Dridam Movie Review
तर मित्रांनो कसे आहात, आता चित्रपट म्हणलं आणि त्यावर चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चित्रपट पाहिल्याचा पूर्ण आनंदच मिळत नाही. आणि आपल्या सारखे दर्दी रसिक असतील तर चर्चा करण्याची मजा काही वेगळीच असते. तर मित्रानो, काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 मे 2026 ला चित्रपट गृहात आणि 12 जून 2026 ला जिओ हॉटस्टार वर आलेला हा चित्रपट अत्यंत चांगला असा चित्रपट आहे असे माझे तरी मत आहे.
Dridam (द्रिढम्) म्हणजेच “दृढ” अश्या सुंदर अर्थाचे नाव असलेला चित्रपट कसा आहे ह्या विषयी आपले मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर ह्या चित्रपटावर बोलताना प्रथम ज्यांनी हा चित्रपट पहिला नाहीये त्यांच्या साठी खास खाली YouTube वरील ट्रेलर ची लिंक देत आहे. खाली फोटाला क्लिक करून आपण तो ट्रेलर नक्की बघू शकता.

(चित्रपटाचा हिंदी ट्रेलर YouTube वर पाहण्या साठी फोटोवर क्लिक करा)
मूळ मल्याळम भाषेतल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्टिन जोसेफ यांनी केले आहे. यामध्ये अभिनेता शेन निगम (Shane Nigam) याने एस.आय. विजय राधाकृष्णन म्हणून मुख्य भूमिका साकारली आहे. katina ann jeethu यांनी व Dridam चित्रपटाच्या संपूर्ण टीम ने या चित्रपटात द्वारे जणू एक निश्चितच दबंग संदेश दिला आहे जो की संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्री ला खासकरून बॉलीवूड इंडस्ट्रीजला लागू होतो तो असा की कथा चांगली निवडा म्हणजे त्यात नावीन्य असेल त्याचे चित्रीकरण छान असेल तर तुमचा चित्रपट तुम्ही नक्कीच गाजवू शकता.
Dridam इतर चित्रपटांसारखा आहे की वेगळा?
निश्चितच सर्प्राइज़ फैक्टर आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे आपण नेहमीच कुठलाही चित्रपट (भारतीय चित्रपट सृष्टीतला) काही ठरावीक गोष्टी पाहून-पाहून जणू थकून गेलो आहोत असे म्हणले तर वावगे ठरणार नाही ते म्हणजे एक तर स्त्रियांवरील अत्याचार, लव ट्रायंगल, आणि एक हिरो अशक्य परिस्थितीतून असत्याचा पराभव करतो आणि सत्याचा विजय घडवून आणतो. नाही म्हणजे तसे बरोबरच आहे की, असत्याचा पराभव आणि सत्याचा विजय दाखवणे योग्यच आहे म्हणा, पण प्रत्येक हिरो ने सनी देओल सारखी “ढाई किलो का हात” म्हणत फाईटिंग केली तर ती प्रत्येकाला नक्कीच शोभणार नाही अगदी तसेच एका चित्रपटात छान वाटलेल्या गोष्टी दुसऱ्या चित्रपटात छान वाटतीलच असे नाही. आणी फाइट सीन बाबतच बोलायचे झाले तर आतापर्यत तरी एकूण भारतीय सिने सृष्टीत फाइट सीन बाबत समाधानकारक प्रगती झाली आहे असे मला तरी वाटत नाही. पण ह्या चित्रपटा कडे पाहून त्यातही सुधारणे कडे मार्गक्रमण केल्याचे दिसत आहे आणि हे पाहून नक्की आनंद आहे.
Dridam मध्ये काय वेगळे आहे?
आता हल्ली बॉलीवूड मध्ये मोठमोठाली सितारे मंडळी मोठ्या बजेटची चित्रपटं तयार करत आहे. आणि त्यांचा चाहता वर्ग त्यांचे अडकलेले पैसे वसूल देखील करून देत असतील पण ह्यामध्ये क्वचितच काही चित्रपटे वगळता बहुतांश चित्रपट प्रेक्षक दुसऱ्या दिवशी सुद्धा लक्षात ठेवणार नाही बोलण्या सारखे खूप आहे खूप गोष्टी आणि जुन्या गाजलेल्या चित्रपटांची नावे याठिकाणी सांगावीशी वाटत आहेत पण इथे एकच सांगेन की यावर फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे चांगल्या दर्जाची नावीन्यता असलेली पटकथा घेऊन चित्रपट बनवणे. आणि द्रिदम मध्ये नेमके तेच पाहायला मिळते.
