजनाचे महत्व
आर्थिक नियोजनाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे योग्य आर्थिक निर्णय घेऊनच तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित व आनंददायक बनवू शकता. आणि खासकरून मध्यमवर्गीय व त्यातल्या त्यात गेल्या 20 ते 30 वर्षातील प्राबल्याने बहुतांश तरुण पिढी ही भीषण बेरोजगारी तसेच अल्प बेरोजगारी किंवा Disguised Unemployment चे शिकार आहेत तेव्हा गुंतवणूक व निवृत्ती विषयक निर्णय घेणे हे अतिशय महत्वाचे ठरते.
Financial Calculator Toolkit चा वापर
खाली दिलेल्या Financial Calculator Toolkit मध्ये 8 वेगवेगळी financial कॅल्क्युलेटर्स आहेत जी आपल्याला नेहमी उपयोगात तर येतात व यापैकी व्याज, चक्रवाढ व्याज सारखे पर्याय कर्ज स्वरूपात घायची वेळ कोणावरही येऊ नये. परंतु वेळ आलीच तर पूर्ण तयार असणे आवश्यक असते तेव्हा याचा खूप उपयोग होईल.
खाली दिलेल्या 8 विविध Financial Calculator दिलेली आहेत यात टैब फॉर्मेट मध्ये आपल्या आवश्यकतेनुसार कैलकुलेटर निवडू शकता. यापैकी प्रथम नाव “EMI” आहे हे Loan EMI calculator असून याद्वारे कर्ज रकमेवर किती मासिक हप्ता बसतो हे समजते. पहिल्या रकान्यात कर्ज रक्कम व दुसऱ्या रकान्यात व्याजदर तर तिसऱ्या रकान्यात किती वर्षाची परत फेड आहे किंवा किती वर्षाची परतफेड घेतल्यास किती मासिक हप्ता बसतो हे बघण्यासाठी त्यानुसार वर्ष लिहिल्यास उत्तरात कर्जाचा मासिक हप्ता लिहून मिळतो.
दुसऱ्या टैब मध्ये जिथे नुसते “व्याज” लिहिले आहे ते आहे, “Loan Interest Calculator” आणि हे आपण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या कर्जा विषयी एकूण कालावधीत उपलब्ध व्याजदरानुसार जो मासिक हप्ता लागत/लागणार आहे त्यानुसार किती पैसे व्याज म्हणून आगावू देणे लागते या विषयी माहिती मिळण्यासाठी या calculator चा उपयोग होतो.
बऱ्याचदा आपल्याला व्याजदर खूप आकर्षक आहे, तसेच असा व्याजदर कुठेच मिळणार नाही असे सांगून कर्ज घेण्यासाठी फ़ोन येत असतात पण आपण जर पूर्ण विचार करून निर्णय घेतला नाही तर नंतर आर्थिक नुकसान होण्याचा धोका नाकारता येत नाही. तेव्हा या रकान्यात एकूण कर्ज रक्कम पहिल्या रकान्यात लिहून दुसऱ्या रकान्यात लागणारा मासिक हप्ता व एकूण टेन्योर म्हणजे परतफेडीची एकूण वर्षे लिहिल्यास एकूण कर्ज रकमेच्या अधिक किती पैसे द्यावे लागतील हे समजते. किंवा लोन घेतल्यानंतर देखील आपण किती पैसे देत आहोत हे पाहू शकता.

स्मार्ट फायनान्शियल टूलकिट :
स्मार्ट फायनान्शियल टूलकिट
—
—
—
मुद्दल + व्याज: —
—
—
—
बिलाची एकूण रक्कम: —
—
—
अस्वीकरण (Disclaimer): या पेजवरील सर्व फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशाने (Educational purposes) दिलेली आहेत. यातून मिळणारे आकडे हे अंदाजित आहेत आणि तो कोणताही व्यावसायिक किंवा गुंतवणुकीचा सल्ला (Financial Advice) नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा (Certified Financial Advisor) सल्ला नक्की घ्या.
असेच वरील प्रत्येक टैब मधील कैलकुलेटर कशासाठी आहे हे थोडक्यात समजून घेऊ :
- १. लोन EMI कॅल्क्युलेटर (Loan EMI Calculator): तुमच्या कर्जाच्या रक्कमेवर दरमहा किती हप्ता (EMI) भरावा लागेल, हे जाणून घेण्यासाठी हे टूल वापरा.
- २. व्याज कॅल्क्युलेटर (Loan Interest Calculator): घेतलेल्या कर्जावर संपूर्ण कालावधीत तुम्ही एकूण किती अतिरिक्त व्याज देणार आहात, हे मोजण्यासाठी हे टूल उपयुक्त आहे.
