Facebook down ?
आज दिनांक 12-06-2026 रोजी बऱ्याच ठिकाणी भारतात फेसबुक वापरकर्त्याना फेसबुक वापरत आले नाही याविषयी CNET (CNET ची मूळ बातमी )या वृत्त पत्राने दिलेल्या बातमी नुसार आज जगभरात बऱ्याच ठिकाणी ही अडचण लोकाना जाणवली सुमारे 80,000 तक्रारी (लोक प्रतिक्रिया) डाउनडिटेक्टर सुविधे कडे जमा झाल्या आणि Facebook कडून फेसबुक चे अधिकृत वक्ते Andy Stone यांनी या विषयावर त्यांच्या एक्स (ट्विटर) वरील मॅसेज मध्ये आम्ही यावर काम करत असल्याचे सांगितलं आहे.
कधी सुरू होईल Facebook आणि instagram ?
जसे की काही ठिकाणी काही तासांपासून तर काही ठिकाणी थोड्या वेळेपासून ही समस्या होत असलेली दिसत असली आणि काही लोकांना इंस्टाग्राम देखील वापरण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही काही ठिकाणी सेवा काही प्रमाणात सुरू असल्याचे इंटरनेट वर बघायला मिळत आहे (लोकांच्या प्रतिक्रियेतून) परंतु निश्चितच आता पर्यंत च्या Facebook च्या इतिहासात सर्वर डाउन होऊन अशी समस्या 2011 व 2014 मध्ये झाल्याचे पाहायला मिळते तरी त्याहून जास्त तीव्रतेने ह्या वेळेस फेसबुक चे सर्वर डाउन किंवा तत्सम तांत्रिक अडचणी मुळे सेवा बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि अधिकृत स्रोतांकडून जोपर्यंत या वर काही खुलासा होत नाही तोपर्यंत सुविधा पूर्ववत कधी होतील हे सांगणे कठीण आहे तरी ही एक चालू घडामोड असल्याने या विषयी माहिती मिळताच आपणास लवकरच कळवले जाईल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) 09:17 च्या सुमारास
यावेळेस फेसबुक व इंस्टाग्राम चे काही तांत्रिक कारणामुळे सेवा ठप्प झाल्याचे आपण पाहत आहोत तेव्हा Facebook कडून फेसबुक चे अधिकृत वक्ते Andy Stone यांनी या विषयावर त्यांच्या एक्स (ट्विटर) वरील मॅसेज मध्ये आम्ही यावर काम करत असल्याचे सांगून विषय थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसाधारण पणे आता भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) 09:17 च्या सुमारास बहुतांश भागात ही सुविधा पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळत आहे तरी काय झाले होते याविषयी काही अधिकृत माहिती मिळताच आपणास लवकरच कळवण्यात येईल आणि अजूनही आपणास समस्या येत असल्यास आमच्याशी कमेंट बॉक्स मध्ये आपली कमेंट्स लिहून संपर्क करू शकता व आपण नक्कीच या विषयावर चर्चा करू.
Facebook व Instagram डाउन असण्याची कारणे
अजून नेमक्या कोणत्या कारणा मुळे ही समस्या आली किंवा अजून देखील समस्या येत आहे याविषयी फेसबुक लवकरच खुलासा करेल पण तत्पूर्वी तांत्रिक बाबींमध्ये (जेमिनी AI च्या संदर्भावरून) DNS किंवा BGP (Border Gateway Protocol) मधील बिघाड: इंटरनेट ट्रॅफिक योग्य सर्व्हरपर्यंत पोहोचवणारी सिस्टीम जर चुकून चुकीची कॉन्फिगर (Configure) झाली, तर संपूर्ण प्लेटफॉर्म वर सुविधा ठप्प होतात.
अंतर्गत सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड: कंपनीच्या मुख्य सर्व्हर किंवा डेटा सेंटरमध्ये अचानक आलेला मोठा अडथळा किंवा नवीन सिस्टीम अपडेट करताना झालेली एखादी मोठी चूक देखील अश्या प्रकारच्या समस्येला कारणीभूत ठरू शकते
सर्व्हर ओव्हरलोड (Server Overload): अचानक मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आल्यास किंवा क्वचित प्रसंगी सायबर हल्ल्यामुळे (DDoS Attack) सर्व्हर काम करणे थांबवू शकतात. परंतु, आत्ताच सायबर हल्ल्या विषयी आपले मत मांडणे उपयोगाचे नाही कारण तशी कुठलीही जबाबदारी किंवा अधिकृत पणे वक्तव्य इंटरनेट वर आलेले दिसत नाहीये.
लोकप्रतिक्रिया
Reddit , तसेच अन्य सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत काही जण ह्या प्रकरणावर आपल्या मोबाईल किंवा कंप्यूटर स्क्रीन चे स्क्रीनशॉट टाकून परिस्थिती विषयी एकमेकांना सांगत आहेत तसेच काही जणं फेसबुक कडून लवकर सुविधा चालू व्हावी असे मत व्यक्त करताना दिसत आहे तर काही ठिकाणी लोकांना हा नेटवर्क रिलेटेड समस्या वाटल्याने त्यांनी मोबाईल नेटवर्क रीसेट करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले तर अश्या परिस्थितीत लोकांकडून भीतीपोटी काय होते व काय करू नाही याविषयी चर्चा केल्याचे दिसून येते
आपण ही थोडक्यात याविषयी समजून घ्यायचे झाल्यास ही समस्या नेटवर्क संबंधी नसून फेसबुक च्या स्वतः च्या सर्वर कडील असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे तेव्हा आपण स्वतः काहीही या परिस्थितीत करणे अपेक्षित नाही जसं ही समस्या आली तशीच ती पूर्ववत देखील होईल असे बोलल्या जात आहे काही नवीन माहिती मिळताच आपल्याला नक्की इथे सांगितल्या जाईल तोपर्यंत kridavishwa ला भेट देत रहा.