Dridam मधील पटकथेचा आढावा
इडुक्की जिल्ह्यातील कुझिनिलम नावाच्या एका दुर्गम गावातील पोलीस स्टेशनमध्ये एस.आय. विजय राधाकृष्णन यांची पहिली पोस्टिंग आणि येथून चित्रपटाला सुरुवात करत एका नवीन भरती झालेल्या अनुभव शून्य पोलिस अधिकाऱ्या समोर कोण-कोणती आव्हाने उभी राहतात ही या चित्रपटात दाखवले आहे. आणि विशेष करून चित्रपटात कुठेही कोणतीही गोष्टी अतिशयोक्ती वाटत नाही. आणि मानवी स्वभावाचा नेमका ठाव घेत आजच्या काळातील सामान्य जनमानसाच्या मनातील भीतीचे अतिशय सुंदर पद्धतीने भाव दाखवत चित्रपटाच्या टीम ने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. जो की मला तरी यशस्वी झाल्या सारखा वाटतो.
Dridam चे चित्रीकरण
Dridam चित्रपटाचे चित्रीकरण देखील अतिशय प्रोफेशनल दर्ज्याचे आहे म्हणजे प्रोफेशनल टीम आहे तर प्रोफेशनलच वाटणार असे आपण म्हणाल पण मित्रानो आपण असे कित्येक मोठ्या बैनर खाली तयार झालेल्या पिक्चर बाबत म्हणू शकतो हे पण बघायला पाहिजे. तेव्हा नक्कीच हा चित्रपट बघत असताना चित्रपट गृहात जर पाहत असताल तर नक्कीच खूप छान अनुभव मिळेल पण त्याच सोबत जर तुम्ही घरी टीव्ही किंवा मोबाईल वर पाहत असाल तर तेथेही नक्कीच तुम्हाला इतर चित्रपटा पेक्षा पैसा वसूल अनुभव मिळेल असे मला वाटते. आणि होम थिएटर किंवा हेडफोन वापरणाऱ्यांना देखील पर्वणी आहे. कारण साउंड देखील अप्रतिम आहेत.
Dridam चित्रपटाचा गाभा
मूळ चित्रपट एका सर्वसामान्य पोलिस अधिकाऱ्या वर अवलंबून आहे आणि अचानक येणाऱ्या परिस्थिती वर मूळ नायक काय करतो हे तर बघण्या सारखे आहेच पण चित्रपटाची कथा तुम्हाला देखील थोड्या-थोड्या वेळेनंतर आता काय होईल हा प्रश्न विचारायला लावते.
Dridam परिवारा सोबत बघू शकता?
नक्कीच. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे (CBFC) ‘U/A 16+’ प्रमाणपत्र आहे, पण आज घडीला टीव्ही वरील जाहिराती बघता हा चित्रपट नक्कीच अत्यंत पारिवारिक वाटतो. आता कुठलाही सर्प्राइज़ स्पॉइल न करता मला एवढेच सांगावेसे वाटते की चित्रपट सृष्टी ही जनमानसाचा किंवा समाजाचा आरसा म्हणून काम करत असते जे की खूप मोठे काम आहे आणि बऱ्याच वेळा निर्माते चित्रपटांना पत्रकारिते प्रमाणे प्रस्तुत करतात म्हणजे फॅक्ट्स दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि चित्रपटाचा मूळ उद्येश मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून जनमत तयार करणे ह्या पासून बाजूला सारल्या जातो आणि कल्पनेला जणू मर्यादा आखल्या जातात. पण चित्रपटाचा जो प्रभाव जनमानसावर होतो त्याचा विचार करून मला तरी असे वाटते की, सत्य परिस्थिती वाईट जरी असेल तरी समाजात ह्याच चित्रपटाच्या प्रभाव शक्तीचा उपयोग करून चांगले बदल घडवण्याची मोठी संधी चित्रपट निर्मात्यांकडे असते ती त्यांनी वापरली पाहिजे आणि समाजात काय आहे यापेक्षा काय असायला पाहिजे हे दाखवले पाहिजे आणि ह्या चित्रपटातून नेमके ते मिळत आहे हे पाहून निश्चितच आनंद आहे.
अश्याच रंजक समीक्षणा साठी kridavishwa.in ला नेहमी भेट देत रहा आणि मनोरंजन कॅटेगोरी मध्ये नव-नवीन चित्रपटांविषयी जाणून घ्या.