- ३. DTI कॅल्क्युलेटर (Debt-to-Income Calculator): तुमचे मासिक उत्पन्न आणि कर्जाचे हफ्ते यांचे गुणोत्तर (Ratio) तपासून तुम्ही नवीन कर्जासाठी पात्र आहात का, हे ठरवा.
- ४. साधे व्याज कॅल्क्युलेटर (Simple Interest Calculator): मुद्दल, व्याजदर आणि कालावधी यानुसार साध्या व्याजाची सोपी गणना करण्यासाठी हे साधन वापरा.
- ५. चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेटर (Compound Interest Calculator): तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाने भविष्यात किती मोठी रक्कम जमा होईल, हे पाहण्यासाठी हे टूल अतिशय प्रभावी आहे.
- ६. गुंतवणूक परतावा कॅल्क्युलेटर (Investment Return Calculator): तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर दीर्घकाळात किती परतावा (Returns) मिळेल, याचे स्पष्ट प्रोजेक्शन हे टूल देते.
- ७. निवृत्ती बचत कॅल्क्युलेटर (Retirement Savings Calculator): निवृत्तीच्या वेळी तुम्हाला आर्थिक सुरक्षिततेसाठी किती निधी हवा आहे आणि त्यासाठी आता किती बचत करणे गरजेचे आहे, हे मोजण्यासाठी हे टूल वापरा.
- ८. GST/VAT कॅल्क्युलेटर (GST/VAT Calculator): कोणत्याही वस्तू किंवा सेवेच्या मूळ किमतीवर टॅक्स लावण्यासाठी किंवा एकूण किमतीतून टॅक्स वेगळा काढण्यासाठी हे साधन वापरा.
- ९. आयकर कॅल्क्युलेटर (Income Tax Calculator): तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार सरकारला साधारणतः किती आयकर (Tax) भरावा लागेल, याचा अंदाज घेण्यासाठी हे टूल वापरा.
- १०. महागाई कॅल्क्युलेटर (Inflation Calculator): महागाईच्या दरानुसार भविष्यात एखाद्या वस्तूची किंवा सेवांची किंमत किती वाढेल, हे जाणून घेण्यासाठी या टूलचा वापर करा.
⚠️ आर्थिक अस्वीकरण (Financial Disclaimer):
१. केवळ माहितीसाठी (Informational Purpose Only): 'क्रीडाविश्व' (Kridavishwa.in) वर उपलब्ध असलेली सर्व आर्थिक साधने (कॅल्क्युलेटर्स) आणि माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिलेली आहे. हा कोणताही व्यावसायिक, कायदेशीर किंवा गुंतवणुकीचा सल्ला नाही.
२. अंदाजित आकडेवारी (Approximate Figures): या कॅल्क्युलेटर्सद्वारे मिळणारे निकाल हे तुम्ही टाकलेल्या माहितीवर आधारित केवळ 'अंदाजित आकडे' (Approximate values) दर्शवतात. प्रत्यक्षात बँकांचे नियम, टॅक्स स्लॅब आणि बाजारातील चढ-उतारांनुसार (Market Fluctuations) अंतिम आकडेवारी बदलू शकते.
३. वैयक्तिक जबाबदारी (Personal Responsibility): या ब्लॉगवरील माहितीच्या किंवा कॅल्क्युलेटरच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही आर्थिक निर्णयामुळे (उदा. कर्ज घेणे, गुंतवणूक करणे) होणाऱ्या नफा किंवा तोट्यासाठी 'क्रीडाविश्व'चे लेखक किंवा मालक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. तुमची आर्थिक जोखीम ही सर्वस्वी तुमची स्वतःची असेल.
४. तज्ज्ञांचा सल्ला घ्या (Consult an Expert): आम्ही आमच्या वाचकांना आग्रहाची विनंती करतो की, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, कर्ज किंवा टॅक्स संबंधित कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कृपया आपल्या नोंदणीकृत आणि प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा (Certified Financial Planner / Advisor) सल्ला आवर्जून घ्यावा.
फोटो स्टोर करताना रिसाईज व कॉम्प्रेस करण्यासाठी आमचे मोफत प्रो बल्क इमेज रिसाइजर व कम्प्रेसर टूल देखील वापरा व, रोजच्या किंवा नेहमीच्या वापरातील काही कॉमन कन्वर्शन करण्यासाठीचे लोकप्रिय टूल्स असलेले Common Converter (कॉमन कन्वर्टर) देखील वापरा.






