Telegram Banned in India?
ndtv यांनी दिलेल्या बातमीनुसार (मूळ बातमी येथे वाचा) Ministry of Electronics and Information Technology (MeitY) यांच्या आदेशानुसार भारतातील NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आणि सायबर गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी भारत सरकारने टेलिग्राम एप्लीकेशन वर आणि त्यातील मॅसेज एडिटिंग फिचर वर बंदी घातली आहे.
Telegram वरील बंदी कधी पर्यंत असेल ?
तशी ही बंदी तात्पुरत्या म्हणजेच 30 जून पर्यंतची सांगितल्या जात असली तरी त्या तारखेत कमी किंवा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी या अर्थाने की, आजही काही ठिकाणी जर टेलिग्राम सुरू असल्याचे दिसत असले तरी त्यामागचे कारण म्हणजे टेलिग्राम च्या तात्पूरत्या बंदी बाबत जरी वक्तव्य केले असले तरी बंदी कश्या प्रकारची व कुठे होईल या विषयी सविस्तर माहिती तसेच त्यातील तांत्रिक बाबी अजून स्पष्ट नाहीत. जसे की, राष्ट्रीय सुरक्षा आणि उच्चस्तरीय बैठकीतून टेलिग्राम बंदी विषयी निर्णय घेतल्या गेल्या मुळे कदाचित ह्या विषयीची पूर्ण माहिती उघड केलेली नसावी.
Telegram बंद तर शेयर मार्केट टिप्स देखील बंद?
जसे की टेलिग्राम चैनल मार्फत शेयर मार्किट टिप्स घेणाऱ्या टेलिग्राम वापरकर्त्यांची संख्या लाखों मध्ये आहे आणि kridavishwa.in ह्या चैनल च्या अधिकृत असण्या बाबत किंवा उपयुक्त असण्या बाबत मत व्यक्त करत नसून वाचकांना उलटे जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जिथे अशी telegram ची चैनल्स फायदा मिळवून देण्याच्या गोष्टी करतात तिथे फायद्या ऐवजी बऱ्याच वेळा पदरात नुकसान आणि फसवेगिरी ला बळी पडल्याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला आहे तरी यातील काही चॅनेल्स प्रतिष्ठित असून त्यांचे फॉलोवर्स ची संख्या लाखोंमध्ये असते आणि रोज ह्या टिप्स करिता लोकं चातका प्रमाणे वाट पाहत असतात. CNBC AWAAZ च्या एका यूट्यूब वीडियो मध्ये देखील याविषयीच सांगितले आहे.
Telegram बंदी वरील आपले मत नक्की कमेंट मध्ये सांगा
तसेच टेलिग्राम ची गुंतागुंतीची रचना आणि vpn व custom dns चा वापर करणारे सायबर गुन्हेगार यांना आळा बसण्या साठी मूळ कंपनी मार्फत काही ठोस पावले उचलली जाणे गरजेचे असते त्यामुळे कदाचित काही वेळाने आपणास ह्या एप्लीकेशन मधील कुठल्या सुविधा प्रभावित झाल्या आहेत हे कळू शकेल सध्या तरी डेस्कटॉप वर्जन किंवा वेब ब्राउज़र मधील वर्जन पूर्ण बंद झाल्याचे दिसत आहे. व्हॉट्सऍप प्रमाणेच लोकप्रिय असलेले हे ऍप भारतात बरेच जण वापरतात आणि विद्यार्थी, सायबर गुन्हेगार ह्यांना हे एप्लीकेशन निश्चितच वापरता येऊ नये परंतु ह्यांच्या व्यतिरिक्त वापरकर्त्याना नेमके हे ऍप कसे वापरता येईल किंवा नाही हे लवकरच जशी माहिती मिळेल तसे आपणास सांगण्यात येईल सध्या उपलब्ध माहिती नुसार भारतात टेलिग्राम ऍप हे सध्यातरी सर्वांसाठीच तात्पुरत्या कालावधी करिता बंद करण्यात आले आहे.






