kridavishwa.in मार्फत उपलब्ध ‘प्रेरणादायी व ट्रेंडिंग सुविचार’ (Inspirational Quotes) आपल्या मित्रपरिवारात शेअर करा.
माणसाच्या जीवनात चांगल्या विचारांचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. kridavishwa.in वरील ह्याच चांगल्या विचार मालिकेतील ‘प्रेरणादायी सुविचार’ पानावरील सुंदर विचार तुम्ही नेहमी वाचून स्वतः व इतरांना प्रोत्साहित करा. सोशल मीडिया माध्यमावरील आपले स्टेटस आपल्या फोटो किंवा नावाने शेअर करा व आपल्या दिवसाची सुरुवात रोजच्या प्रेरणादायी सुविचारांनी करा.
पुढे काही कार्ड्स दिले आहेत या पैकी आवडीचे सुविचार, करा एका क्लिक मध्ये कॉपी व शेयर करा आपल्या सोशल ग्रुप मध्ये पूर्णपणे ⚡️मोफत⚡️
यापैकी आपल्या आवडीच्या विचारांनी आपल्या जीवनात सदैव चांगली अनुभूती द्यावी हीच इच्छा व असे होत आहे वाटल्यास किंवा एखादा सुविचार आवडल्यास येथे कमेंट करून नक्की कळवा. आपल्या कमेंट आमच्या साठी ‘प्रेरणादायी‘ असतात व अश्याच नवीन संकल्पना व सुविधा आपण पर्यंत पोहचवण्या करिता त्यातून आम्हाला बळ मिळते.
चांगल्या विचारांचे आदान प्रदान करणे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे असे म्हणल्या जाते. विचार जर चांगले असतील तर माणसाला कठीण परिस्थितीवर चालून जाण्याची म्हणजेच मात करण्याची शक्ती मिळत असते तेच जर विचार चांगले नसतील तर चांगल्या मार्गावरील होतकरू व्यक्ती देखील भरकटू शकतो. तसेच चांगले विचार चिरंतन असतात जे अनादी काळापासून आले व पुढे चिरकाळ टिकणारे असतात तेव्हा अश्या चांगल्या विचारांचे संस्कार पुढील पिढीस देणे हे देखील आपले कर्तव्य आहे असे समजणे चुकीचे ठरत नाही.
मागील पिढीचा वारसा विचारांनीच पुढे द्यायचा असतो ह्यात एकवेळ भर घातली नाही तरी हरकत नाही पण पुढील पिढीस विचारांची संपदा द्यायला विसरू नका हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे.. तर चला मग आपल्या सुसंस्कृत समाजाला आणखी बळकट बनवूयात.
अस्वीकरण (Disclaimer): या पोस्टमध्ये वापरलेले सुविचार हे इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. या सुविचारांचा उद्देश वाचकांना प्रेरणा देणे हा आहे. यातील मजकुराचे श्रेय संबंधित मूळ लेखकाचे असू शकते. आम्ही कोणत्याही प्रकारे कॉपीराईटचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत नाही. जर यातील एखाद्या मजकुरामुळे तुम्हाला काही आक्षेप असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तो मजकूर त्वरित काढून टाकू. येथे दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि प्रेरणादायी हेतूने आहे.
पुढील ‘प्रेरणादायी सुविचार’ (Inspirational Quotes) करा कॉपी एका क्लिक मध्ये आणि शेयर करा मित्रपरिवारात 👍
“प्रेम हे आपुलकीने सुरू होते व काळजीने जिवंत ठेवले जाते – अज्ञात”
“नातं हे संवादाने टिकते व प्रेमाने बहरते – अज्ञात”
“शब्द हे असे अचूक मशीन आहे जे स्वभाव कसा आहे ते सांगते फक्त वापरणारा हुशार पाहिजे – अज्ञात”
“संघर्ष हे निसर्गाचे निमंत्रण असते जो हे निमंत्रण स्वीकारतो तोच पुढे जातो – अज्ञात”
“शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते – अज्ञात”
“संघर्ष आयुष्याला अर्थ देतो तर प्रयत्न यश देतात -अज्ञात”
“आपली माणसं कोणती हे लवकर ओळखा फुकट वेळ वाया जाणार नाही. -अज्ञात”
“काही जवळची माणसे इतकी खास असतात जी भलेही सेल्फीत दिसत नाही पण त्याशिवाय जग म्हणजे दोऱ्या शिवाय हार असल्या सारखे असते – अज्ञात”
“जिद्द हे असे टॉनिक आहे ज्याला तयार करायला प्रतिकूल परिस्थिती व विकट घ्यायला इच्छाशक्ती लागते – अज्ञात”
“शुभेच्छां पेक्षा शिस्त मिळू दे, सहसा पेक्षा आज धैर्य मिळू दे, होईन जरी परास्त आज मी, पुन्हा भरारीची संधी मिळू दे. – अज्ञात”
“आज तुझ्या स्वप्नांना बळ येऊ दे, आज पुन्हा नव्याने उमेद मिळू दे, करेल जग कुरघोडी पुन्हा जरी, तुझ्या जिद्दीला सलाम मिळू दे. -अज्ञात”
“विश्वास असावा पण अंधविश्वास नको, जिद्द असावी पण हेकाडीपणा नको, चिकाटी असावी पण मरगळ नको, प्रेम असावे पण लागत नको. – अज्ञात”
“एखादी व्यक्ती आपल्या विषयी देखील तसाच विचार करावी जसा आपण करतो ह्याला प्रेम नाही विलासिता म्हणतात. -अज्ञात”
“जोपर्यंत व्यक्ती आयुष्यात स्वतः शी हितगुज करत नाही तोपर्यंत ती व्यक्ती शून्य असते – अज्ञात”
“स्वतः च्या मनाला भेटण्यासाठी चिंतन दरवाज्यावर जावेच लागते -अज्ञात”
“स्वप्न बघणे ठीक असते, स्वप्नात जगणे नाही. -अज्ञात”
“मोठी स्वप्ने इच्छाशक्ती वाढवतात पण जिद्द व चिकाटी ती स्वप्न पूर्ण करतात – अज्ञात”
“वाईट संगतीने गुणवंत देखील कुलनाशक बनतो -अज्ञात”
“सद्विचार हे असे खत आहे जे मनरूपी झाडाला मरू देत नाही. – अज्ञात”
“चांगली संगत सद्विचारांचे वातावरण निर्माण करते जे स्वतः सोबत जगाचे कल्याण करण्याची ताकद ठेवते. -अज्ञात”






