Home / अपडेट / ICAI CA Final Result जाहिर झाला

ICAI CA Final Result जाहिर झाला

ICAI CA फायनल मे २०२६ निकालाची घोषणा: टॉपर नूर सिंगला (८३.१७% गुण) चे इन्फोग्राफिक, उत्तीर्णतेची टक्केवारी आणि सीए टोपरसह डिजिटल बॅनर.

ICAI CA Final Result

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) (अधिकृत संकेतस्थळाची मूळ लिंक) ने आज दिनांक 18 जून 2026 रोजी मे महिन्यातील 2 मे ते 12 मे दरम्यान घेतलेल्या CA Final परीक्षेचा निकाल जाहीर केला व टॉप केलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहे. टॉपर्स मध्ये ऑल इंडिया रैंकिंग नुसार प्रथम क्रमांकावर पटियाला येथील नूर सिंग यांनी 83.17% गुण मिळवले तर दुसऱ्या क्रमांकावर हावडा येथील रितिज सराफ यांनी 79.17% गुण मिळवले तसेच तिसऱ्या क्रमांकावर डोंबिवली येथील सोहन अनिल मांजरेकर यांनी 78.83% गुण मिळवले. सर्व टॉपर्स व उत्तीर्ण गुणवंतांचे kridavishwa.in च्या तर्फे हार्दिक अभिनंदन तसेच यंदा यश न आलेल्या सर्व परीक्षार्थीना देखील kridavishwa च्या सर्व टीम तर्फे खचून न जाता सकारात्मक विचारधारेस अंगीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

CA (सीए – चार्टर्ड अकाउंटंट) म्हणजे काय?

CA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट यालाच मराठीत सनदी लेखापाल असेही म्हणतात. आणि ICAI (The Institute of Chartered Accountants of India) या संसदेने स्थापन केलेल्या नियामक संस्थे मार्फत भारतातील झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या CA व्यावसायिकास शिक्षण, परीक्षा आणि नियमनाचे कार्य केल्या जात असते. हे वाणिज्य (Commerce), व्यवसाय आणि वित्त (Finance) क्षेत्रातील भारतातील अत्यंत सन्मानाचे व्यवसायीक पद आहे.

CA चे काम कोणते?

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने व्यवसायात किंवा जिथे आर्थिक व्यवहार होतो अश्या ठिकाणी CA यांचे काम असते म्हणजे व्यक्तिगत आर्थिक सल्ल्यापासून ते मोठ्या कंपन्यांचे किंवा संस्थेचे/विभागाचे आर्थिक ताळेबंद तपासणी करणे म्हणजेच ऑडिटिंग (तपासणी), कर आकारणी, आर्थिक सल्लागार, तसेच सरकारी किंवा कंपन्यांचे किंवा व्यक्तिगत अनेक महत्वाच्या कागदपत्रांवर , ऑडिट रिपोर्ट्स वर CA यांची स्वाक्षरी असेल तरच ते कायदेशीर रित्या अधिकृत मानले जाते.

CA PROFESSION म्हणजे यशस्वी भविष्याची गुरुकिल्ली अश्या आशयाचे चित्र ज्यात सीए व्यावसायिक बनल्यानंतर करिअर संधी कोणती असते ह्या विषयी चित्रात नमूद केले आहे

CA करिता करिअर च्या संधी कोणत्या?

CA परीक्षा अत्यंत कठीण अशी असते आणि त्यामुळेच भारतात ती पास झालेल्या CA व्यावसायिकांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा चांगला असतो, आणि त्यामुळेच CA झाल्यावर नोकरी तसेच व्यवसायाच्या संधी भरपूर असतात. कुठलाही CA परीक्षा उत्तीर्ण व्यावसायिक स्वतः ची सीए फर्म सुरू करू शकतोच पण बऱ्याच MNC कंपन्यांमध्ये फाइनेंस मॅनेजर किंवा CFO (चीफ फायनेंशियल ऑफिसर) सारख्या उच्चपदस्थ आणि मोठ्या पगाराची नोकरी करण्याची संधी मिळते.

CA कसे बनावे?

CA बनण्यासाठी वयोमर्यादेची कुठलीही अट नसते. पण 3 शैक्षणिक टप्प्यांतून/ परीक्षांतून पुढे जातच CA बनता येते. या तीन टप्प्यांत प्रथम असतो तो म्हणजे “सीए फाउंडेशन” 12 वी नंतर कोणतीही शाखा असो ही परीक्षा देता येते. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे “सीए इंटरमीजिएट” ज्यांनी सीए फाउंडेशन उत्तीर्ण होण्यात यश मिळवले असे किंवा कोणत्याही शाखेतील पण पदवीधर ह्या परीक्षेस बसू शकतो आणि तिसरा टप्पा म्हणजेच अंतिम परीक्षा ज्याला “सीए फाइनल” असे सर्वसाधारणपणे म्हणतात पण ह्या परीक्षेस बसण्यापूर्वी रेग्युलर प्रैक्टिस नुसार आवश्यक असलेले “आर्टिकलशिप” म्हणजेच इंटरमीजिएट दरम्यान आणि तिसऱ्या परीक्षे अगोदर कुठल्याही मान्यताप्राप्त सीए ह्यांच्या कडे किमान 2 ते 3 वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे आवश्यक असतो

सीए फाइनल परीक्षा उत्तीर्ण होण्या करिता उमेदवारांना प्रत्येक विषयात किमान 40 तर एग्रीगेट पद्धतीने एकूण 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. आणि 70 टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास डिस्टिंक्शन म्हणजेच विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण असा दर्जा मिळतो.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.